MNS : महिलांचा आदरच, महिलेला मारहाण प्रकरणी ‘त्या’ पदाधिकाऱ्याची मनसेतून हकालपट्टी, काय म्हटलंय पक्षाच्या पत्रात?
कामठीपुरा येथे गणेशभक्तांचे स्वागत या आशयाचा बॅनर विनोद अरगिले यांनी लावले होते. एका दुकानच्या समोरच हे बॅनर असल्याने सदरील महिलने त्या बॅनरला विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अरगिले यांनी थेट मारहाणीला सुरवात केली. यामध्ये महिला ही जमिनीवर कोसळलीही. पण त्या महिलेने राज ठाकरेंबाबत वक्तव्य केल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली अरगिले यांनी दिली होती.
मुंबई : गणेशभक्तांच्या स्वागताचा (Banner) बॅनर लावण्यास एका महिलेने विरोध केल्यामुळे (MNS Party Worker) मनसे पदाधिकाऱ्याकडून सदरील महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ज्याप्रकारे मनसे पदाधिकारी विनोद अरगिले यांनी मारहाण केली होती त्यावरुन पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले होते. शिवाय विरोधकांकडूनही संबंधितावर कारवाई करण्याची मागणी झाली होती. मनसे हा केवळ आक्रमक पक्ष नसून तो वेळप्रसंगी काय कारवाई करु शकतो हे अधिरोखित झाले आहे. कारण विनोद अरगिले यांची पक्षातून दुसऱ्याच दिवशी (Expulsion) हकालपट्टी करण्यात आली आहे. कामठीपुरा येथे हा प्रकार समोर आला होता. महिलेशी पदाधिकाऱ्याने केलेले वर्तन हे चुकीचे आहे. शिवाय पक्षाला महिलांबाबत कायम आदरच राहिला आहे असे म्हणतं, या पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.
नेमके काय घडले होते?
कामठीपुरा येथे गणेशभक्तांचे स्वागत या आशयाचा बॅनर विनोद अरगिले यांनी लावले होते. एका दुकानच्या समोरच हे बॅनर असल्याने सदरील महिलने त्या बॅनरला विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अरगिले यांनी थेट मारहाणीला सुरवात केली. यामध्ये महिला ही जमिनीवर कोसळलीही. पण त्या महिलेने राज ठाकरेंबाबत वक्तव्य केल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली अरगिले यांनी दिली होती. आज त्यांच्यावर पक्षाकडून कारवाईही झाली आहे.
महिलांचा कायम आदर, पक्षानेही मागितली माफी
मनसे पक्षाला आणि पक्षातील प्रत्येक घटकाला महिलांबाबत आदर कायम आहे. त्यामुळे पक्षातीलच कोणी असे कृत्य करणे हे बरोबर नाही. त्यामुळे विनोद अरगिले यांना पदावरुन हटवल्याचे पत्र बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्ध केले आहे. काल ही घटना होताच अशा पदाधिकाऱ्यांवर मनसे पक्ष काय कारवाई करणार याबाबत चर्चा रंगली होती, पण पक्षाने 24 तास पूर्ण होण्याआगोदरच अगरिले यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर?
एका महिलेला क्षुल्लक कारणावरुन झालेली मारहाण ही निंदणीय घटना आहे. ते देखील महिलांचा सन्मान असणाऱ्या पक्षाकडून, असे म्हणून त्यांनी याबाबत राज ठाकरे हे कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार कारवाईही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनसे केवळ खळखट्ट्याक साठीच नाहीतर वेळप्रसंगी कशी भूमिका घेतो हे देखील या कारवाईतून समोर आले.