Eknath Shinde vs Shiv Sena LIVE : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! बहुमत चाचणी होणार; शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षात देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री

| Updated on: Jun 29, 2022 | 6:38 AM

Eknath Shinde vs Shiv Sena News Live Uddhav Thackeray Government, MVA Political Crisis, Sanjay Raut ED summoned Updates in Marathi : शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बंड पुकारलंय. एक दिवस सुरतमध्ये राहून आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या सेना आमदारांच्या बंडाचा आज सहावा दिवस आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं अशी प्रमुख मागणी बंडखोर शिवसेना नेत्यांची आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात सत्तापालट होणार? की राष्ट्रपती राजवट लागणार? पुन्हा निवडणुका होणार? या सर्व प्रश्नांचं गूढ वाढवणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहेत. जाणून घ्या याच संदर्भातली आजच्या (26 June 2022) ताज्या घडामोडींचा लाईव्ह आढावा, एका क्लिकवर

Eknath Shinde vs Shiv Sena LIVE : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! बहुमत चाचणी होणार; शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षात देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री
Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVEImage Credit source: tv9 marathi

Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे.  21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे. महाविकास आघाडी सरकारमधून (MVS vs BJP) बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.

एकनाथ शिंदे गटामध्ये यांच्यासोबत कोण आमदार आहेत? जाणून घ्या

शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत?

  • एकनाथ शिंदे
  • शहाजी पाटील
  • अब्दुल सत्तार
  • शंभुराज देसाई
  • अनिल बाबर
  • तानाजी सावंत
  • संदीपान भुमरे
  • चिमणराव पाटील
  • प्रकाश सुर्वे
  • भरत गोगावले
  • विश्वनाथ भोईर
  • संजय गायकवाड
  • प्रताप सरनाईक
  • राजकुमार पटेल
  • राजेंद्र पाटील
  • महेंद्र दळवी
  • महेंद्र थोरवे
  • प्रदीप जयस्वाल
  • ज्ञानराज चौगुले
  • श्रीनिवास वनगा
  • महेश शिंदे
  • संजय रायमूलकर
  • बालाजी कल्याणकर
  • शांताराम मोरे
  • संजय शिरसाट
  • गुलाबराव पाटील
  • प्रकाश आबिटकर
  • योगेश कदम
  • आशिष जयस्वाल
  • सदा सरवणकर
  • मंगेश कुडाळकर
  • दीपक केसरकर
  • यामिनि जाधव
  • लता सोनावणे
  • किशोरी पाटील
  • रमेश बोरणारे
  • सुहासे कांदे
  • बालाजी किणीकर
  • उदय सामंत

अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?

  • बच्चू कडू
  • राजकुमार पटेल
  • राजेंद्र यड्रावकर
  • चंद्रकांत पाटील
  • नरेंद्र भोंडेकर
  • किशोर जोरगेवार
  • मंजुळा गावित
  • विनोद अग्रवाल
  • गीता जैन
  1. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा : 288
  2. सत्ता स्थापनेसाठी किती जागांची गरज : 145
  3. एकनाथ शिंदेंकडे सध्या किती आमदार : 48
  4. भाजपचं संख्याबळ किती : 106
  5. शिवसेनेचं 2019मध्ये निवडून आलेले आमदार किती : 56
  6. शिवसेनेचे आता फुटलेले आमदार किती : 39
  7. शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेनेकचे आता किती आमदार : 15
  8. काँग्रेसकडे किती आमदार? : 44
  9. राष्ट्रवादीकडे किती आमदार? : 55 (मलिक देशमुख तुरुंगात असल्यामुळे सध्या 53)
  10. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना असलेलं संख्याबळ : 169
  11. शिवसेना आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ किती झालं? : 121

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jun 2022 10:36 PM (IST)

    शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षात देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री

    राज्यपालांना ईमेलद्वारे आणि प्रत्यक्षात पत्र दिले आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस, राष्ट्रावादीसह आम्हाला रहायचं नाही अशी यांची भूमिका आहे. या 39 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले आहे.  त्यामुळे ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या  सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप नेते देवेंद्र फडवीस आणि राज्यपालांची थेट एन्ट्री झाली आहे.   देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी फडणवीस यांनी केली आहे.  बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.

  • 28 Jun 2022 10:32 PM (IST)

    शिंदे गटाला देखील बहुमत चाचणीत मतदान करण्याचा हक्क

    शिंदे गटाला देखील बहुमत चाचणीत मतदान करण्याचा हक्क असल्याचे विधीतज्ञ अनंत कळसे यांनी म्हंटले आहे.  सध्याचे उपाध्याक्षांच्या अधिपत्याखाली ही बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पडले. हा विश्वास दर्शक ठरावाचा मुद्दा असून त्यामुळे सभागृहात अडचण येणार नाही.

  • 28 Jun 2022 10:22 PM (IST)

    ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार; या संदर्भातील महत्त्वाचे आदेश

    राज्यातील सत्तासंघर्षात मोठा क्लायमेक्स आला आहे.  ठाकरे सरकारा अग्निपरीक्षा द्यावीच लागणार आहे.  महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. या संदर्भात राज्यपालांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

  • 28 Jun 2022 10:11 PM (IST)

    ठाकरे सरकारला बहुमत चाचणीसाठी बोलवावे देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी

    शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या  सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री झाली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.   सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी फडणवीस यांनी केली आहे.  बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.

  • 28 Jun 2022 10:03 PM (IST)

    सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री; सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी करणार

    सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री  सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी केली जाणार असल्याचे समजते. बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.

  • 28 Jun 2022 09:41 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल; भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु

    देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल. भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झालया आहेत. दिल्लीतून मुंबईत दाखल झाल्यानंतर ते राजभवन येथे पोहचले आहेत.  देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक झाली. नड्डा, अमित शाहांसोबत फडणवीस यांची 30 मिनीटे चर्चा झाली असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा भाजपचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आहे.

  • 28 Jun 2022 08:57 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊ नये; काँग्रेसचा आग्रह

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊ नये अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.  देवेंद्र फडणवीस दिल्लीत जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेवून कारवायांचा प्लॉट घडवतात असा गंभीर आरोप काँग्रेस नेते पृत्वीराज चव्हाण यांनी केला.

  • 28 Jun 2022 07:32 PM (IST)

    शिवसेना आमदारांची मातोश्री निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सुरु

    शिवसेना आमदारांची मातोश्री निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे.  या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांसह  वन टू वन चर्चा करणार असल्याचे समजते. सुभाष देसाई, अनिल परब,  रविंद्र वायकर, मिलींद नार्वेकर, विनायक राऊत, अजय चौधरी आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

  • 28 Jun 2022 07:19 PM (IST)

    मुंबईत सत्ताबदलाच्या घडामोडी सुरु, देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल

    मुंबईत सत्ताबदलाच्या घडामोडी सुरु देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल फडणवीस राजभवनाकडे जात असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

  • 28 Jun 2022 06:57 PM (IST)

    ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

    एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.

  • 28 Jun 2022 06:54 PM (IST)

    मंत्र्यांनी आणि आणि सचिवांनी कामं थांबवू नयेत

    मंत्र्यांनी आणि आणि सचिवांनी कामं थांबवू नयेत. कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. राज्यपालांनी माहिती मागीवली आहे. मात्र स्थिगीती दिलेली नाही.

  • 28 Jun 2022 06:49 PM (IST)

    उद्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर असं होणार – मंत्री अनिल परब

    उद्या औरंगाबादचा नाव संभाजीनगर करावं अशी शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. उद्याच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या निर्णय होणार असल्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगीतले.  कॅबिनेटच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा होत नाहीत असं म्हणत मंत्री अनिल परब यांनी बंडखोरांबाबत बोलण टाळलं.

  • 28 Jun 2022 06:44 PM (IST)

    लवकरच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती सुरु करणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

    कॅबिनेटच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. अजेंड्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. काही महिन्यांपूर्वी दोन टप्प्प्यात पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यातील झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ७,५०० पोलीस भरती करण्याबाबत दुरुस्ती करण्यात आली.  त्वरीत पोलीस भरती करण्याचा निर्णय  पोलीस विभागाने घेतला आहे.  लवकरच ही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वळसे पाटील यांनी  सांगीतले.

  • 28 Jun 2022 06:31 PM (IST)

    शिवसेना आमदारांची मातोश्री येथे अत्यंत महत्वाची बैठक

    शिवसेना आमदारांची मातोश्री निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक होणार. सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या सर्व आमदारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वन टू वन चर्चा करमार असल्याचे समजते.

  • 28 Jun 2022 06:26 PM (IST)

    युती तोडून भाजप सोबत युतीचा निर्णय एका दिवसात घ्यावा – दिपक केसरकर यांची मागणी

    युती तोडून भाजप सोबत युतीचा निर्णय एका दिवसात घ्यावा  दिपक केसरकर यांची मागणी. भाजप सोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी. शेवट गोड करा अशी आमची कळकळीची विनंती असल्याचे केसरकर म्हणाले. सुरक्षेसाठी आम्ही गुवाहाटीत येऊन राहिलोय

  • 28 Jun 2022 06:21 PM (IST)

    बंडखोरांबाबत ते मुंबईत आल्याशिवाय काय बोलणार; मंत्री अस्लम शेख

    राजकीय चर्चा गुवाहाटीत सुरु असल्याचे मंत्री अस्लम शेख म्हणाले.  बंडखोरांबाबत ते मुंबईत आल्याशिवाय काय बोलणार असंही ते म्हणाले. आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. उद्याही मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे.  मुंबई, महाराष्ट्रात पावसाबाबतची चर्चा केली तसेच महाराष्ट्रातील कोविड केसबाबत चर्चा झाली.

  • 28 Jun 2022 06:11 PM (IST)

    ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार

    ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार. आपलेच लोक आपल्याविरोधात मतदान करणार का, हे पाहायचे आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 28 Jun 2022 06:10 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस दिल्लीतून मुंबईकडे निघाले; भाजपचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला तयार

    देवेंद्र फडणवीस दिल्लीतून मुंबईकडे निघाले. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग असून दिल्लीत याबाबत हालचाली झाल्या. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक झाली. नड्डा, अमित शाहांसोबत फडणवीस यांची 30 मिनीटे चर्चा झाली असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा भाजपचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आहे.

  • 28 Jun 2022 06:03 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, अनेक मंत्री न बोलता निघून गेले

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली.  जो निर्णय घ्याल तो मान्य असेल अशी भूमिका मंत्र्यांनी मांडली. अनेक मंत्री न बोलता निघून गेले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

  • 28 Jun 2022 05:53 PM (IST)

    विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी

    या बैठकीत सर्व मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तुम्ही जी भूमिका घ्याल ती मान्य असेल असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. सरकार-प्रशासन चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार सुरु आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न मानण्यात येतो आहे.

  • 28 Jun 2022 05:49 PM (IST)

    तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल; संपूर्ण मंत्रीमंडश मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

    तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचे जाहीर केले आहे.

  • 28 Jun 2022 05:45 PM (IST)

    राज्य मंत्री मंडळाची बैठक सुरु; लवकरचं मोठी अपडेट समोर येणार

    राज्य मंत्री मंडळाची बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहेत. पहिल्यांदाच सर्व राज्य मंत्र्यांना या बैठकीला बोलावण्यात आले.

  • 28 Jun 2022 05:43 PM (IST)

    बच्चू कडूंसह 10 आमदार मुंबईत येणार; 48 तासात बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार

    महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.  बच्चू कडूंसह 10 आमदार मुंबईत येणार.  आमदारांचा हा गट सरकार अल्पमतात असल्याचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देणार. 48 तासात बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार

  • 28 Jun 2022 05:36 PM (IST)

    शिवसेना सोडून जाणाऱ्यांनी स्वत: कबर खोदलेली आहे – संजय राऊत

    बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा  वरुन पाहतोय. शिवसेना, ठाकरे परिवाराला क्लेश देणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सुखाने झोप येणार नाही. 50 कोटी पण तुम्हाला टोचतील. शिवसेनेचं नाव सोडून निवडून येऊन दाखवा. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना. शिवसेने मुळे आम्ही खासदार झालो आमदार झालो. शिवसेना सोडून जाणाऱ्यांनी स्वत: कबर खोदलेली आहे. तुम्ही राजकीय कबर खोदली आहे. जनता यावर माती टाकेल

  • 28 Jun 2022 05:30 PM (IST)

    तुम्ही त्या 5 स्टार हॉटेल मध्ये कैदी बनून राहिले आहात; तुम्हाला गुलाम केलेय – संजय राऊत

    नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ जे कोण शिवसेना सोडून गेले ते गुलामच झाले ना. शिवसेना सोडणाऱ्या कुणाचेही भल झाल नाही. तीच अवस्था या 40 लोकांची होणार आहे. तुमच्यात मुंबईत यायची हिंमत नाही.

