Sharad Pawar On Eci Result Live | शरद पवार यांची निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया

| Updated on: Feb 19, 2023 | 6:04 AM

Election commission Decision on Shiv Sena Symbol LIVE Bow Arrow Updates | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे.

Sharad Pawar On Eci Result Live | शरद पवार यांची निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission Result Live Updates) शिवसेना (Shiv Sena Symbol News Live) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. ठाकरे काय बोलणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Feb 2023 09:52 PM (IST)

    Sharad Pawar On Maharashtra Politics | शरद पवार यांची प्रतिक्रिया

    Sharad Pawar Reaction On ECI Result | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची हवाच काढली आहे. “या निर्णयामुळे फार काही परिणाम होणार नाही, दहा ते पंधरा दिवस चर्चा होई नंतर सर्व काही शांत होईल”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

  • 17 Feb 2023 09:47 PM (IST)

    Uddhav Thackeray On Eci Live | उद्धव ठाकरे यांचा इशारा

    Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर बोलण्यासाठी पुन्हा आले आहेत.  उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संंयम दाखवलेलं आहे.  त्या संयमाचं रुपांतर रागात होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

  • 17 Feb 2023 09:40 PM (IST)

    Cm Shinde On Eci Result Live | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय म्हणाले?

    Eknath Shinde On Eci | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत

    बाळासाहेब ठाकरे यांच्या गहाण ठेवलेला विचार सोडवून घेतला

    बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचा विजय

    बाळासाहेबांचं विचार विकणाऱ्यांचा पराभव

    स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतर करा, शिंदे याचा सल्ला

    आमचं सरकार कायदा आणि नियमांनुसारच

    कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकार स्थापन

  • 17 Feb 2023 09:24 PM (IST)

    Eknath Shinde On Balasaheb Memorial Live | मुख्यमंंत्री शिंदे थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर

    Cm Eknath Shinde Balasaheb Thackeray Memorial | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जावून थोड्याच वेळात अभिवादन करणार आहेत.  शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह परत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जावून अभिवादन करणार आहेत.

  • 17 Feb 2023 09:21 PM (IST)

    Shinde Supporter Anil Parab Live | अनिल परब यांच्या घराबाशेजारी शिंदे गटाचा जल्लोष

    Eknath Shinde Supporter Celebration | माजी परिवहन मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या घराशेजारी एकनाथ शिंदे समर्थकांनी जंगी जल्लोष करत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. त्यानंतर शिंदे समर्थकांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळतेय.

  • 17 Feb 2023 09:16 PM (IST)

    Chagan Bhujbal On Bow And Arrow Live | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

    Chgan Bhujbal On Eci Result  |  निवडणूक आयोगाच्या निकालाचा परिणाम हा उलट होईल आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

  • 17 Feb 2023 09:05 PM (IST)

    Narayan Rane On Bow and Arroe Live | नारायण राणे यांची निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया

    Bjp Mp Narayan Rane On Eci Result | प्रथम तर माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा अभिनंदन इलेक्शन कमिशनरने त्यांना शिवसेना दिलं आणि धनुष्यवान निशाणी दिली. त्यांचे खूप खूप अभिनंदन. काल शिवसैनिक आणि एवढी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांना शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे. हा एका व्यक्तीचा, जेव्हा आपलं स्वतःच्या कुटुंबाचा जर शिवसेना म्हणत असेल तर त्यात सिद्ध झालंय ही शिवसेना जे आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळाले. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

  • 17 Feb 2023 09:03 PM (IST)

    Uddhav Thackeray On Bow and Arrow Live | धनुष्यबाण चोरावा लागलेला आहे, असे चोर कधीही मतदारांकडे जावू शकत नाहीत : उद्धव ठाकरे

    Shiv Sena On Bow Arrow Live | शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय त्यांना, शिवसेना हे नाव चोरावे लागले त्यांना, शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागलेला आहे, असे चोर कधीही मतदारांकडे जावू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 17 Feb 2023 09:01 PM (IST)

    Raj Thackeray On Maharashtra Politics Live | ‘नाव जपा…’, राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या भाषणाचा भावनिक व्हिडीओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया

    Raj Thackeray On Eci Result | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक व्हीडिओ ट्विट केलाय. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या भाषणाचा भावनिक व्हीडीओ ट्विट केला आहे.

    राज ठाकरे यांचं निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर व्हीडिओ ट्विट

  • 17 Feb 2023 08:57 PM (IST)

    Uddhav Thackeray Live | राज्यातली जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

    Uddhav Thckeray Press Conference Live  | प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

  • 17 Feb 2023 08:53 PM (IST)

    Uddhav Thackeray On Maharashtra Politics | उद्धव ठाकरे यांचं पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर कार्यकर्त्यांना आवाहन

    Uddhav Thackeray On Eci Result | “शिवसैनिकांनो शिवसेना प्रेमिंनो कुठे खचू नका, मी तर कुठे खचलो नाहीये, मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की, ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्या लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार फक्त हिम्मत सोडू नका, जिद्द खचून देऊ नका”, असं भावनिक आवाहन पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना केलं आहे.

  • 17 Feb 2023 08:45 PM (IST)

    Mahaashtrav Political News Live | भाजपकडे स्वत: लढण्याची हिंमत नाही : उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray On Bjp | शेवटी चोर हा चोर असतो, भाजपकडे स्वत: लढण्याची हिंमत नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल.

  • 17 Feb 2023 08:42 PM (IST)

    Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

    Uddhav Thackeray On Eci Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आव्हान देणार

    उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

    उद्धव ठाकरे यांची पत्रकारल परिषदेत माहिती

  • 17 Feb 2023 08:37 PM (IST)

    Maharashtra Political Updates Live | उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाच्या निर्णायनंतर पहिली प्रतिक्रिया

    Uddhav Thackeray On Maharashtra Politics Live |   आजचा निर्णय अनपेक्षित

    देशात सरकारची दादागिरी सुरुय

    न्यायव्यवस्थेतही सराकारची दादागिरी

  • 17 Feb 2023 08:33 PM (IST)

    Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

    Uddhav Thackeray On Shiv Sena Bow Arrow | उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.

  • 17 Feb 2023 08:27 PM (IST)

    Shiv Sena Symbol Live | काही कुटुंबांची पकड ढिली करणारा निर्णय : सुधीर मुनगंटीवार

    Bjp Sudhir Mungantiwar On On Shiv Sena Symbol |   “शिव सेना” पक्ष आणि “धनुष्यबाण ” निवडणुक चिन्ह यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय निवडणुक आयोगाने दिला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आज सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत असा हा स्पष्ट संकेत निवडणुक आयोगाने दिला आहे. पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा, काही राजकीय पक्षांवर असलेली काही कुटुंबांची पकड ढिली करणारा आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरूवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

  • 17 Feb 2023 08:21 PM (IST)

    Shiv Sena Symbol Live | निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

    Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

  • 17 Feb 2023 08:09 PM (IST)

    शिवसेना आता एकनाथ शिंदे यांचीच!

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आज समोर आलीय. शिवसेना पक्ष आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांचाच झालाय. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिलाय.

Published On - Feb 17,2023 8:01 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.