आनंद दिघे यांच्या प्रॉपर्टीचीही माहिती त्यांनी विचारली; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे याची विचारणा केली होती असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुंबई : राजकीय दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी एकमेकांवर टीकेची झोड उडवली. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्याचा उल्लेख करत थेट बाप काढला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.
उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे याची विचारणा केली होती असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचा प्रश्न ऐकून मला धक्का बसला होता. हे मी शपथ घेऊन सांगतो. आता ते म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हाच मुख्यमंत्री होण्याची तुमची इच्छा होती. हे सर्वांना माहीत आहे. हे नारायण राणेही सांगतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाली पाहिजे होती.
बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता हे राणेंनी सांगितलं. मी पुढचं काही बोलणार नाही. हा अधिकार राणे साहेंबाना आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. अन्याय करून कुणालाही आमच्या पक्षात घ्यायचं नाही. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे. असले धंदे तुम्ही केले. आम्ही नाही अशी टीका देखील एकनाथ शिंदेनी केली.