  • 28 Jun 2022 05:26 PM (IST)

    तुम्ही त्या 5 स्टार हॉटेल मध्ये कैदी बनून राहिले आहात; तुम्हाला गुलाम केलेय – संजय राऊत

    तुम्ही त्या 5 स्टार हॉटेल मध्ये कैदी बनून राहिले आहात; तुम्हाला गुलाम केलेय – संजय राऊत

    22 वर्ष दिघे साहेबांचे विचार आठवले नाहीत का?

    ईडी पासून सुटका करुन घेण्यासाठी हे सर्व कट कारस्थान

    आम्हाला हिंदूत्व कुणी शिकू नये

    भर सायंकाळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला. एका क्षणात निर्णय घेतला.

    उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले.

  • 28 Jun 2022 05:21 PM (IST)

    बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल

    बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल

    हिंदूत्वाशी संबध नसलेलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत

    बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो

  • 28 Jun 2022 05:18 PM (IST)

    ठाण्याच्या भाईला इकडचे दादा भारी पडतील; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना इशारा

    माझ्या वाटेत ED बसले आहेत. माझ्या वाटेत कितीही आडवे आले तरी मी गुवाहाटीला जाणार नाही. मला अटक करा मी घाबरत नाही.

    महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे. 56 वर्षे शिवसेना सुरु आहे.

  • 28 Jun 2022 05:13 PM (IST)

    सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली; कोणत्याही क्षणी मोठा निर्णय होणार

    सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. कोणत्याही क्षणी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी जेठमलानी आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. फडणवीस अमित शहांशी देखील चर्चा करणार असल्याचे समजते.  आषाढ अमावस्येनंतर सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. बुधवारी सकाळी ८.४१ नंतरचा मुहुर्त असेल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  • 28 Jun 2022 05:07 PM (IST)

    मंत्र्यांनी वैयक्तिक कागदपत्रे घरी नेण्याची तयारी; महाविकास आघाडी सरकारची शेवटची बैठक?

    महाविकास आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे बैठकीसाठी मंत्रालयात येणार आहे.  उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीं  सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे.  मंत्र्यांनी वैयक्तिक कागदपत्रे घरी नेण्याची तयारी सुरु केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे.

  • 28 Jun 2022 04:50 PM (IST)

    एकनाथ शिंदेही म्हणाले काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल… एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण

    काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल असं म्हणत एकनाथ शिंदे सेलिब्रेशन मोडमध्ये दिसले.  एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राजकीय घडामोजींना वेग आला असतानाच  एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे गटाची बैठक पार पडली. आवाहनानंतर शिंदे गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

  • 28 Jun 2022 04:45 PM (IST)

    भजापचा सत्तेस्थापनेचा फॉर्मु्युला तयार? महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग; दिल्लीत हालचाली सुरु

    भजापचा सत्तेस्थापनेचा फॉर्मु्युला तयार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग असून दिल्लीत याबाबत हालचाली सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत अमित शाहांशीही चर्चा होणार असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा हा फॉर्म्युला आहे.

  • 28 Jun 2022 04:41 PM (IST)

    ठाकरे राजीनामा देणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा. शरद पवार हे देखील सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.

  • 28 Jun 2022 04:38 PM (IST)

    सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु, देवेंद्र फडणवीस जे. पी. नड्डांच्या भेटीला

    सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु झाल्यात.  देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे जे. पी. नड्डांच्या भेटीला गेले आहेत.  जे. पी. नड्डा यांच्या निवससस्थानी ही बैठक सुरु आहे.

  • 28 Jun 2022 04:24 PM (IST)

    येत्या काही वेळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार; महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटची बैठक मोठी घोषणा होणार

    येत्या काही वेळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे ही  महाविकास आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक ठरु शकते.

  • 28 Jun 2022 04:11 PM (IST)

    शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे सत्ता संघर्षावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे सत्ता संघर्षावर  सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजींबद्दल अभिमान वाटतो. या सर्व परिस्थितीत माँ आणि बाळासाहेबांची आठवण येते. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा. बाळासाहेबांनी अनेकांवर प्रेम केलं त्यात मी पण आहे.  ते स्वत: हायात असताना, उद्धवजींना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. जर उद्धवजी प्रेमाने काही आवाहन करत असतील, तर ते खरं आहे. राजकारण सुरु राहिल पण माणसं आणि नेत्यांचे एकमेकांशी असलेले संबध  टिकून राहतात.

  • 28 Jun 2022 04:06 PM (IST)

    मुख्यमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसह चर्चा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसह चर्चा करणार आहेत. महविकास आघाडीची सायंकाली 5 वाजता कॅबिनेट बैठक आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास त्यांची ही शेवटची बैठक ठरू शकते.

  • 28 Jun 2022 03:16 PM (IST)

    आपल्या भावनांचा मला आदर, समोर येऊन बोला मार्ग काढू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन

    आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

  • 28 Jun 2022 03:08 PM (IST)

    काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर, संजय सावंत यांचे मोठे वक्तव्य

    काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर केला. त्यांनी आनंद दिघे साहेबांचे पाय धुतांना एक तरी फोटो मला दाखवा. सिनेमा बघून शिवसैनिकांना वाटलं की कर्मवीरांचे हे कर्मवीर आहे. परंतु हे डुब्लीकेट निघाले असा घणाघाती आरोप संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जळगावच्या धरणगावात संपर्क अभियान दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

  • 28 Jun 2022 03:05 PM (IST)

    राष्ट्रवादी चे महत्वाचे नेते शरद पवारांना भेटत आहेत

    1. – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे रुटीन बैठका राष्ट्रवादी मंत्र्यांसोबत ,प्रमुख कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत घेत असतात
    2. -राष्ट्रवादी चे महत्वाचे नेते शरद पवारांना भेटत आहेत
    3. – राज्याच्या राजकीय वर्तमान घडामोडींवर परिस्थितीवर लक्ष राज्य शासनाचे ,शरद पवारांचं ,महाविकास आघाडीचा आहे
    4. – जसा वेळ जाईल तसे गुवाहाटी मध्ये असले आमदारांचा मोठा गट परतीच्या मार्गावर येईल
    5. – ज्या काही घटना मागील काही दिवसांमध्ये घडले याचा पश्चाताप त्यांना होईल ते मतदार संघामध्ये जातील मातोश्रीवर जातील
    6. – 2019 पासून भाजप या सरकारला पाण्याचा प्लान करत होती… हा प्लॅन कुठल्याही परिस्थितीत सक्सेसफुल होणार नाही
    7. – फ्लोअर टेस्ट साठी मागणी अद्याप कोणी केली नाही या सगळ्या चर्चा आहेत फ्लोअर टेस्ट पण मागील जो सरकार बनवण्यामध्ये सक्षम आहे
    8. – महाराष्ट्राचे सरकार अल्पमतात आलं अशा बातम्या येत आहेत मात्र महाराष्ट्राला पर्याय सरकार आम्ही देऊ असं कोणीच म्हणत नाहीये
    9. – तुम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा मागत आहे मात्र हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे ते ठरवतील कोणाचा राजीनामा घ्यायचा कोणाचे अधिकार काढायचे
  • 28 Jun 2022 02:30 PM (IST)

    बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

    सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याविरोधात राज्यातील काही सामाजिक कार्यकर्ते, आणि लेखक यांच्याकडून बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. सध्या सगळे राजकीय पक्ष आपली मते मांडत आहेत. पण यात सामान्य नागरिकांचा नेमकं काय मत आहे. याचा विचार कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. या लोकशाहीमध्ये नागरिकांचा देखील काहीतरी अधिकार आहे. यावर कुणीच काही बोलत नाही आणि म्हणून ही जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं सरोदे यांनी सांगितल आहे. आपलं कुठलेही राजकीय भान न ठेवता सगळे आमदार आणि मंत्री राज्य सोडून निघून गेले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे देखील आम्ही याचिकेत नमूद केलं असल्याचं असीम सरोदे यांनी स्पष्ट केल आहे.

  • 28 Jun 2022 02:25 PM (IST)

    संजय राऊतांना ईडीचा तूर्तास दिलासा

    संजय राऊतांना ईडीचा तूर्तास दिलासा, आज चौकशीला हजर राहण्याचा आदेश ईडीने दिला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी वकीलांमार्फत वेळ मागितला होता. त्यावर कोर्टान दिलासा दिला.

  • 28 Jun 2022 02:19 PM (IST)

    आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे – जयंत पाटील

    आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचा कारभार थांबवता येत नाही. महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही मंत्री झालो आहे. काही आमदार सहलीला गेलेत आणि ते तिकडे रमले आहेत. झाडी, डोंगर, बघतायेत सगळे.. एवढ्या कोटीचा जनतेचा कारभार आहे तो कसा थांबवायचा. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे आणि आमचं काम चालू आहे. अविश्वास प्रस्ताव आणला तर काय ? प्रश्न विचारताचं ही कायदेशीर बाब आहे असं जयंत पाटील म्हणाले. आमचं सरकार आहे आणि चिंता करण्याचं कारण नाही. कायदा आहे आणि न्यायव्यवस्था आहे. सभागृहात आमच्या सरकारविषयी कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. अशी प्रतिक्रिया जयंत पाटल यांनी दिली आहे.

  • 28 Jun 2022 02:08 PM (IST)

    नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे द्यावे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिल्याचे माहिती मिळाली आहे. बाळासाहेबांचे नाव मी दिले नाही. दि बा पाटील यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर दिली माहिती. जे नाव एकनाथ यांनी दिले त्याला माझा विरोध नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • 28 Jun 2022 02:03 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या विमानतळावर दाखल, महाराष्ट्रातील राजकारणावरती महत्त्वाची बैठक होणार

    देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील राजकारणावरती महत्त्वाची बैठक होणार आहे.

  • 28 Jun 2022 01:57 PM (IST)

    कॅबिनेट बैठक पुढे ढकलली, आज सायंकाळी होण्याची शक्यता

    कॅबिनेट बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. संध्याकाळी कॅबिनेट बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी अडीच वाजता बैठक होणार होती.

  • 28 Jun 2022 01:43 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात बंडखोर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फ्लेक्स लागलेत

    -सोमवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आकुर्डीत पार पडली, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले, त्यानंतर आज शहरात काही ठिकानी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फ्लेक्स लागलेले दिसतायत

  • 28 Jun 2022 01:33 PM (IST)

    एकनाथ शिंदे गुवाहाटीतील हॉटेल बाहेर पहिल्यांदा, दिल्लीला जाण्याची शक्यता

    दीपक केसरकर आमचे प्रवक्ते, ते वेळोवेळी माहिती देणार, प्रवक्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहीत मिळेल, सगळे लोक अगदी आनंदात आहे, जी बाहेरुन सांगत आहेत की एवढे संपर्कात, तेवढे संपर्कात सांगत आहेत, त्यांनी नावं सांगावी, आम्ही खुलासे करु, इथे पन्नास लोक आहेत… इथे स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीही आलेलं नाही. बाळासाहेबांची आणि हिदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पुढील माहिती केसरकर देतील.. पुढची दिशा लवकरच स्पष्ट करु.

  • 28 Jun 2022 01:27 PM (IST)

    नाशकात शिंदे समर्थकांच्या आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी

    नाशकात शिंदे समर्थकांच्या आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी आहे. शिवसेना वैद्यकीय आघाडी शिंदेंच्या पाठीशी आहे. मविआ सरकारच्या विरोधात आज आंदोलन करणार होते. शिंदे समर्थकांच्या घरावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करणार होते. जमावबंदी लागू असल्याचं पोलिसांनी कारण दिलंय. सेनेने विरोध केला तरी शिंदेंच्या सोबत असण्यावर समर्थक ठाम आहेत.

