धनुष्यबाण कोणाला मिळणार?, पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेकडं अवघे काही तास शिल्लक

शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.

धनुष्यबाण कोणाला मिळणार?, पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेकडं अवघे काही तास शिल्लक
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 11:57 AM

मुंबई : शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv sena) दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग (Election Commission) निकाल देणार आहे. धनुष्यबाणावर कोणाचा हक्क याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. धनुष्यबाण या चिन्हावरील आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी कागदपत्र, प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरता शिवसेनेला आजची डेडलाईन देण्यात आली आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुरावे सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेनेला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता काय होणार?, धनुष्यबाण कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

वेळ वाढवून मागण्याची शक्यता

शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यासाठी आज दुपारी दोनपर्यंत पुरावे सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेनेला देण्यात आले आहेत.

मात्र दुसरीकडे शिवसेना पुरावे सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आयोगाला पत्र लिहून वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. आजचीच डेडलाईन का? असा सवाल शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केला आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाच्या नेत्यांकडून बहूमताचा दावा

शिंदे गटाच्या नेत्यांकडून आमच्याकडे बहूमत आहे. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच असा दावा केला जात आहे. शिंदे गटाकडे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एवढेच नव्हे तर  सरपंचांचे देखील बहुमत आहे. त्यामुले धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.