अनिल परब यांना ईडीचा समन्स; उद्या चौकशीसाठी उपस्थित राहा

साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे.

अनिल परब यांना ईडीचा समन्स; उद्या चौकशीसाठी उपस्थित राहा
अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार? केद्राच्या पर्यावरण टीमकडून साई रिसॉर्टची पाहणी, नेमकं काय हाती लागलं?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:26 PM

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांना ईडीने समन्स पाठवला आहे. तसेच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर याच्या आधीही त्यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर यावेली विधानपरिषद निवडणूक लागली असताना पुन्हा ईडीकडून (ED) समन्स पाठविण्यात आला आहे. तर उद्या चौकशीसाठी (Inquiry) उपस्थित राहा असे सांगण्यात आले आहे. ईडीने दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना समन्स बजावला आहे.

याच्याआधी देखील ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली होती. तसेच चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र परब यांचा एक पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते जाऊ शकले नव्हते. तर त्याच्याही आधी परब हे चौकशीला सामोरे गेले होते. मात्र दुसऱ्या चौकशीवेळी ते उपस्थित राहणार नाहीत हे त्यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळत होती.

याच्याआधी 100 कोटी वसुली प्रकरणात नोटीस

याच्याआधी परब यांना ईडीने 31 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी ईडीने परब यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात समन्स बजावला होता.

हे सुद्धा वाचा

साई रिसॉर्टप्रकरणी समन्स

गेली दोन नोटीस या परब यांना दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी ईडीने पाठवली आहेत. तर त्यांनी दोन्ही वेळा हजर राहण्याचे सांगितलं होतं. मात्र मागच्यावेली ते गैर हजर राहीले होते. त्यामुळे ईडीने परब यांना पुन्हा समन्स बजावला आहे. त्यामुळे परब उद्या चौकशीला हजर राहतात का हे पहावं लागेल.

काय आहे प्रकरण?

गेल्या अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती.

याच प्रकरणी मुंबईतील ईडी कार्यालयात अनिल परबांनी चौकशीली अजर राहावे, असे आदेश देण्यात आले होते. या रिसॉर्टसाठी केलेला खर्च बेनामी आहे असा संशय संध्या ईडीला आहे. या प्रकरणात ईडीने अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तसेच यात परब यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.