  • 28 Jun 2022 01:15 PM (IST)

    मी आजही शिवसेनेतच असल्याचे आमदार उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

    मी आजही शिवसेनेतच असल्याचे आमदार उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

    गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

    राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काँग्रेस – राष्ट्रवादी या घटकपक्षांनी प्रयत्न केले.

    त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

  • 28 Jun 2022 01:05 PM (IST)

    महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय जाहीर करा, आम्ही आजही यायला तयार – दीपक केसरकर

    जी काय वस्तूस्थिती ती आम्ही समोर आणू. आम्ही शिवसेनेच्या हितासाठी बाहेर पडलो आहे. विश्वासदर्शक ठराव तर आणा. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय जाहीर करा, आम्ही आजही यायला तयार…मला जर उद्या कुणी गद्दार म्हणालं तर आम्ही त्याला उद्या जाबं विचारणार…संजय राठोडांसाठी दादा भुसे यांनी लढा दिला आहे. पैशाने सुध्दा काही गोष्टी सुटत नाही. आत्ता मी शांत शब्दात बोलत आहे.

    आदित्य ठाकरेंनी आपली भाषा सुधारावी. कारण त्यांच्याकडे आम्ही एक नेतृत्व म्हणून पाहतोय. त्यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा करू नये. आम्ही युतीचे आमदार आहोत, त्यामुळे संजय राऊत यांनी विचार करून बोलायलं हवं.

    फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने मला काहीचं प्रॉब्लेम नाही. परंतु ते आमच्या साहेबांच्या अर्शिवादाने मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा…त्यांनी एकदा आम्ही काय म्हणतोय त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. संभाजीनगरच्या नावाला कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी विरोध केला

  • 28 Jun 2022 12:34 PM (IST)

    एकनाथ शिंदे आज दिल्लीत दाखल होण्याची शक्यता

    एकनाथ शिंदे आज दिल्लीत दाखल होण्याची शक्यता,

    फडणवीस दिल्लीकडे रवाना

  • 28 Jun 2022 12:28 PM (IST)

    एकनाथ शिंदे हा विषय आमच्यासाठी संपला आहे – अर्जुन खोतकर

    हे सगळे बंडखोर गुवाहाटीत बसून कारस्थान करतायत त्यांनी आधी महाराष्ट्रात यावे आणि मग बोलावे तिथे आमदारांना डांबून ठेऊन हे सरकार स्थापनेचा विचार करत आहेत. एकनाथ शिंदे हे कसल्या मुक्तीची भाषा करत आहेत. शिवसेना हा शिवसैनिकांचा आत्मा आहे, आणि आमचा आत्मा आमच्यापासून कुणीही वेगळा करू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची अजूनही सेनेसोबत यायची इच्छा आहे. एकनाथ शिंदे हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आता शिवसेनेत एक व्यक्ती जरी उरला तरी आम्ही एकाचे लाख करू इतकी ताकत आमच्यात आहे असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

  • 28 Jun 2022 12:26 PM (IST)

    मोहित कंबोजचं सूचक ट्विट

  • 28 Jun 2022 12:17 PM (IST)

    जयसिंगपूर राडा याप्रकरणी दोन्ही बाजूच्या दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

    1. जयसिंगपूर राडा याप्रकरणी दोन्ही बाजूच्या दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
    2. शिवसेना समर्थक आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर समर्थक जयसिंगपूर मध्ये आले होते आमने-सामने
    3. विनापरवाना मोर्चा आणि बेकायदेशीर जमाव केल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    4. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
    5. शिवसेना जिल्हाप्रमुख मूरलीधर जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल

  • 28 Jun 2022 12:11 PM (IST)

    खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे पंढरपुरात दहन

    रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध सामन्याच्या अग्रलेखातून सुरक्षेबाबत आणि त्यांच्याबद्दल टीका करण्यात आली. यानंतर पंढरपुरात रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सामन्याचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पंढरपुरात दहन केले. तसेच राऊत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.
  • 28 Jun 2022 11:59 AM (IST)

    बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते विमानतळावर जाणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती

    1. – बंडखोर आमदारांना मुंबई विमानतळावरून रिसीव करण्यासाठी भाजपचे आमदार विमानतळावर जाणार
    2. – आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश देण्यासाठी भाजपाचे आमदार विमान तळावर जाणार
    3. – शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा निर्णय
    4. – विमानतळ असे विधान भवनापर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार
    5. – भाजपातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 28 Jun 2022 11:53 AM (IST)

    समाधान सरवणकर यांची युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी

    1. समाधान सरवणकर यांची युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी
    2. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी
    3. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टी

  • 28 Jun 2022 11:52 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती, अमित शहांची भेट घेण्याची शक्यता

    देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती, अमित शहांची भेट घेण्याची शक्यता

  • 28 Jun 2022 11:47 AM (IST)

    सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला? शिवसेना म्हणते, भूलथापांना बळी पडू नका

    सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये असं शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

  • 28 Jun 2022 11:45 AM (IST)

    शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांची भेट घेतली

    शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांची नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन घेतली भेटशिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे गेले होते.

  • 28 Jun 2022 11:37 AM (IST)

    आम्ही निश्चित वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे – सुधीर मुंनगटीवार

    सरकार काही पैसे कमावण्याचे उद्योग करीत असल्याची शंका आल्याने राज्यपालांना पत्र देण्यात आले. त्यांच्यावर भाष्य करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. काय भाष्य करतील याचा काही नेम नाही. जेवढे दिवस आवश्यकता आहे. तेवढे दिवस शांत राहणार. महाराष्ट्रातल्या जनतेचा अनादार केला. त्यामुळे आम्ही निश्चित वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे. त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी तो जनहिताचा निर्णय घ्या. समानाबाबत फार भाष्य करणं त्यांचं वितरण वाढवण्याचा काम आहे. परिस्थिती पाहुन आम्ही त्यावर विचार करू. आम्ही ते पाहत आहोत, त्यामुळे थांबून आम्ही त्यावर निर्णय घेऊ…

  • 28 Jun 2022 11:28 AM (IST)

    उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती

    मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मागच्या आठदिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत.  त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • 28 Jun 2022 11:14 AM (IST)

    मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे – रुपाली पाटील-ठोंबरे

    हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे असं विधान मनसेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलं आहे. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती नेमकी कुणामुळे आहे. त्यात नेमका कुणाचा दबाव आहे. कोण सत्तेसाठी काय करत आहे. हे आता वारंवार सांगण्याची गरज नाही असं सांगत रूपाली ठोंबरे यांनी नाव न घेता भाजपावर देखील टीका केली. ज्यावेळी भगवान रामांना वनवासात जायची वेळ आली होती त्यावेळेस त्यांचा भाऊ लक्ष्मण सगळ सोडून त्यांच्यासोबत गेले होते.आता देखील राम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे असं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावी अशी इच्छा देखील रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

  • 28 Jun 2022 11:06 AM (IST)

    मुख्यमंत्री तुम्ही आहात म्हणून सेन्सॉरशिप लावणार का ?

    मुख्यमंत्री तुम्ही आहात म्हणून सेन्सॉरशिप लावणार का ? धर्मवीर या चित्रपटाच्या या सीनवरूनच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं अमेय खोपकरांच यांनी वक्तव्य केलं. या शिवसेनेच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मात्र राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जातायेत. मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंच कौतुक आवडलं नसावं म्हणून त्यांनी लवकर चित्रपटगृह सोडलं असावं. बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतलेली ती वैयक्तिक मते योग्य आहे. येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत मनसे हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. राज ठाकरे आता घरी आहेत त्यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

  • 28 Jun 2022 11:03 AM (IST)

    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदेशाने झाली शहर युवा अधिकारी सागर जेधे यांची हकालपट्टी

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष शिगेला पेटलाय. त्यातच अनेक ठिकाणी आंदोलन करत व बॅनरबाजी करत आपल्या नेत्यांना समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे डोंबिवली मधल्या युवासेनेच्या शहर युवा अधिकारी सागर जेधे यांनी देखील बॅनर बजी करत एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दिले. त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे यांना यांच्या समर्थनाची पोस्ट सोशल साईट वरती वायरल केली. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याच्या कार्यकर्ता मेळावा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित न राहिल्याने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • 28 Jun 2022 10:54 AM (IST)

    maharashtra politics news : डोंबिवली कल्याण ग्रामीणमध्ये एकनाथ शिंदे समर्थकांनी फटाके फोडले

    शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनी डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरात नारेबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला.

  • 28 Jun 2022 10:47 AM (IST)

    maharashtra government news today : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध, अमेय खोपकर याचं ट्विट

  • 28 Jun 2022 10:46 AM (IST)

    एकीकडे सत्तेसाठी राजकारण, दुसरीकडे शेतकऱ्यांवर उपासमारी; शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त हाक

    सद्या शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारल्याने सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वन्य प्राण्यांचा संचार समृध्दी महामार्गावर होऊ नये, याकरिता 15 फूट उंच भिंत रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आली आहे. मात्र हीच भिंत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणते आहे. या भिंतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्यात.

  • 28 Jun 2022 10:43 AM (IST)

    शिवसेनेतील संकट दूर होण्यासाठी सांगलीत कार्यकर्त्यांकडून लोटांगण

    सांगली – शिवसेनेवरील संकट दूर व्हावे यासाठी सांगलीच्या शिवसैनिकांकडून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालण्यात आले. शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्यासोबत शिवसैनिकांनी हे लोटांगण लातले. शिवसेनेवरील संकट दूर करीत हिंदुत्वामध्ये पडणारी फूट थांबवण्याचे साकडे घालण्यात आले. सांगलीतून गेलेल्या शिवसैनिकांनी प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते गडावरील तुळजा भवानी देवीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालीत आई तुळजा भवानीला शिवसेनेवरील संकट दूर करण्याबाबतचे साकडे घातले. यामध्ये सांगलीतील अनेक शिवसैनिकही सहभागी झाले आहेत.

  • 28 Jun 2022 10:34 AM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक, ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट ठरणार का ?

    आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. दुपारी अडीच वाजता होणार मंत्रिमंडळाची बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट ठरणार का याकडे लक्ष सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती आज कॅबिनेट बैठक आहे.

  • 28 Jun 2022 10:24 AM (IST)

    ते जोपर्यंत ते महाराष्ट्रात येत नाहीत, तो पर्यंत मी आशावादी आहे – संजय राऊत

    ते जोपर्यंत ते महाराष्ट्रात येत नाहीत. तोपर्यंत आम्ही आशावादी आहे. अनेक ठिकाणी लोकांचा जनसागर पाहायला मिळाला आहे. आमचं सुध्दा वेट आणि वॉच करीत आहोत. लवकरचं ठाण्यात सुद्धा अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या जे काय डबकं झालंय. त्यात उतरू नये. डबक्यात बेडूक राहतात, त्यामुळे त्यांनी शांत रहावं. त्यामुळे पक्षासह त्यांनी मोठी प्रतिष्ठा घसरली जाईल.

    आज संजय राऊतांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. परंतु मी आत्ताचं ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर याच्यानंतर इतर राज्यात देखील अशीचं परिस्थिती पाहायला मिळणार आहे. आमच्यावरती कितीही अन्याय केला तरी आम्ही त्यांना झुकणार नाही.

  • 28 Jun 2022 10:17 AM (IST)

    Eknath Shinnde : कुर्ल्यात दुर्घटनेत सरकारी मदतीआधी शिंदेची मदत!

    कुर्ल्यात दुर्घटनेत सरकारी मदतीआधी शिंदेची मदत!

