Eknath Shinde vs Shiv Sena : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, जयंत पाटलांचं मोठं विधान, तर कोर्टाच्या निकालाबाबत म्हणतात…

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले.

Eknath Shinde vs Shiv Sena : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, जयंत पाटलांचं मोठं विधान, तर कोर्टाच्या निकालाबाबत म्हणतात...
जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 1:32 PM

मुंबई : आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मोठी सुनावणी पार पडली आणि अजूनही शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांचं काय होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. मात्र या सुनावणीनंतर आता नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच अरुणाचल प्रदेश सरकारसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीत ही लागू शकतो, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत, त्यामुळे पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर सुप्रीम कोर्टाने 27 जुलैपर्यंत कागदपत्र सादर करायला तसेच 1 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची सुनावणी ठरणार आहे.

मला विश्वास आहे योग्य न्याय होईल

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, कपिल सिबल यांनी शिवसेनेच्या वतीने जो युक्तिवाद केला त्याला घटनेच्या दहाव्या शेड्युलचा आधार आहे. दुसऱ्या बाजूने जो युक्तिवाद झाला त्याला जनरल कॉमन सेन्सचा आधार आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधी जाण्याची जी कृती होती ती कायदेशीर होती, हे जे कपिल शीब्बल यांचं आर्ग्युमेंट आहे, ते जास्त योग्य होतं आणि आम्हाला विश्वास आहे, यात योग्य निवाडा होईल असेही जयंत पाटील म्हणालेत.

पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

कोर्टाचा दृष्टीकोण बघून युक्तीवाद बदलला

युक्तिवाद करताना त्यांना कोर्टाचा दृष्टिकोन लक्षात आला, त्यावर त्यांचा युक्तिवाद जो तयार केला होता त्यापेक्षा वेगळा युक्तिवाद करण्याची गरज भासली, त्यामुळे त्यांनी वेळ मागितला असावा, त्यामुळे कोर्टाने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रं सादर करायला सांगितली आहेत. मला अपेक्षा आहे, आठ दिवसानंतर प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर निर्णय तर होईलच, मात्र मला अभिमान आहे की हा जो सरकार पाडण्याचा अनागोंदी प्रकार झाला आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे, त्यात कोर्ट तातडीने तारखा देत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.