शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं; ‘सामना’च्या टीकेवर भाजपाच्या ‘या’ नेत्याचा जोरदार हल्लाबोल

आज पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या टीकेला भाजपाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं; 'सामना'च्या टीकेवर भाजपाच्या 'या' नेत्याचा जोरदार हल्लाबोल
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 1:02 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मिंधे गटाला पुढे करून कमळबाई कायद्याला नाचवत असल्याची टीका शिवसेनेने केली होती. आता या टीकेला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा तो बाब्या असं सध्या शिवसेनेचं सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. 2019 ला शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं. युतीत लढून बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांसोबत यांनी आघाडी केली, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी?

सध्या माझा तो बाब्या असं शिवसेनेचं सुरू आहे. युतीत लढून बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांसोबत यांनी आघाडी केली. 2019 ला शिवसेनेने कसा विश्वासघात केला हे सर्वांनी पाहिलं. हे 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार, मोदींनी दाखवलेली दिशा, मोदींनी केलेली विकास कामे यांचा आधार घेऊन निवडून आले.  निवडून आल्यानंतर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘सामना’मधून भाजप, शिंदे गटावर निशाणा

‘सामना’च्या संपादकीयमधून भाजप आणि शिंदे गटावर आज जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई कायद्याला नाचवत आहे.  सर्व घटनात्मक संस्था कमळाबाईनं आपल्या पदरी खोचल्या असून, मिंधे गटाला दिलासे दिले जात आहेत. आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची अवलाद कमळाबामुळे महाराष्ट्राच्या विरोधात उभी राहिल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला होता. आता या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.