    कुर्ल्यात इमारत कोसळली

    एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांच्याकडून दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात

    आर्थिक मदतीच्या थेट गुवाहाटीतून सूचना

    मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

    जखमींना 1 लाखांची मदत

  • 28 Jun 2022 10:10 AM (IST)

    Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधव चिपळुणात परतले

    रत्नागिरी- : शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळुणात परतले

    गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांचा मुंबईत मुक्काम होता

    चिपळूण भास्कर जाधव आज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार

    पुढील दोन दिवस भास्कर जाधव यांचा मुक्काम चिपळूणमध्येच असणार

  • 28 Jun 2022 10:06 AM (IST)

    Pratap Patil Chikhlikar : आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी महापूजा फडणवीसच करतील- चिखलीकर

    दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार येणार अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

    भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विश्वास

    आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी महापूजा फडणवीसच करतील

    शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदेसोबत येतील

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही

  • 28 Jun 2022 09:52 AM (IST)

    येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल

    येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा फडणवीस करतील. शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे सोबत येतील. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं

  • 28 Jun 2022 09:49 AM (IST)

    असीम सरोदे यांच्या मदतीने सजग नागरिकांनी दाखल केली जनहित याचिका

    एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे ऑफिस जॉईन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका महाराष्ट्रातील 7 सजग नागरिकांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाखल केली

  • 28 Jun 2022 09:43 AM (IST)

    राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवले, संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला

    1. मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला
    2. ‘राज ठाकरेंनी कारकूनला सामनाचा संपादक बनवलं हे विसरू नका’
    3. दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं संदिप देशापांडेचा ट्टिट करत राऊतांना टोला लगावला
  • 28 Jun 2022 09:42 AM (IST)

    जळगाव येथील कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना समर्थन

    जामनेर येथे युवा सेनेच्या 51 कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून व रक्ताने अंगठ्याचे ठसे उलटून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना समर्थन दिले आहे. गद्दारांनी पक्ष संकटात आणला आहे मात्र कार्यकर्त्यांच्या नसानसात रक्ताच्या प्रत्येक थेंबात शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आहेत त्यामुळे युवा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सदैव आपल्या सोबत असून ही खिंड लढवली यासाठी आम्ही सज्ज आहोत, तोफेचे बार ऐकल्याशिवाय एकही कार्यकर्ता हा मागे हटणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

  • 28 Jun 2022 09:37 AM (IST)

    राज्यातील उद्भवलेली राजकीय परिस्थिती पाहता पोलीस दलाला मनुष्यबळाची गरज, पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द

    1. राज्यातील उद्भवलेली राजकीय परिस्थिती पाहता पोलीस दलाला मनुष्यबळाची गरज
    2. पुणे पोलिसांच्या 28 जून ते 12 जूलैपर्यंत सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय
    3. वैद्यकीय रजा वगळून साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात येत आहेत असा काढला आदेश
    4. आदेश पोलीस महासंचालकांना पाठवल्याची सूत्रांची माहिती
    5. मात्र पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टया केल्या रद्द
    6. पुण्यातही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे घेतला निर्णय
  • 28 Jun 2022 09:36 AM (IST)

    भास्कर जाधव चिपळुणला परतले,

    रत्नागिरी- शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळुणात परतले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांचा मुंबईत मुक्काम होता. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आज घेणार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पुढील दोन दिवस भास्कर जाधव यांचा मुक्काम चिपळूण मध्येच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 28 Jun 2022 09:31 AM (IST)

    12 जुलाई रोजी होणारी महाराष्ट्र भाजपची कार्य समितीची बैठक रद्द

    1. 12 जुलाई रोजी होणारी महाराष्ट्र भाजपची कार्य समितीची बैठक रद्द
    2. औरंगाबाद येथे होणार होती बैठक
    3. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द
    4. या बैठकीला खुद्द अमित शाह देखील उपस्थित राहणार होते

  • 28 Jun 2022 09:15 AM (IST)

    आज संजय राऊतांचा अलिबागमध्ये एल्गार, ट्वीटच्या माध्यमातून दिली माहिती

  • 28 Jun 2022 09:08 AM (IST)

    राज्यपाल कोश्यारींचं मुख्यसचिवांना पत्र, 3 दिवसात मंजूर केलेल्या जीआरची माहिती मागितली

    राज्यपाल कोश्यारींचं मुख्यसचिवांना पत्र,

    3 दिवसात मंजूर केलेल्या जीआरची माहिती मागितली

  • 28 Jun 2022 08:46 AM (IST)

    आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे – दीपक केसरकर

    आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

  • 28 Jun 2022 08:40 AM (IST)

    ठाकरेंनी योग्य निर्णय घ्यावा, आम्ही त्यांचा आदरकरीत असल्याने पत्र देत आहोत – उद्धव ठाकरे

    आम्हाला थोडासा वेळ मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ठाकरेंनी योग्य निर्णय घ्यावा, कारण आमच्या प्रेमापोटी आम्ही त्यांना पत्र देत आहोत. त्यांनी मित्र पक्षांशी चर्चा करावी, कारण ते कुठे दुखावले आहेत. हे सुद्धा तपासून पाहावे लागेल.

  • 28 Jun 2022 08:23 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाला मोठा झटका, माजी आमदार नारायण पाटील शिंदे गटात सामील

    करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाला मोठा झटका बसला आहे. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुक लढविली होती.परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेवर नाराज होते. शिवसेना आमदारांच्या बंडा नंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

  • 28 Jun 2022 08:17 AM (IST)

    कोल्हापूरात बंडखोर आमदारांच्या प्रतिमेला काळ फासलं, शिवसैनिक आक्रमक

    कोल्हापूरात बंडखोर आमदारांच्या प्रतिमेला काळ फासलं, शिवसैनिक आक्रमक

    शिवसेनेचा बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी मधून समता पाहायला मिळतोय.कोल्हापुरातील आर के नगर चौकीत शिवसैनिकांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे, प्रकाश आबिटकर,माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमेला काळ फासून त्यांचा निषेध केला. तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तसेच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बंडखोर आमदार आणि आता निवडून येण्याचा स्वप्नही पाहू नये असा इशाराच यावेळी या शिवसैनिकांनी दिलाय.

  • 28 Jun 2022 07:52 AM (IST)

    मनचे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन आहे – दिपाली सय्यद

  • 28 Jun 2022 07:32 AM (IST)

    शिंदे 48 तासात केंद्राच्या सुरक्षेसह मुंबईत येण्याची शक्यता, शिंदे गटच शिवसेना असल्याचा करणार दावा

    1. शिंदे 48 तासात केंद्राच्या सुरक्षेसह मुंबईत येण्याची शक्यता
    2. शिंदे गट आज राज्यपालांना पत्र पाठवण्याची शक्यता
    3. मविआ सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार-सूत्र
    4. भाजपसोबत युती करण्याची मागणी पत्राद्वारे करणार- सूत्र
    5. शिंदे गटच शिवसेना असल्याचा करणार दावा
  • 28 Jun 2022 07:25 AM (IST)

    संजय राऊतांचं नवं ट्विट

  • 28 Jun 2022 07:19 AM (IST)

    सोनिया गांधी यांच्या स्वीय सहाय्यकाचा महिलेवरती बलात्कार, लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

    सोनिया गांधी यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वीय सहाय्यक पीपी माधवन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतल्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नोकरी आणि लग्नाच आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि अत्याचार, असा आरोप माधवन यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित महिलेचा पती काँग्रेस कार्यालयात कर्मचारी होता. पतीच्या निधनानंतर पीडित महिलेला माधवनने आमिष दाखवून अत्याचार केले आहेत. माधवन यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

  • 28 Jun 2022 07:00 AM (IST)

    बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार, भाजप सोबत युती करण्याची विनंती करणार

    बंडखोर आमदारांची नवीन भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदार पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अविश्वास ठराव काढून घेतल्याच्या पत्रापूर्वी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले जाणार आहे. भाजप सोबत युती करण्याची विनंती बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांना करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या बंडखोर आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच आहे.

  • 28 Jun 2022 06:47 AM (IST)

    बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतण्यापूर्वी निमलष्करी दलाला पाचारण केले जाणार

    महाराष्ट्रात निमलष्करी दल पाचारण केले जाणार आहे. राज्यपालांची विनंती केंद्र सरकार मान्य करणार सूत्रांनी माहिती दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतण्यापूर्वी निमलष्करी दलाला पाचारण केले जाणार आहे. कायदा सुव्यवस्था बाबत परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र दिलं आहे. राज्यपालांच्या पत्राला केंद्र सरकार सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या तयारीत आहे.

  • 28 Jun 2022 06:37 AM (IST)

    एक अब्दुल सत्तार नेला, आम्ही मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, शिर्डीत उद्धव ठाकरेंचे आक्रमक

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिर्डी येथे शिवसैनिकांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात भगवा ध्वज घेऊन मुस्लिम शिवसैनिक देखील सहभागी झाले होते. ‘त्यांनी एक अब्दुल सत्तार नेला मात्र आम्ही हजारो मुस्लिम मावळे उद्धव ठाकरेंच्या सोबत असून आम्ही मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार ‘ अशी भावनिक प्रतिक्रिया अजीज मोमीन या मुस्लिम शिवसैनिकाने व्यक्त केली.

  • 28 Jun 2022 06:32 AM (IST)

    महाराष्ट्राने ही पापं स्वीकारली? सामनातूनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका

    बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि है असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे. “महाराष्ट्राचे तुकड़े करणाऱ्यांचे तुकड़े करू, ” असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हो स S S ,” म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोड़े बंद पड़तील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढ़े दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित अहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?

  • 28 Jun 2022 06:26 AM (IST)

    डोंबिवलीतील शाखेतून एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचे फोटो हटवले, दोन गटातील समर्थक आमनेसामने

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष शिगेला पेटलाय . त्यातच डोंबिवलीतील शहर शाखेत असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातील एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढल्याचे दिसून आले  . शिंदे पिता पुत्राचे फोटो काढल्याचे कळताच शिंदे समर्थक शाखेत आले असता शिवसेना पदाधिकारी  व त्यांच्यात वाद झाले .  शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानी फोटो काढून खासदार कार्यालयातील कर्मचाऱ्याना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली .मात्र  शिवसेना पदाधिकारी ,शिंदे समर्थकांनी याबाबत असे काही झाले नाही अस सांगत काहीही बोलण्यास नकार दिला .शिवसेना पदाधिकारी  ,शिंदे समर्थक ,पोलिसांनी देखील या प्रकरणी चुप्पी साधली असली तरी शाखेतील खासदार कार्यालयातून शिंदे पिता पुत्राचे फोटो कुणी काढले असा सवाल करत शाखेत झालेल्या या वादाची चर्चा शहरात रंगली आहे .

  • 28 Jun 2022 06:21 AM (IST)

    महाविकास आघाडीचा पाठींबा काढण्याचं पत्र शिंदे गट आज राज्यपालांना देणार

    महाविकास आघाडीचा पाठींबा काढण्याचं पत्र शिंदे गट आज राज्यपालांना देणार

    योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ – सुधीर मुनगुंटीवार

  • 27 Jun 2022 09:38 PM (IST)

    ‘मातोश्री’वर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक, तासभर चर्चा, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेल – पटोले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय.

  • 27 Jun 2022 07:44 PM (IST)

    गुवाहटीतला मुक्काम वाढला-सूत्र

    एकनाथ शिंदे यांच्या गोटातून बातमी

    गुवाहाटी – बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला. हॉटेल रेडिसन ब्लू अनिश्चित काळासाठी बुक. शिंदे गटाकडून हॉटेलचं बुकिंग पुन्हा वाढवलं सूत्रांची माहिती. 12 जुलै पर्यंत आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच ? 30 जूनपर्यंत होत हॉटेलचे बुकिंग, पण आता अनिश्चित काळासाठी हॉटेलचे बुकिंग करण्यात आल्याची सूत्रांची माहिती.

  • 27 Jun 2022 07:18 PM (IST)

    वेट अँड वॉचची भूमिका कायम

    सुधीर मुनगंटीवार LIVE

    भारतीय जनता पार्टीची बैठक संपली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सर्व परिस्थितीवर चर्चा झाली. एकनाथ शिंदेंनी जो दावा केलाय की तेच ओरिजनल शिवसेना आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. सध्या तरी भाजपाची भूमिका वेट अँड वॉचची आहे. भविष्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. जस जसे शिंदे गटाचे प्रस्ताव येतील तसतसे भाजपची कोअर टीम बैठक घेऊन निर्णय घेईल. सरकार स्थापनेवर कुठलीही चर्चा भाजपच्या बैठकीत नाही. रोज होणाऱ्या घटना बघूनच भाजपा त्यावर निर्णय घेईल. ते स्वत:ला बंडखोर मानत नाहीत तर ते चोवीस कॅरेट शुद्ध शिवसैनिक आमदार. बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भाजपचं काही देणे घेणे नाही. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव नाही. आम्हाला आज तरी विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची गरज वाटत नाही. दोन तृतीयांश ज्यांच्याकडे ते ओरिजनल.

