Sanjay Raut : राऊतांच्या घरात पैशाच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचं नाव, मुख्यमंत्री म्हणतात, ‘याची चौकशी करा”
मुख्यमंत्री म्हणतात, 'याची चौकशी करा"
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी सापडलेल्या पैशाच्या बंडलवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या घरात एकनाथ शिंदे यांचं नाव असलेला एक पैश्यांचा बंडल मिळाला होता. त्यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.” संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईत पैश्यांच्या बंडलवर माझं नाव होतं. तर त्याची चौकशी करा. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा”, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावर मंत्रिमंडळाचे विस्तार लवकरच होईल ते तुम्हाला माहिती मिळेल, असं शिंदे म्हणाल्या.
राऊतांच्या घरी एकनाथ शिंदेंच्या नावाचा बंडल
मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंचर ईडीने (ED)त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. या छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख (cash)रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहिलेला पैश्याचा बंडल संजय राऊतांच्या घरी सापडला. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
शिंदेंचा पुणे दौरा
“माझं दोन दिवसाच्या राज्यामधला दौरांमध्ये सर्व विभागीय आयुक्त यांच्या बैठका होता सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतली तातडीने जे प्रश्न सोडवायचे ते सोडवले. दौराचा चांगला इम्पॅक्ट लोकांकडून मिळाला आहे. काही निर्णय प्रक्रियेमध्ये थांबले होते त्याला चालना मिळाली आहे. उद्या पुण्यामध्ये देखील अशा प्रकारचे दौरा माझा आहे. यामध्ये देखील पुण्याच्या कामाचा आढावा घेणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या देखील आढावा घेतला जाणार आहे.काही छोटे छोटे काम प्रालंबित आहेत त्याच्या पण देखील लवकरात निपटारा करून पूर्ण केला जाईल, असं एकनाथ शिंदे पुणे दौऱ्याविषयी म्हणालेत.