काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केले आहे.
मुंबई : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना संसर्ग झाला आहे. नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. (Energy Minister Nitin Raut tested COVID Positive)
“माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केले आहे.
I have been tested positive for Covid-19 today. I would like to request to all those who had come in contact with me the past few days to get themselves tested as a precautionary measure.Stay Safe everyone and takecare??
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 18, 2020
नितीन राऊत यांचा परिचय :
- 1999, 2004, 2009 मध्ये विधानसभा आमदार
- ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूर य्त्त्र मतदारसंघातून पुन्हा विधानसभेवर निवड
- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 गृह, तुरुंग, राज्य उत्पादन शुल्क व कामगार खात्याचे राज्यमंत्री (Energy Minister Nitin Raut tested COVID Positive)
- 2014 पर्यंत आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंवर्धन मंत्रालय कॅबिनेट मंत्री
- ठाकरे सरकार कॅबिनेटमध्ये ऊर्जा मंत्रालयाची धुरा
- महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)च्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष
गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत. विश्वजीत कदम यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्रीपद आहे. त्याआधी सप्टेंबर महिन्यातच दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोना संसर्ग झाला होता.
(Energy Minister Nitin Raut tested COVID Positive)