  • 27 Jun 2022 06:41 PM (IST)

    आदित्य ठाकरे LIVE

    शिवसेनेच्या सभेतून बातमी

    बंडखोर आमदार खोटं बोलत आहेत. शिवसेना नावाचा गट बनूच शकत नाही. तुम्ही आम्ही जे आहोत तिच शिवसेना आहे.फुटीरवाद्यांकडे दोनच पर्याय-भाजपात विलिन व्हा, मनसेमध्ये विलिन व्हा, प्रहारमध्ये विलिन व्हा. मी ह्या फुटीरतावाद्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही. मी ह्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारेन की तुमच्यासाठी काय कमी केलं आम्ही. हिंमत असेल तर राजीनामा द्या, किती कोटीची बोली लावली, पस्तीस कोटी, पन्नास कोटी, माझ्या आजोबानं, पंजोबानं सांगितलंय, पैसा येतो, पैसा जातो पण एकदा नाव गेलं ना ते परत येत नाही. ज्यांनी बंडखोरी केली त्यांचं निशाण राहिलेलं नाही. बंडखोरी मागे घ्यायची असेल तर उद्धव साहेबांची माफी मागा. प्रत्येकाला पाडल्याशिवाय रहाणार नाही.

  • 27 Jun 2022 06:13 PM (IST)

    शिंदे गट कुठल्याही पक्षात विलिन होणार नाही

    बातमी थेट गुवाहटीतून

    एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत राज्यपालांना पत्रही पाठवलं जाणार आहे. ते पत्रही तयार झालं असून आमदारांच्या स्वाक्षरी या पत्रावर घेतल्या जाणार आहेत. अशावेळी शिंदे गटाकडून अजून एक मोठी माहिती समोर आलीय. शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. आम्हीच खरी शिवसेना असा दावा या गटातील आमदारांकडून करण्यात येत आहे. शिंदे गटात आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये आमदारांनी हीच भूमिका मांडली आहे. इतकंच नाही तर शिवसेना बाळासाहेब असं नावही या गटानं निश्चित केलं होतं. मात्र, शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ते वापरू शकत नाहीत, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय.

  • 27 Jun 2022 05:49 PM (IST)

    मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा

    बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.  सर्व पक्षीय बैठकांचा जोर वाढला आहे.  मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या बैठकीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळलाी आहे. प्रसाद लाड, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

  • 27 Jun 2022 05:41 PM (IST)

    बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाच्या गुवाहाटीतील बैठकीत भाजपच्या बड्या नेत्याची उपस्थिती? 

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर आमदारांच्या गटाने जल्लोष साजरा केला. या गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पत्र लिहून यावर सर्व बंडखोर आमदारांच्या सह्या घेतल्या जामार आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीतील रेडीसन हॉटेलमध्ये बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाची अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला भाजपच्या बड्या नेत्याची उपस्थिती असल्याची चर्चा आहे. भाजपचा एक बडा नेता ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला हजर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  • 27 Jun 2022 05:33 PM (IST)

    एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना सुरक्षा देणे हे केंद्राची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

    संजय राऊत काहीही बोलतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे.  त्यामुळे त्याच्याशी आमचे काहीही देणंघेणं नाही. जर गरज असेल तर एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना सुरक्षा देणे हे केंद्राची जबाबदारी आहे. कारण राज्य सरकार सुरक्षा देण्यासाठी कमी पडत आहे असं भाजप नेते चंद्रकात पाटील म्हणाले.

  • 27 Jun 2022 05:29 PM (IST)

    आदित्य ठाकरेंनी घेतली माथेरानच्या जखमी संपर्क प्रमुखची भेट

    माथेरानचे शिवसेना (Matheran Shivsena) संपर्क प्रमुख माजी नगरसेवक प्रसाद सावंत (Shivsena Leader Prasad Sawant) यांच्यावर 15 ते 16 शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात (Attack) ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबोली येथील  एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.  आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात झाऊन सावंत यांची भेट घेतली. आदित्य यांनी सावंत यांच्या तब्येतीची विचार पूस केली. “प्रसाद घाबरू नकोस” शिवसेना तूझ्या पाठीशी आहे” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांना धीर दिला.

  • 27 Jun 2022 05:21 PM (IST)

    आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी; एकनाथ शिंदे यांचे आवाहन

    यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत. असा व्हिडिओ शंभूराजे देसाई यांनी शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटला एकनाथ शिंदे यांनी रिट्वीट करत रिप्लाय केला आहे.

    आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेच्या भूमिकेला विरोध होत आहे.

  • 27 Jun 2022 05:16 PM (IST)

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय – एकनाथ शिंदे

    सुप्रिम कोर्टाने बंडखोर आमदारांना 11 जुलै पर्यत दिलासा आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

  • 27 Jun 2022 05:06 PM (IST)

    मातोश्री वर जाऊन माफी मागा अन्यथा जिल्यात फिरू देणार नाही; संजय राठोड विरोधात शिवसैनिक आक्रमक

    यवतमाळ :  एकनाथ शिंदेंसह गेलेल्या बंडखोर आमदारांच्या गटात संजय राठोड यांचाही समावेश आहे. संजय राठोड यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी संजय राठोड विरोधात मोर्चा काढून राठोड यांचा पुतळा जाळला. शहरातील दत्त चौकात शिवसैनिकाकडून हे आंदोलन करण्यात आले.  मातोश्री वर जाऊन माफी मागा अन्यथा जिल्यात फिरू देणार नाही असा इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे.

  • 27 Jun 2022 05:00 PM (IST)

    आमदारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चा करणार गृमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मातोश्रीवर दाखल

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सप्रिम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा करणार

    आमदारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चा करणार

  • 27 Jun 2022 04:50 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मातोश्रीवर येणार

    गृहमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मातोश्रीवर येणार

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह चर्चा करणार

    सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या घडामोडींवर खलबतं

  • 27 Jun 2022 04:48 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या हालचाली वाढल्या

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या हालचाली वाढल्या

    कोअर कमिटी बैठक, फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची रांग

    सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हिक्ट्री साईनचा अर्थ काय?

  • 27 Jun 2022 04:33 PM (IST)

    बंडखोरांचे बळ वाढणार; मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा एकनाथ शिंदे गटाला फक्त पाठिंबाच नाही तर संरक्षणही देणार

    मराठा क्रांती मोर्चाचा एकनाथ शिंदें व तानाजी सावंत यांना पाठिंबा

    मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन असो वा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मागणयासाठी केलेले आंदोलन असो, मराठा क्रांती मोर्चाने व मराठा क्रांती ठोक मोर्चा यासाठी अनेक आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनावेळी ज्या मराठा आमदारांनी उघडपणे मदत करण्याची भूमिका घेतली त्यात एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे हे कायम मराठा तरुणांसाठी हक्काचे आमदार – मंत्री रहिले आहेत. त्यामुळे आज हिंदुत्वाची हक्काची लढाई एकनाथ शिंदे व तानाजी सावंत लढत असताना मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा याबाबतीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील असे प्रतिपादन महेश डोंगरे यांनी केले आहे. मराठा द्वेष्टा संजय राऊत हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत असलेल्या आमदारांना जीव मारण्याच्या धमक्या देत असताना मराठा क्रांती मोर्चा शांतपणे हा घटनाक्रम बघत बसेल असे जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती मूक मोर्चा फक्त पाठिंबाच देणार नाही तर एकनाथ शिंदे साहेब, तानाजी सावंत साहेब व इतर आमदारांसह जेव्हा मुंबईत येतील तेव्हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना पूर्ण संरक्षण देईल

  • 27 Jun 2022 04:27 PM (IST)

    आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आम्ही शिवसेना सोडली नाही – श्रीकांत शिंदे

    आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आम्ही शिवसेना सोडली नाही

    मात्र तुमचे पक्षप्रमुख कोण आहेत ? उद्धव ठाकरेंच नाव घेताचं श्रीकांत शिंदेंनी बोलणं टाळलं

    एकनाथ शिंदेंच फोनवरून अभिनंदन केलं ती एक मोठी लढाई लढतायेत आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत

    सत्याचा विजय झाला असं म्हणेनं

    नवीन सरकारचे फटाके लवकरच फुटतील

    श्रीकांत शिंदे यांच वक्तव्य

  • 27 Jun 2022 04:23 PM (IST)

    20 बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, दगाफटका झाला तर हे आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील; अनिल देसाईंचा दावा

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेचा निर्णय ११ जुलैपर्यंत पुढे गेलेला आहे. हा महाविकास आघाडीचा धक्का मानण्यात येतो आहे. आता एकनाथ शिंदेंसोबतचे समर्थक राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र देणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही शिवसेनेच्या नेत्यांना सत्ता राखू असा विश्वास वाटतो आहे. बंडखोर आमदारांपैकी २० आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, हे आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वास शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दावा केला आहे. दिल्लीत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर देसाई पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

  • 27 Jun 2022 04:18 PM (IST)

    शिंदे यांच्यासोबतचे आमदार हीच शिवसेना असल्याचा दावा; इतर आमदार आमच्यासोबत आले नाहीत तर अपात्र होणार

    एकनाथ शिंदे गटाचा मोठा दावा

    शिंदे यांच्यासोबतचे आमदार हीच शिवसेना असल्याचा दावा

    इतर आमदार आमच्यासोबत आले नाहीत तर अपात्र होणार

    एकनाथ शिंदे गटाचा दावा

    शिवसेनेसाठी धक्कादायक बातमी

  • 27 Jun 2022 04:11 PM (IST)

    SC on Eknath Shinde vs Shiv Sena LIVE : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

    महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार

  • 27 Jun 2022 04:04 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण; ट्विट करत संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

    काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असं ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

  • 27 Jun 2022 03:50 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

    सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

    11 जुलैला पुढील सुनावणी

    बंडखोर आमदारांना तूर्तास दिलासा

    आता महाराष्ट्रात येणार की 11 जुलैपर्यंत गुवाहाटीतच मुक्काम?

    राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • 27 Jun 2022 03:46 PM (IST)

    बंडखोरांनी डोळ्यात डोळ्या घालून बोलावं- आदित्य ठाकरे

    बंडखोरांना आदित्य ठाकरे यांनी सुनावलं

    पळून गेलेल्यांना आदित्य ठाकरेंचा टोला

    डोळ्यात डोळे घालून बंडखोरांनी बोलावं, राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं

    आदित्य ठाकरे यांचं सर्व बंडखोरांना खुलं आव्हान

    सुप्रीम कोर्टात 11 जुलैला पुढील सुनावणी पार पडणार

  • 27 Jun 2022 03:38 PM (IST)

    आषाढीची पुजा मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्तेच होणार- मिटकरी

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट जाली आहे, की आषाढी एकादशीच्या महापुजेचा मान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे

    राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांची सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

  • 27 Jun 2022 03:36 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया

    सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया :

    भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याचा प्रस्न उपस्थित होत नाही, शिवसेनेत महाफूट पडली आहे, शिवसेनेच्या नेतृत्त्वाच्या अपयशाकडे आमचं बारी लक्ष आहे, महाराष्ट्र अनाथ व्हावा, असं आम्हाला वाटत नाही आम्ही वेट एन्ड वॉच भूमिकेत आहोत, अजूनही सत्ता स्थापन करण्याचा कोणताही विषय नाही.

