Maharashtra Politics : ‘एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच!’ विधान उद्धव ठाकरेंचं, चर्चा एकनाथ शिंदेची!

Eknath Shinde Latest News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेद नाही सोडली.

Maharashtra Politics : 'एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच!' विधान उद्धव ठाकरेंचं, चर्चा एकनाथ शिंदेची!
उद्धव ठाकरेंचं ते विधान..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:52 PM

मुंबई : 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारण जी खळबळ माजली, तिची धग अजूनही कायमच आहे. स्वप्न सत्यात उतरणं, हे राजकारणात योगायोगाने आणि अगदी क्वचितच घडलं. 2019 च्या विधानसभा निवकालानंतर भाजप-सेनेची युती तुटली. कुणालाच वाटलं नव्हतं ते महाराष्ट्राचं चित्र पाहिलं. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणं, हा निव्वळ योगायोग असल्याचं बोललं गेलं. शिवसेनेचं पक्षप्रमुख पद ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद, असा प्रवास उद्धव ठाकरेंनी केला. भाजप-शिवसेनेच्या वाटाघाटी फळाला आल्या नाहीत. बरेच दिवस सरकार तयार होत नव्हतं. त्या दरम्यान, शिवसेनेनं मुख्ममंत्रीपदाचा दावेकर कोण असेल? हे जवळपास स्पष्ट केलं होतं. या दावेदाराचं नाव होतं, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंच्या नावाला शिवसेना नेत्यांचीही पसंती होतीच. आपण मुख्यमंत्री होऊ, असं आनंद दिघेंचा खंदा समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde Latest News) वाटू लागलं होतं. पण त्याआधीच अजित पवार आणि फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केला. महाराष्ट्राच्या राजकारण भूंकप झाला. यानंतर सर्वाथानं महाराष्ट्राचं राजकारणच (Maharashtra Political Crisis) फिरलं. सोबतच मुख्ममंत्री पदाच्या खुर्चीनंही एकनाथ शिंदेंकडे पाठ फिरवली.

बाळासाहेबांना दिलेला शब्द

मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण त्याआधी संजय राऊतांनी मॅरेथॉन पत्रकार परिषदांचा धडाकाच लावला होता. मधल्या काळात उद्धव ठाकरेंची झंझावाती मुलाखतही त्यांनी घेतली होती. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान आज पुन्हा आठवलं जातं. मला एका सर्वसामान्य शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहायलचं, एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही, मी तसा शब्द बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

राजकीय घडामोडी

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं राजकीय जाणकरांचा अंदाज खरा ठरेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेना खुणावू लागलं होतं. तशी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिली. कितीही नाकारलं, तरीही याची सल एकनाथ शिंदेच्या मनात राहिली नसेल, असं होणं कठीणच.

पुढे पहाटेच्या शपथविधीला महाविकास आघाडी सरकारकडून शिवतीर्थावरील शपथविधीनं उत्तर देण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची शपथ घेतली. याच सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाचे जे प्रमुख दावेदार मानले जात होते, त्या एकनाथ शिंदेकडे नगरविकास खातं देण्यात आलं. त्यांनी याच वेळी शपथ घेतली होती.

मुख्यमंत्रीपदाची आस

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेद नाही सोडली. आपल्या नेत्यासाठी ठाण्यात सतत भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं बॅनर झळकू लागले. ठाण्यात निर्विवाद वर्चस्व राखलेल्या एकनाथ शिंदेची मुख्यमंत्रीपदासाठीच्या डरकाळीचे स्वर मातोश्रीसोबत वर्षा बंगला आणि शिवसेना भवनापर्यंतही हळूहळू पोहोचू लागले. याचा परिणाम दिसून येत होता. एकनाथ शिंदेना आपल्या खात्यातील काही निर्णय घेताना घुसमटीचा सामना करावा लागत होता. पक्षातही आपल्याला कॉर्नर केलं जात असल्याची जाणीव शिंदेंच्या मनात सलत होती. त्यातही तीन पक्षांसोबतची महाविकास आघाडीतील खदखदही केव्हा ना केव्हा बाहेर पडेल, अशी शक्यता होती.

निवडणुकांचा पराभव

दरम्यान, राज्यसभा निवडणूक झाली. शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. विधान परिषदेची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. शिवसेनेची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. निकालानंतर शिवसेनेच्या कोणत्याही बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली नाही आणि अखेर राजकारणात पुन्हा कंप निर्माण करणारी बातमी समोर आली.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये गेले. ते नाराज असल्याचं कळलं. पुढे त्यांच्यासोबत काही आमदारही असल्याचं कळलं. हळहळू आमदारांचा आकडा वाढत गेला. मग महाविकास आघाडी सरकारच धोक्यात असल्याची काळजी व्यक्त केला जाऊ लागली. आता या सगळ्यानंतर कट्टर शिवसैनिक असल्याचं एकनाथ शिंदेंनी दुपारी ट्वीट करत स्पष्ट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा उल्लेख केला. पण उद्धव ठाकरेंचं नाव या ट्वीटमध्ये नव्हतं.

एका सामान्य शिवसैनिकाला मुख्मयंत्री करण्याचा शब्द दिलेले उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंसाठी त्यागणार का? एकनाथ शिंदे यांची आता शिवसेनेतली प्रतिमा पूर्वीसारखी राहिलेली असणार का? एकनाथ शिंदेच्या नाराजीचं प्रमुख कारण नेमकं मुख्यमंत्री पद आहे की महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष? की उद्धव ठाकरेच? या सगळ्या प्रश्नांचं गूढ जसजसं उकललं जाईल, तसंतसं हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरत गेली, तर आश्चर्य वाटायला नको.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.