Eknath Shinde : मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा झटका
एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर आमदारांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिंदे यांचा हा व्हिडीओही समोर आलाय.
मुंबई : शिवसेनेत बंड पुकारणऱ्या एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर आमदारांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिंदे यांचा हा व्हिडीओही समोर आलाय. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला सर्वात मोठा झटका बसलाय. एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ नुकताच समोर आलाय. त्यात ते बंडखोर आमदारांना संबोधित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीत सुरुवातीला सर्व आमदारांच्या वतीने पुढील सर्व निर्णयाचे अधिकार हे गटनेते म्हमून एकनाथ शिंदेंना देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संभाषणात भाजपासोबत जाण्याचा मनोदय सांगितला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकच आहे. जे काय सुख दु:ख आहे, ते आपल्या सगळ्यांचं एक आहे. काहीही असेल तरी आपण एकजुटीने, अगदी काहीही झालं तरी विजय आपलाच आहे. मला तर तुम्ही जे म्हणालात, ते राष्ट्रीय पक्ष आहेत, ते महाशक्ती आहेत, त्यांनी अख्ख्या पाकिस्तान, म्हणजे काय परिस्थिती होती ते तुम्हाला माहित आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की, तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो ऐतिहासिक आहे. याच्या मागे आमची शक्ती आहे. तुम्हाला कधी काही लागलं तरी काही कमी पडू देणार नाही, याची प्रचिती तुम्हाला येईल.