Eknath Shinde : ‘मोदींनीही मला सांगितलं तुमचं भाषण चांगलं होतं’ मध्यरात्री सत्कारानंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव

Eknath Shinde Speech Video : आपलं पूर्ण भाषणही त्यांनी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

Eknath Shinde : 'मोदींनीही मला सांगितलं तुमचं भाषण चांगलं होतं' मध्यरात्री सत्कारानंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव
एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 7:16 AM

मुंबई : दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात गुरुवारी मध्यरात्री उशिरा एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. आपल्या भाषणाची मोदींनीही (Narendra Modi) स्तुती केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मला सांगितलं, तुमचं भाषण चांगलं होतं, असं मोदी म्हणालेत, असं एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान नमूक केलं. इतकंच काय तर आपलं पूर्ण भाषणही त्यांनी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी याआधीही भाजपच्या (BJP) पक्षश्रेष्ठींचे आभार मानले होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करण्याची प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. महाविकास आघाडीत पक्षाचं नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. दादरमध्ये मध्यरात्री सत्कारानंतर केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा बंडखोरीवरुन टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. शिवसेना वाचवण्यासआठी ही क्रांती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. तसंच पुढील अडीच वर्ष शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

मध्यरात्री सत्कार…

मध्यरात्री एक वाजता एकनाथ शिंदे हे दादरच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे पोहोचले. तिथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली एकनाथ शिंदे च्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्यावेळी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या एका दिव्यांग व्यक्तीचाही व्यासपीठावर बोलावून सत्कार करण्यात आला.

टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

संभाजी नगरमध्ये आल्यावर एक यादी तयार करा. तुमच्या सर्व कामांची घोषणा करतो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांना आश्वस्त केलं आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी चोख उत्तर दिलं. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केलाय, असंही ते म्हणाले. रात्री दोन वाजता सुद्धा लोकं आहे, हे पाहून एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्यासाठी जमलेल्या उपस्थितांचे आभारही मानलेत.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीवर टीका

यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेचा संपवण्याचा कट रचला होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. तसं होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं. बंडखोरी दरम्यान, आम्ही कुणावरही बळजबरी केली नाही, याचाही पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.