  • 27 Jun 2022 03:32 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा बंडखोर आमदारांना मोठा दिलासा

    बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावी

    सुप्रीम कोर्टाचा बंडखोर आमदारांना मोठा दिलासा

    सध्या बंडखोर आमदार गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये

  • 27 Jun 2022 03:22 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : नाना पटोले LIVE

    अविश्वास प्रस्तावाला 14 दिवसांची मुदत द्यावीच लागते, नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

    मी घाईघाईत प्रतिक्रिया देणार नाही, सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं, ते पाहूनच नंतर सविस्तर बोलेन- नाना पटोले

    पक्षांतर विरोधी कायद्यानुसार फार कमी शक्यता ही निलंबनाची कारवाई टळण्यासारखी असते – नाना पटोले

    पक्षांतर विरोधी कायदा एकदम स्पष्ट, आता कुठेही त्यात स्कोप नाही – नाना पटोले

    अपात्रतेमध्ये पक्षाला जास्त महत्त्व आहे – नाना पटोले

  • 27 Jun 2022 03:18 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : आदित्य ठाकरे LIVE

    सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या दिवसाच्या सुनावणीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    बंडखोरांसमोर आता दोनच पर्याय, एक तर निलंबित व्हा किंवा दुसऱ्या पक्षात जा

    ज्यांना पुन्हा यायचंय, त्यांच्यासाठी अजूनही दरवाजे खुले- आदित्य ठाकरे

    आपल्याच लोकांनी धोका दिला, पण ज्यांना आम्ही विरोधक समजत होतो, ते आज आमच्यासाठी आमच्यासोबत लढत आहेत – आदित्य ठाकरे

    कामं अडू नयेत, यासाठी आम्ही खातेबदल केलेला आहे – आदित्य ठाकरे

  • 27 Jun 2022 03:17 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : बंडखोर आमदारांना मोठा दिलासा

    शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा

    तूर्तास तरी बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार नाही

    11 जुलैला होणार पुढील सुनावणी, सुप्रीम कोर्टात झालेल्या आज झालेल्या सुनावणीनंतर नवी तारीख

    11 जुलैला सुप्रीम कोर्टात पुढील युक्तिवाद होणार

    आमदारांना लेखी उत्तर द्यावं लागणार

    विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्याची आज होती शेवटची मुदत

    आता सर्व कागदपत्र आणि सर्व पक्षकारांची बाजू सुप्रीम कोर्ट ऐकून घेणार, त्यानंतर निकाल देणार

  • 27 Jun 2022 03:13 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : ही आमच्यासाठी चांगली बातमी- दीपक केसरकर

    आनंदाची बाब ही आहे, की कुणीही निलंबित होणार नाही!

    आमदारांना आज नोटीसीला उत्तर देण्याची मुदत होती

    11 जुलैपर्यंत तूर्तास कोणतीही कारवाई होणार नाही

    टांगती तलवार दूर झाली, दीपक केसरकर म्हणतात, ही आमच्यासाठी चांगली बातमी!

  • 27 Jun 2022 03:05 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : उज्ज्वल निकम LIVE

    सुप्रीम कोर्टातील सुनावणी उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया :

    सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या बाजू ऐकूनच मग निकाल द्यायचं ठरवलंय, असं दिसतंय.

    दोन्ही बाजूचं ऐकून घेतल्यानंतर खरं-खोटं केलं जाईल, असं तोंडी सुनावणीवरुन दिसतंय.

    आता पुढच्या पाच दिवसात प्रतोद आणि इतरांना प्रतिज्ञापत्र सादर करावी लागतील.

    आता थोडी चमत्कारीत परिस्थिती निर्माण झाली आहे.

    कुणी सध्यातरी हरलेलं नाही, आणि कुणी जिंकलेलंही नाही!

    सर्वोच्च न्यायालयानं एकच गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे आम्ही दुसऱ्या पक्षाचंही ऐकून घेऊ

    राज्यपालांना वाटलं की सध्या सरकार अस्तित्त्वात आहे की नाही, तर राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवू शकतात. पण तसं झालं तर याचिकेचं काय होईल, हाही प्रश्न चमत्कारीकच आहे.

    आज झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीला राज्यपाल बांधील नाहीत, उज्ज्वल निकम यांची माहिती

    खरोखरच चमत्कारीत परिस्थिती झाली आहे!

    पाहा उज्ज्वल निकम काय म्हणाले?

  • 27 Jun 2022 03:03 PM (IST)

    मोठी बातमी! 11 जुलै रोजी पुढील सुनावणी

    महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, विधानसभा उपाध्यक्ष आणि पोलिसांनाही जारी केली नोटीस

    कागदपत्र विधानसभा उपाध्यक्षांना कोर्टात सादर करावी लागणार

    11 जुलै रोजी पार पडणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

    तोपर्यंत पुढे काय? महाराष्ट्रातील राजकीय पेच काय

    11 जुलैपर्यंत आमदार गुवाहाटीतच मुक्कामी राहणार?

    प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 5 दिवसांची मुदत दिली गेली

  • 27 Jun 2022 03:00 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाकडून उपाध्यक्षांना नोटीस

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : कागदपत्र कधीपर्यंत देऊ शकाल, सुप्रीम कोर्टाचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वकिलांना विचारणा

    अविश्वास प्रस्ताव बोगस असल्याचा महाविकास आघाडीने नेमलेल्या वकिलांना सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

    सुप्रीम कोर्टाकडून उपाध्यक्ष नरझरी झिरवळ यांना नोटीस जारी

    ‘कागदपत्र सादर करा!’ सुप्रीम कोर्टाकडून उपाध्यक्ष नरझरी झिरवळ यांना नोटीस जारी,

  • 27 Jun 2022 02:55 PM (IST)

    Supreme Court : शिवसेनेच्या वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : कामत यांच्याकडून कर्नाटक निकालाचा दाखला दिला गेला

    बोसग अविस्वास प्रस्तावावरुन विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही

    शिवसेनेचे वकील दत्तात्रय कापत यांचा युक्तिवाद

    अविश्वास प्रस्ताव अनधिकृत मेलवरुन आल्याचा महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या वकिलांचा दावा

    उपाध्यक्ष कोर्टात कागदपत्र सादर करणार आहेत

    गटनेत्याच्या निवडीवरुन अनधिकृत मेल आयडीवरुन अविश्वास प्रस्ताव पाठल्याचा कोर्टात शिवसेनेचा दावा

    उपाध्यक्षांना हटवण्यासाठी वैध कारणं द्यावी लागतात, कामत यांचा युक्तिवाद

    मुख्यमंत्र्यांच्या अविश्वास प्रस्तावासाठी कारण गरजेचं नसतं, पण उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावासाठी कारण गरजेचं असतं

    शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

  • 27 Jun 2022 02:48 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : 14 दिवसांची नोटीस बंधकारक- कोर्ट

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : अविश्वास प्रस्तावासाठी 14 दिवसांची नोटीस बंधकारक असते, कोर्टाचं निरीक्षण

    अविश्वास प्रस्तावावर अधिकृत मेल आयडीवरुन आलेली नाही- राजीव धवन

    राजीव धवन यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावतीने युक्तिवाद

    अयोग्य पद्धतीने अविश्वास प्रस्ताव पाठवला गेला- राजीव धवन

    जर नोटीस अधिकृत नसेल, तर 14 दिवसांचा मुद्दाच येत नाही- कोर्टाचं निरीक्षण

    पाहा व्हिडीओ:

  • 27 Jun 2022 02:42 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : शिंदे गटाच्या अविश्वास प्रस्तावावर सवाल

    शिवसेनेच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

    शिंदे गटानं मेल अनधिकृत ई-मेल आयडीवरुन नोटीस पाठवली होती, त्यामुळे उपाध्यक्षांनी ही नोटीस नाकारली, शिवसेनेच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण युक्तिवाद

    20 जूनला सूरतला गेल्यानंतर 21 जूनला का मेल केला गेला नाही? सिंघवी यांचा सवाल

    नोटीस नेमकी शिंदे गटानं केव्हा पाठवली, याची पडताळणी सुरु

    उपाध्यक्षांनी सर्व कागदपत्र कोर्टासमोर ठेवावी, सुप्रीम कोर्टातील न्यायाधिशांचे निर्देश

    शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून सुरु आहेत युक्तिवाद

    पाहा व्हिडीओ :

  • 27 Jun 2022 02:35 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : बहुमत असेल तर उपाध्यक्ष अविश्वास प्रस्ताव फेटाळू शकतात- सुप्रीम कोर्ट

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : बहुमत असेल तर उपाध्यक्ष अविश्वास प्रस्ताव फेटाळू शकतात, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

    सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

    किहोटो प्रकरणानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही. कोर्टाला फक्त निर्देश देता येऊ शकतात.

    कलम 179C अंतर्गत विधानसभा अध्यक्षांना हटवण्याची तरतूद आहे, असंही कोर्टानं नमूद केलंय.

  • 27 Jun 2022 02:32 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : आतापर्यंत कोर्टात नेमकं काय काय झालं? वाचा

    शिंदे गटातून वकिलाांनी युक्तिवाद केला

    नीरज कौल यांनी मांडली बंडखोर शिंदे गटाची बाजू

    शिंदे गटाच्या बाजू ऐकल्यानंतर आता शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु

    शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु

    जाणून घ्या आतापर्यंत काय काय झालं? इथे क्लिक करा. 

  • 27 Jun 2022 02:30 PM (IST)

    Deepak Kesarkar Tweet : दीपक केसरकरांनी ट्वीटमधून मांडली शिंदे गटाची भूमिका

    आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, म्हणत दीपक केसरकर यांनी मांडली भूमिका

    ट्वीट कर जारी केलं पत्र, पत्रातून शिंदेगटाची भूमिका स्पष्ट

    वाचा दीपक केसरकर यांचं ट्वीट :

  • 27 Jun 2022 02:23 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : ‘कोर्ट अंतरिम आदेश देता येतील’

    मणिपूरप्रमाणे कोर्टाला अंतरिम आदेश देता येऊ शकतो

    अंतिम कारवाई विधानसभेच्या सबागृहातच होऊ शकते

    उपाध्यक्षकांनी कधी पर्यंत निर्णय दिला जाऊ शकतो, याबाबत निर्देश कोर्ट देऊ शकतं

    शिवसेनेचे वकील मनु सिंघवी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

    शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा मुद्दा शिवसेनेच्या वकिलांना खोडून काढला..

    आर्टिकल 212 चा हवाला शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे..

    राजस्थानच्या किहोटो प्रकरणाचा दाखल मनुसिंघवी यांनी दिला

  • 27 Jun 2022 02:17 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आता युक्तिवादाला उत्तर

    शिवसेनेकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादाला सुरुवात

    त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरझरी झिरवळ यांचे वकील बाजू मांडणार, उपाध्यक्षांचे राजीव धवन झिरवळांची बाजू मांडणार

    शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद झाला

    नीरज कौल यांच्या युक्तिवादाला  अभिषक मनु सिंघवी उत्तर देणार

    हायकोर्टात का गेलो नाही, याचं कारण कौल यांनी कारण दिलं नाही – सिंघवी

    हायकोर्टात दाद न मागण्याचं ठोस कारणं न दिल्याचा सिंघवी यांचा युक्तिवाद

    सुप्रीम कोर्टाच्या युक्तिवादाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

    शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून युक्तिवाद सुरु

    1992 च्या निकालाचा हवाला अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून दिला गेला

    जोपर्यंत विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटिसीला उत्तर दिलं जात नाही, तोपर्यंत कोर्ट हस्तक्षेप  करु शकत नाही – सिंघवी

    विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकाराला आव्हान देता येऊ शकत नाही, शिवसेनेच्या वकिलांचा दावा

  • 27 Jun 2022 02:15 PM (IST)

    Supreme Court on Maharashtra Government LIVE : शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरु

    शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद

    आम्ही बहुमताच्या चाचणीसाठी सामोरं जायला तयार

    पण आधी उपाध्यक्षांना हटवण्यावर निर्णय व्हावा

    निलंबनाची नोटी पाठवताना नियम पाळले गेले नाहीत

    उपाध्यक्षांना आधी हटवा, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

    अधिवेशन नसताना नोटीस काढता येत नसल्याचा कौल यांचा युक्तिवाद

    विधानसभा उपाध्यक्षांनी केलेली कारवाई असंवैधानिक असल्याचा दावा

  • 27 Jun 2022 02:07 PM (IST)

    संख्याबळ असेल तर उपाध्यक्ष का घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आहे.

    संख्याबळ असेल तर उपाध्यक्ष का घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आहे.

  • 27 Jun 2022 02:06 PM (IST)

    ठाणे महापालिके समोर शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळला

    ठाणे महापालिके समोर शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधाना विरोधात शिवसैनिक आक्रमक, तर संजय राऊत यांचा पुतळा जाळला नसून त्यांच्या विचारांचा पुतळा जाळला असल्याचे कार्यकर्त्याचे वक्तव्य केले आहे.

