Exit Poll Result 2022 : उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये काँग्रेस बहुमताने सत्ता स्थापणार! नितीन राऊतांचा दावा

'एक एक्झिट पोल असाता होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपला केवळ 77 जागा मिळाल्या. उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने सरकार बनवणार. नेते आणि पक्ष कार्यकर्ते इमानदारीने मतमोजणीच्या कामात लागले आहेत', असं ट्वीट नितीन राऊत यांनी केलं आहे.

Exit Poll Result 2022 : उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये काँग्रेस बहुमताने सत्ता स्थापणार! नितीन राऊतांचा दावा
नितीन राऊत, ऊर्जामंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 8:07 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर संध्याकाळी सर्व पाच राज्य अर्थात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. त्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता कायम राखत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका बसताना दिसतोय. तिथे आपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आलाय. असं असलं तरी काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा दाखला देत मोठा दावा केलाय.

‘एक एक्झिट पोल असा होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपला केवळ 77 जागा मिळाल्या. उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने सरकार बनवणार. नेते आणि पक्ष कार्यकर्ते इमानदारीने मतमोजणीच्या कामात लागले आहेत’, असं ट्वीट नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसण्याचा अंदाजही नितीन राऊत यांनी फेटाळून लावलाय.

उत्तर प्रदेशचा एक्झिट पोल काय?

उत्तर प्रदेशातला एक्झिट पोल भाजपच्या बाजून आलाय. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. TV9 भारतवर्ष-पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

UP मध्ये पुन्हा भाजपची सत्ता-एक्झिट पोल

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसणार?

एक्झिटपोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 56-61 जागा मिळताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पंजाबच्या सत्तेचं गणित बदलल्यास आपच्या हाती दिल्लीपाठोपाठ पंजाब सारखं महत्त्वाचं राज्य येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार असल्याचं चित्रं आहे. त्यातही भाजपला केवळ एक ते सहाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Punjab Election Exit Poll Results 2022

पंजाबमध्ये आपच्या हाती सत्ता, काँग्रेस दुसऱ्या नंबरला तर भाजप?; वाचा एक्झिट पोल काय सांगतो?

उत्तराखंडमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार?

TV9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 31-33 मते मिळणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेसला 33-35 जागा मिळतील. तर इतरांना 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी TV9 भारतवर्ष/पोलस्ट्रॅट एक्झिट पोलचे ट्रेंड समोर आले आहेत. यामध्ये भाजपला 31-33 तर काँग्रेसला 33-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पार्टीला 0-3 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस

इतर बातम्या :

Punjab Election Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आपच्या हाती सत्ता, काँग्रेस दुसऱ्या नंबरला तर भाजप?; वाचा एक्झिट पोल काय सांगतो?

UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.