AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: हे सरकार अल्पमतात नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य, राष्ट्रवादीची मोठी बैठक, शरद पवार नेमकं काय करणार?

Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : बैठकीच्या आधी जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

Eknath Shinde: हे सरकार अल्पमतात नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य, राष्ट्रवादीची मोठी बैठक, शरद पवार नेमकं काय करणार?
काय म्हणाले नेमकं पाटील?Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 22, 2022 | 11:21 AM
Share

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maharashtra Government) काहीही आलबेल नाही, असं स्पष्ट होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil on Eknath Shinde) यांनी मोठं विधान केलंय. सरकार पडेल, अशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मला वाटत नाही की सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेच्या सर्व विधानसभेच्या सदस्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली काम करणं स्वीकारार्ह राहिल. आमदार गेलेले असले तरी शिवसेनेचे सगळे आमदार (Shiv sena MLA) परत येतील.’ असं महत्त्वपूर्ण वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोल सावरण्याच्या अनुशंगाने या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस देखील आता सतर्क झाली आहे. काल शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ही बैठक होईल. या बैठकीच्या आधी जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. तर बैठकीआधी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झालीये. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाल्याचं समोर आलंय. आता या बैठकीनंतर शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचंय. तसंच आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याही बैठक होण्याची शक्यता आहे. तसंच आज कॅबिनेट बैठकही घेण्याची शक्यताय.

दोन महत्त्वाची समीकरणं :

एक ट्वीट 2 बाईट एकनाथ शिंदेच्या बंडखोरीने वातावरण टाईट! सत्तेचं गणित शिंदेंना खरंच जमलंय? समजून घ्या आकडेवारीतून

असं आहे संख्या गणित

नेमका पेच काय?

  1. शिवसेनेकडून गटनेते पदावरुन एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आलं.
  2. गटनेते पदावरून हटवल्यानं एकनाथ शिंदे नाराज झालेत
  3. अजय चौधरी यांना शिवसेनेनं गटनेतेपदी नियुक्त केलंय.
  4. ही नियुक्ती अवैध असल्याचा तर्क लढवला जातोय.
  5. एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय.
  6. त्यामुळे अख्खी शिवसेनाच फुटली असल्याचं बोललं जातंय.
  7. तर दुसरीकडे खरी शिवसेना ही आपल्यासोबत असलेल्या आमदारांचीच असल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणंय.
  8. पण शिवसेना पक्ष सोडणार नाही, असंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडतं, याचा पेच कायम आहे.

राष्ट्रवादीसोबत भाजपही सतर्क

एकीकडे राष्ट्रवादीची बैठक तर दुसरीडे भाजपच्या गोटातूनही मोठी बातमी येतेय. भाजपनेही आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर शिवसेनेचे शिंदेंसोबत न गेलेले आमदार मुंबईतील हॉटेलात असून आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत आहेत. शिंदेंसोबत न गेलेल्या आमदारांना सेट रेगिस या हॉटेलात ठेवण्यात आलेलंय.

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये राहण्याची सोय

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.