  • 27 Jun 2022 02:05 PM (IST)

    हुमत असेल तर उपाध्यक्ष नोटीस बजावण्याचा अधिकार बजावू शकतात

    उपाध्यक्षकांनी बहुमत सिध्द करावं..बहुमत असेल तर उपाध्यक्ष नोटीस बजावण्याचा अधिकार बजावू शकतात. अविश्वास ठराव असताना नोटीस बजावू शकत नाहीत.

  • 27 Jun 2022 02:00 PM (IST)

    वकील नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद

    नवम रेबिया विरूद्ध अरूणाचल प्रदेश केसचा दाखला देण्यात आला होता.

  • 27 Jun 2022 01:54 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते – खैरे

    उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते. अडीच-अडीच वर्ष जेव्हा ठरल तेव्हा शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी उद्धवजींची इच्छा होती. एकनाथ शिंदे यांचा दाढीवाला म्हणून खैरेंकडुन एकनाथ शिंदेचा भाषणात वारंवार उल्लेख…मला हरामी म्हणतात ; सांगा मी हरामी आहे का खैरेचा शिवसैनिकांना प्रश्न केला आह.

  • 27 Jun 2022 01:49 PM (IST)

    दीपक केसरकर म्हणजे खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, सिंधुदुर्ग प्रमुख दुधवडकर यांची जोरदार टीका

    शिवसेना सोडून गेलेल्यांचा सत्यानाश होवो. सिंधुदुर्ग शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचे मालवणीतून गा-हाणे. सावंतवाडीतील शिवसेनेच्या रॅलीनंतर माध्यमांशी बोलताना दुधवडकर यांचे गा-हाणे. दीपक केसरकर म्हणजे खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. भोलेनाथाला शिवसेनेची इडा पीडा दूर करण्याचे साकडे त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्यांचा सत्यानाश होवो असं घातलं गा-हाणे.

  • 27 Jun 2022 01:45 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू

    सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. शिंदे यांच्या वकिलांकडून संजय राऊत यांच्या धमकीचा उल्लेख केला आहे. उपसभापतीनी दिलेली नोटीस असंविधानिक आहे. नीरज कौल किशन यांचा युक्तिवाद सुरू आहे. तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही. न्यायमूर्तींचा वकिलांना सवाल उपस्थित करण्यात आला. उपसभापती यांनी नोटीस देणं चुकीचं आहे. त्यांना इतकी गडबड का आहे माहीत नाही. आमच्याकडे 39 शिवसेना आमदार आहेत

  • 27 Jun 2022 01:41 PM (IST)

    Political Crisis । सुप्रीम कोर्टात बंडखोरांच्या निलंबनावर थोड्याच वेळात सुनावणी

    सुप्रीम कोर्टात बंडखोरांच्या निलंबनावर थोड्याच वेळात सुनावणी

  • 27 Jun 2022 01:38 PM (IST)

    शिंदे गटाच्या दोन याचिकांवर सुनावणी सुरू, महाराष्ट्रासह देशाचं निकालावरती लक्ष

    शिंदे गटाच्या दोन याचिकांवर सुनावणी सुरू, महाराष्ट्रासह देशाचं निकालावरती लक्ष

  • 27 Jun 2022 01:26 PM (IST)

    मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेते आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु

    मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेते आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु

  • 27 Jun 2022 01:22 PM (IST)

    संजय राऊतांना ईडीचं समन्स

    संजय राऊतांना ईडीचं समन्स

    राजकीय घडामोडी घडत असताना ईडीची नोटीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

  • 27 Jun 2022 01:19 PM (IST)

    माझी मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही – संजय राऊत

  • 27 Jun 2022 01:15 PM (IST)

    राऊत यांच्याशी फोटोला काळे फासत मारले जोडे

    उस्मानाबाद येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारले.उस्मानाबादेत छावा संघटना तानाजी सावंत याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. राऊत यांनी सावंत व मराठा समाजाची बदनामी केल्याने छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सावंत यांना राऊत यांनी सूर्याजी पिसाळ उपमा दिल्याने राऊत विरोधात आंदोलन करण्यात आले. सावंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांना काही उपमा देऊन राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले

  • 27 Jun 2022 01:14 PM (IST)

    किरीट सोमय्यांचं ट्विट, हिसाब तो देना पडेगा

  • 27 Jun 2022 01:12 PM (IST)

    शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा फोनवरून चर्चा केली

  • 27 Jun 2022 01:08 PM (IST)

    जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

    जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

    मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

    एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

  • 27 Jun 2022 01:07 PM (IST)

    एकनाथ शिंदे आज सायंकाळी मुंबईत येण्याची शक्यता, सीआरएसएफची सुरक्षा दिली जाणार

    एकनाथ शिंदे आज सायंकाळी मुंबईत येण्याची शक्यता, सीआरएसएफची सुरक्षा दिली जाणार

  • 27 Jun 2022 12:53 PM (IST)

    शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे की नाही, बंडखोर श्रीकांत शिंदे म्हणाले….

    कोणीही शिवसेना सोडल्याचे अद्याप सांगितले नाही. त्यांना ते समजले पाहिजे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना उत्तर देईल. आजची कोर्टातली लढाई आम्ही जिंकू त्यानंतर सगळे आमदार निर्णय घेतील. संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्याचे मला तुमच्याकडून समजले आहे.

  • 27 Jun 2022 12:46 PM (IST)

    शिवसेनेचे नवनियुक्त विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांचे विधानभवनात आगमन

  • 27 Jun 2022 12:41 PM (IST)

    जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीचं समन्स

    जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीचं समन्स आले आहे. त्यांना 28 जूनला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अलिबाग येथील जमिनीतील संदर्भात ही नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी वेळ मागून घेणार असल्याचे सांगितले आहेत.

  • 27 Jun 2022 12:33 PM (IST)

    आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा

    आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा काढण्यात आला आहे. यड्रावकरांच्या जयसिंगपूर इथल्या कार्यालयावर शिवसेना पदाधिकारी काढणार मोर्चा काढणार आहे.  जयसिंगपूर बस स्थानक ते यड्रावकर कार्यालयात पर्यंत काढला जाणार मोर्चा. मंत्री यड्रावकर शिंदे गटासोबत गेल्याचा विचारणार जाब असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 27 Jun 2022 12:33 PM (IST)

    देशात आग्निवीरच्या माध्यमातून उद्रेक पाहायला मिळतो

    देशात आग्निवीरच्या माध्यमातून उद्रेक पाहायला मिळतो. त्यामुळे यासाठी ते महाराष्ट्र आस्थीर करत आहेत. जवळपास 3000 कोटी रूपये केंद्र सरकारने यासाठी खर्च केले आहेत. याची चौकशी आता ईडी करणार आहे का ? राज्यातील परिस्थीतीला भाजप जबाबदार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. राज्य़ातील जनतेच्य़ा हे आता लक्षात आले आहे. एकनाथ शिंदे आमच्या सोबत महाशक्ती आहे. म्हणतात, ही महाशक्ती लपून राहिली नाही. जर बंडखोर मतदारांना धमकावत असतील तर …राज्यपालांची भुमिका महत्वाची होती. पण ते कशाची वाट बघत आहेत हे प्रश्न निर्माण होत आहेत.

  • 27 Jun 2022 12:29 PM (IST)

    यड्रावकरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, कार्यकर्ते पोलिसांमध्ये झटापट

    यड्रावकरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक पोलिसांमध्ये झटापट

  • 27 Jun 2022 12:24 PM (IST)

    supreme court judgement today live : शिवसेनेतर्फे सावंतवाडीत उद्धव ठाकरे समर्थन रॅली काढण्यात आली

    माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दिपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेतर्फे सावंतवाडीत उद्धव ठाकरे समर्थन रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. दीपक केसरकर यांच्या विरोधात व उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली दीपक केसरकर यांच्या घरासमोर येताच शिवसैनिकांना आणखी जोर चढला. त्यांच्या घरासमोर मोठया मोठयाने हाताने टाळ्या बडवत घोषणांना जोर आला. या रॅलीत आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर व जिल्ह्यातील अन्य नेते,पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.

  • 27 Jun 2022 12:20 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या याचिकेतील आठ महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

    एकनाथ शिंदे यांच्या याचिकेतील मुद्दे –

    1. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना आज ५ वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार ७ दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं २ दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.

    2. स्पीकरच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. ३४ जणांची सही आहे.. यावर कोर्टानं निर्णय घ्यावा.

    3. अजय चौधरीं आणि सुनिल प्रभूंची गटनेता आणि प्रतोद पदाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. या दोघांच्या नियुक्तीला स्थगिती द्या. कारण १७ आमदारांच्या सहीने ठराव करून गटनेते पद दिलं गेलं. पण आमच्याकडे जास्त आहेत. यात दुसरा मुद्दाः त्या ठरावात २४ आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी दादा भुसे आणि उदय सामंत , केसरकर यांसह १० आमदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. त्यांनी आपला निर्णय वापस घेतला आहे..

    4. एकनाथ शिंदे गटाच्या १६ जणांवर शिस्तभंग कारवाईची केली. पण त्यातील पण काही आमदार एकनाथ शिंदे गटाकडे आले.

    ५. गटनेत्यांची नियुक्ती हे निवडून आलेले आमदार करतात, पक्ष प्रमुख नाही. म्हणून स्पीकरनं अजय चौधरींची केलेली नियुक्ती चुकीची आहे.

    ६. एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत… जीवे मारण्याची धमकी देताहेत…

    ७. सुनिल प्रभू आणि अजय चौधरींनी पक्षाचे लेटर हेड वापरू नये असे याचिकेत दिले आहेत.

    ८. ऊपसभापती कार्यालयाचा गैरवापर केलाय…

  • 27 Jun 2022 12:19 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आलेलं संकट दूर व्हावं, यासाठी शिवसैनिकांचं साकडं

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आलेलं संकट दूर करावं असं साकडं शिवसैनिकांनी कार्ला येथील आई एकविराला घातलंय. आई एकविरा ही ठाकरे कुटुंबियांची कुलदैवता आहे. म्हणूनच आज पुण्याच्या मावळ तालुक्यातील शिवसैनिक आई एकविराच्या चरणी पोहचले. कार्ला गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मंदिरात या शिवसैनिकांनी महा आरती केली. गद्दारांमुळं आमचे दैवत संकटात आहेत, या संकटातून त्यांना बाहेर काढ असं साकडं या शिवसैनिकांनी घातलं. तसेच गद्दारांना सुद्बुद्धी दे,असं मागणं ही या शिवसैनिकांनी आई एकविरा चरणी घातलं

  • 27 Jun 2022 12:13 PM (IST)

    सरकारने बहुमत सिद्ध करावं, शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवलं

    सरकारने बहुमत सिद्ध करावं, शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवलं त्यामुळे आजच्या राजकीय घडामोंडीवरती सगळ्यांचं लक्ष आहे

  • 27 Jun 2022 12:09 PM (IST)

    निर्णय आज होण्याची शक्यता कमी आहे – बापट

    निर्णय आज होण्याची शक्यता कमी आहे. पक्ष फुटला की नाही हे निवडणुक आयोग ठरवेल. आता या क्षणाला पक्ष तयार होतो. त्यामुळे त्यांना त्यांची घटना ठरवावी लागते. शिवसेनेचे सगळे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. आमदारांनी मुंबईत यावे त्यांनी त्यांचं बहुमत सिध्द करावं

  • 27 Jun 2022 12:04 PM (IST)

    बाप बदलण्याची भाषा कोण करतंय बघा, संजय राऊतांकडून गुलाबराव पाटलांचा जुना व्हिडीओ ट्विट

  • 27 Jun 2022 12:00 PM (IST)

    supreme court judgement today live : महाविकास आघाडी सरकारनं बहुमत गमावलं आहे.

    महाविकास आघाडी सरकारनं बहुमत गमावलं आहे.

    शिंदे गटाने पाठींबा काढल्याने आधा

  • 27 Jun 2022 11:55 AM (IST)

    तलवारीची धारही शत्रूत भीती निर्माण करते, सुभाष देसाई यांची एकनाथ शिंदे गटाला धमकी

    सुभाष देसाई म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूच्या मनात भीती निर्माण करते. मग एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार मुंबईत यायला घाबरतील नाहीतर दुसरे काय करणार, ज्यावेळी शिवसेनेच्या विरोधात कोणी बंड केले ते पराभूत झाले, एकनाथ शिंदे यांनाही माती खावी लागेल.

