Eknath Shinde : ‘हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय’ जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकासाठी सूरतहून फोन केला!

Maharashtra Politics : श्रीराम मिराशी दाखल असलेल्या डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात त्वरित फोन करून डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांच्याकडे तब्येतीची आस्थेने चौकशी केली.

Eknath Shinde : 'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय' जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकासाठी सूरतहून फोन केला!
नेमकं काय झालं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:22 AM

मुंबई : महाराष्ट्रातील आघाडी सरकार (MVA Government) आणि शिवसेना (Shiv sena) यांच्यावर संकटाचे ढग गडद होत जात आहेत. बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढतोय. आमदार गुवाहाटीत येण्याची संख्या वाढतेय. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष मात्र सरकार टिकवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलीय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून बाहेर पडा, या मागणीसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. एकीकडे महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पेचात सापडेलेले असतानाही दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत असलेली आपली नाळ जोडलेलीच ठेवली आहे, हे एकदा घटनेतून अधोरेखित झालंय.

नेमकं काय घडलं?

21 जूनला एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सूरतमध्ये गेले. गुपचूप त्यांनी आमदारांना घेऊन सूरत गाठलं होतं. पण आपल्या एका कार्यकर्त्याची तब्बेत बरी नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट डॉक्टरांना फोन फिरवला होता. यात संदर्भात राजेश कदम या फेसबुक युजरने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात की..

हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय….

हे सुद्धा वाचा

शिवसैनिकांना जपणारा नेता…

अत्यंत व्यस्त कार्यातून सुद्धा डोंबिवलीच्या आजारी शिवसैनिक पदाधिकाऱ्याची एकनाथ शिंदे यांनी केली आस्थेने चौकशी…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असून या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आहेत, एकनाथ शिंदे साहेब जवळपास पन्नास आमदारांचा पाठिंबा घेऊन गोहाटी येथे हॉटेल रेडिसन ब्लू येथे वस्तीला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय होणार याकडे आहे, परंतु या परिस्थितीत देखील एकनाथ शिंदे साहेबांना डोंबिवलीतील निष्ठावान शिवसैनिक पदाधिकारी श्रीराम मिराशी गंभीर आजारी असल्याचे कळले, श्रीराम मिराशी दाखल असलेल्या डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात त्वरित फोन करून डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांच्याकडे तब्येतीची आस्थेने चौकशी केली…

असे आहेत आपले निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपणारे त्याची काळजी घेणारे एकनाथ शिंदे साहेब…

नाथांचा नाथ लोकना एकनाथ…

पाहा फेसबुक पोस्ट

वैद्यकीस सेवेचं महत्त्वपूर्ण काम

वैद्यकीय सेवेसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी कोरोना काळात तळागाळात काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडे पाहणारा हा सगळा वर्ग आताच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांना कसा प्रतिसाद हेही पाहणं महत्त्वाचंय. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आणि विरोधात असे दोन्हीही अर्थाने राज्यभर पोस्टरबाजी सुरु आहे. शिवसेना फोडली असा आरोप एकनाथ शिंदेवर होतोय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे शिवसेनेवरच दावा करत आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघालंय.

वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.