मनपा निवडणुकीत सोबत की स्वतंत्र?, एकनाथ शिंदे म्हणाले…

महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुका लढवेल. तो धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde Mahavikas Aghadi)

मनपा निवडणुकीत सोबत की स्वतंत्र?, एकनाथ शिंदे म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 6:41 PM

मुंबई : “महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुका लढवेल. तो धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे सूचक विधान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशावर भष्य केले. (Eknath Shinde on Mumbai municipal corporation election and Mahavikas Aghadi)

राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे पाच जागांचे निकाल हाती आले आहेत. पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशानंतर मुंबई आणि औरंगबाद मनपाच्या निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सोबत लढवतील?, की स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरतील हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महाविकास आघाडीकडून शेतकरी हिताचे निर्णय

यावर बोलताना, “राज्यात मुख्यमंत्री चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राज्यातील सरकारला एक वर्ष झालं आहे. कोव्हिडचं संकट असताना सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना 21 हाजार कोटींची कर्जमाफी दिलेली आहे. शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं. अतिवृष्टीतही सरकारने चांगले काम केले. मोठ्या प्रकल्पांचं काम थांबलेलं नाही. मुंबई आणि औरंगाबाद येथील मनपाच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढवेल. तो धोरणात्मक निर्णय उद्ध ठाकरे घेतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, सध्या जे निकाल हाती आले आहेत. त्यावरुन राज्यात महाविकास आघाडी पुढे जात आहे. दमदारपणे काम करत असल्याचं हे दिसत आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई मनपा निवडणूक जिंगण्याचे आव्हान

दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भाजपकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. तसेच, यावेळी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, असा दावादेखील भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्याचे आव्हान असेल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष एकत्र लढतील?, की भाजपला थोपवण्यासाठी सोबत येतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा सर्व निर्णय धोरणात्मक पातळीवर घेतला जाईल, असं नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. (Eknath Shinde on Mumbai municipal corporation election and Mahavikas Aghadi)

संबंधित बातम्या :

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

चारवेळा नगरसेवक झालात, आता आम्हाला संधी द्या, कार्यकर्त्याची मागणी, महापौरांची निवडणूक न लढण्याची घोषणा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.