  • 27 Jun 2022 11:52 AM (IST)

    महाराष्ट्रातील राजकीय प्रत्येक घडामोड पाहा एका क्लिकवर

    महाराष्ट्रातील राजकीय प्रत्येक घडामोड पाहा एका क्लिकवर

    आजच्या घडामोडींकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे

  • 27 Jun 2022 11:50 AM (IST)

    काय ते हाटील, भारीय की पाटील, बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे? 11 गोष्टी न चुकता करतायत.

  • 27 Jun 2022 11:48 AM (IST)

    महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे

    एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात शिंदे गटाने मोठा दावा केला आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा शिंदे गटाने या याचिकेत केला आहे.

  • 27 Jun 2022 11:47 AM (IST)

    अपात्र हे कायदेशीर आहे की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे – निकम

    एखाद्या राजकीय पक्षाने मतदान गमावलं आहे हे पाहावं लागेल. उपाध्यक्षकांनी या उमेदवाराला अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. अपात्र हे कायदेशीर आहे की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना याबाबत निर्णय आहे.

  • 27 Jun 2022 11:43 AM (IST)

    38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला

    38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला, एकनाथ शिंदेच्या याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे.

  • 27 Jun 2022 11:40 AM (IST)

    सावंतवाडीत आज शिवसेनेची उद्धव ठाकरे समर्थन रॅली

    सावंतवाडीत आज शिवसेनेची उद्धव ठाकरे समर्थन रॅली

    सावंतवाडी येथील शिवसेनेच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे .सावंतवाडीत आज शिवसेनेची उद्धव ठाकरे समर्थन रॅली आहे. ही रॅली केसरकर यांच्या श्रीधर या निवासस्थानासमोरून जाणार आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त केसरकर यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.

  • 27 Jun 2022 11:39 AM (IST)

    आधी आपल्या बुडाखाली काय जळतेय हे पाहावे आणि मग मलिक यांच्यासारख्या लढवय्या नेत्याविरुद्ध बोलावे – सुरज चव्हाण

  • 27 Jun 2022 11:26 AM (IST)

    बंडखोर आमदारांविरोधात असिम सरोदे यांच्याकडून जनहीत याचिका दाखल

    एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे ऑफिस जॉईन करण्याचे आदेश देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील काही सजग नागरिकांची ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने जनहित याचिका दाखल केली आहे. जनतेचे महत्वाचे विषय दुर्लक्षित करून अनऑफिशियल कारणांसाठी न सांगता राज्यातून निघून जाणे बेकायदेशीर आहे. संविधानातील शेड्युल तीन नुसार मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते, की ते जनतेप्रती असलेल्या कर्तव्यात कसूर करणार नाही. तसेच मुख्यमंत्री तसेच त्यांच्या विभागाचे सचिव यांना न सांगता इतर राज्यात निघून जाणे व जनतेची अनेक कामे खोळंबून राहणे हा मंत्र्यांनी केलेला सामाजिक उपद्रव असेही याचिकेत नमूद करण्यात आलेले आहे. याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची याचिकर्त्यांची मागणी आहे

  • 27 Jun 2022 11:19 AM (IST)

    धुळ्यात अब्दुल सत्तार यांच्या फलकाला आक्रमक शिवसैनिकांनी काळे फासले

    धुळ्याचे बंडखोर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या फलकावरील नावाला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. बंडखोरांविरोधात धुळ्यात शिवसैनिक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. बंडखोर पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गद्दार आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू केली आहे. शहरातील विविध भागात लावण्यात आलेल्या फलकावरील सत्तार यांच्या नावाला काळे फासले.

  • 27 Jun 2022 11:15 AM (IST)

    एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट, मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

  • 27 Jun 2022 11:13 AM (IST)

    वकील असीम सरोदे यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात जनहीत याचिका दाखली केली आहे.

    मंत्र्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांना बाहेर कुठे जायचं असलं तर त्यानी मुख्यमंत्र्यांनी सांगावं लागतं. महाराष्ट्रातील जनतेच्या त्यांनी फसवणूक केली आहे. त्यांनी तात्काळ त्यांच्या कामावरती हजर राहावं याकरिता त्यांनी जनहीत याचिका कोर्टात दाखल केली आहे.

  • 27 Jun 2022 11:08 AM (IST)

    कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष, जाणून एका क्लिकवर दोन्ही गटांच्या वकिलांची नावे

    माहितीसाठी

    शिवसेनेचे वकील

    रविशंकर जांध्याल अभिषेक मनु संघवी कपिल सिब्बल देवदत्त कामत

    शिंदे गटाचे वकील

    हरिश साळवे मुकुल रोहतगी मनिंदर सिंह महेश जेठमलानी

  • 27 Jun 2022 11:04 AM (IST)

    नागपुरात अग्निपथ विरोधात काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

    नागपुरात अग्निपथ विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अग्निपथ विरोधात मेडिकल चौकात आंदोलनाला झाली सुरवात झाली आहे. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

  • 27 Jun 2022 10:57 AM (IST)

    हेच का उद्धव सेनेचे हिंदुत्व ?, नितेश राणेंनी ट्विटमधून चिमा

  • 27 Jun 2022 10:53 AM (IST)

    बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या बॅनरला शिवसैनिकांनी काळ फासलं

    नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात आजही शिवसैनिक आक्रमक झालेले दिसले आहेत. शहरात असणाऱ्या विविध बॅनरवर असलेल्या आमदारांच्या नावाला काळे फासण्यात आलं आहे. शहरातील विकास कामांच्या फलकावर असलेल्या आमदार कल्याणकर यांच्या नावाला काळ फासण्यात आलं आहे. तसेच बॅनरवर असलेल्या आमदारांच्या फोटोला देखील काळ फासण्यात आलय. सलग तिसऱ्या दिवशी नांदेडमध्ये शिवसैनिकांचा बंडखोरा विरोधात संताप पहायला मिळालाय.

  • 27 Jun 2022 10:33 AM (IST)

    शिवसेना आमदार भास्कर जाधव मातोश्रीवर पोहचणार

    शिवसेना आमदार भास्कर जाधव मातोश्रीवर पोहचणार आहेत. थोड्याच वेळात मातोश्रीवर पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • 27 Jun 2022 10:30 AM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांनी संजय राऊततांचा पुतळा जाळला

    जळगाव गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

  • 27 Jun 2022 10:26 AM (IST)

    कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गट राज्यपालांशी चर्चा करण्याची शक्यता

    शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तात्काळ राज्यपालांची चर्चा करण्याची शक्यता आहे. आजच्या निकालावरती सगळं अवलंबून आहे. निकालानंतर काय नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • 27 Jun 2022 10:19 AM (IST)

    जेवढे राहिले आहेत त्यांना घेऊन आम्ही शिवसेना राज्यात वाढवू – सुनिल राऊत

    बाळासाहेब उद्धव आमच्या कुटुंबिय आहेत. जे काही राहिले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढविले. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवरती आहे. अडीच वर्षापूर्वीची त्यांची रिकॉर्ड बघा. यांच्या निर्णयामुळे प्रमुखांनी निर्णय घेतला आहे. माझ्या दोन्ही मतदार संघात मी फंड खर्च करतोय. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे.

  • 27 Jun 2022 10:17 AM (IST)

    सामंताच्या जाण्याने अजिबात धक्का बसला नाही – संजय राऊत

    गुवाहाटीला तिथं महाप्रलय आलंय. तुम्ही महाराष्ट्रात या सगळे….आगोदर सुरतला गेले, गुहाटीला गेले. तुमच्या सोबत सगळे गेले मग तुम्ही गुवाहाटीला काय करताय. महाराष्ट्रात सगळं आहे. डोंगर हवा पाणी कोंबड बोकड आहे. सामंताच्या जाण्याने अजिबात धक्का बसला नाही. एकनाथ शिंदेसारखा माणूस आयुष्य शिवसेनेत काढलं त्यांना जावसं वाटतंय मग तुम्ही विचार करा. शेवटी ते सगळे आमचे लोक आहेत, त्यांनी आमच्यासोबत दिवस काढलेले आहेत. महाराष्ट्रात हे सगळं पटणार नाही. केंद्रीय यंत्रणा तुम्हाला मत मिळवू देणार नाही. काश्मीरात पंडीतांना का मारलं जात आहे. तिथं परिस्थिती ही कशामुळे आली आहे हे तुम्हाला माहित आहे का ? आमच्याकडून देखील संपर्क होत आहे. आम्ही मरून जाईल पण शिवसेना सोडणार नाही. आम्ही त्यांना थांबवलं का ? त्यांनी महाराष्ट्रात यावं इतल्या मोकळ्या हवेत यावं.

  • 27 Jun 2022 10:15 AM (IST)

    आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवरती आहे – सुनिल राऊत

    बाळासाहेब उद्धव आमच्या कुटुंबिय आहेत. जे काही राहिले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढविले. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवरती आहे. अडीच वर्षापूर्वीची त्यांची रिकॉर्ड बघा. यांच्या निर्णयामुळे प्रमुखांनी निर्णय घेतला आहे. माझ्या दोन्ही मतदार संघात मी फंड खर्च करतोय. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे.

  • 27 Jun 2022 10:06 AM (IST)

    कुठल्याही शब्दाचा काहीही अर्थ काढतात, ही आपली बोलण्याची पध्दत आहे – संजय राऊत

    कुठल्याही शब्दाचा काहीही अर्थ काढतात, ही आपली बोलण्याची पध्दत आहे. ही लोक गुवाहाटीत आहे. जिंदा आहे पण त्यांची बॉडी मेलेली आहे. कोणी बाप काढला आहे. ते स्वत बाप बदलण्याची भाषा करीत आहे. गुलाब पाटील याचं भाषण मी ट्विट केलं आहे. बाप बदलण्याची भाषा आमची नाही. म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहे. मी फक्त सत्यता सांगितली आहे. दिपक केसरकर आमच्या जवळचे आहेत. तिथं असलेले सगळे आमचे जवळचे आहेत. हे पाहा कायदेशीर लढाई, कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरती लढाई…

  • 27 Jun 2022 09:52 AM (IST)

    औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

    बंडखोर आमदारांविरोधात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ औरंगाबाद शहरातील सुलेखाना चौकात भव्य होर्डींग लावण्यात आली आहेत. होर्डींगवर बंडखोर आमदारांचा फितूर आणि गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय. शिवसेना विभागप्रमुख नरेश भालेराव यांच्या नावाने 30 बाय 30 चे सदर होर्डींग असुन फितुर झाले लाख जरी झुंज आम्ही देणार गद्दाराच्या छातीवर पाय देवून आम्ही शिवसेना पुढे नेणार असा मजकूर या बॅनरवर पहायला मिळतोय.

  • 27 Jun 2022 09:25 AM (IST)

    सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार, निकालाकडे देशाचं लक्ष

    सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार,

    निकालाकडे देशाचं लक्ष

  • 27 Jun 2022 09:24 AM (IST)

    Sanjay Raut | ‘केसरकर थोडा संयम ठेवा,विवेक हरवू नका’-

    बाप बदलण्याची भाषा कोण करतंय, दीपक केसरकरांची टीका

  • 27 Jun 2022 09:22 AM (IST)

    Sunil Raut Banner | संजय राऊतांच्या निवासी परिसरात लावले बॅनर

    सुनील राऊत काल शिंदे गटात सामील झाल्याची बातमी आली होती

    त्यानंतर त्यांनी आज बॅनर लावून शिवसेनेत असल्याचं जाहीर केलं आहे.

  • 27 Jun 2022 09:07 AM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे सरकारचं भवितव्य, मोठा घडामोडी होण्याची शक्यता

    सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे सरकारचं भवितव्य, मोठा घडामोडी होण्याची शक्यता

    आज सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

  • 27 Jun 2022 09:04 AM (IST)

    Shivsena Political Crisis । एकनाथ शिंदे राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी परिपत्रक काढणार

    पुढची रणनीती ठरविण्यासाठी आजच एकनाथ शिंदेचा एक गट आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी परिपत्रक काढणार आहे.

  • 27 Jun 2022 08:59 AM (IST)

    Shivsena Political Crisis । सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे सरकारचं भवितव्य

    सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे सरकारचं भवितव्य

    कपिल सिब्बल आज शिवसेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत

Published On - Jun 28,2022 6:25 AM

Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.