शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, वर्ध्यात 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख रुपये जमा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी (Farmer Loan waiver second list) जाहीर झाली आहे.
वर्धा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी (Farmer Loan waiver second list) जाहीर झाली आहे. याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 68 गावांतील 15358 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा यामध्ये समावेश होता. आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीतील वर्धा जिल्ह्यातील माहिती समोर आली आहे. (Farmer Loan waiver second list)
दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित 12 पैकी 8 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण न झाल्याने तर चार शेतकरी मृत आल्याने सध्या लाभापासून वंचित आहे. याबद्दल वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा सुरु आहे.
8 आधार ऑथेंटिकेशन न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करेल किंवा कोण याबाबत चर्चा सुरु आहे. तर 154 शेतकऱ्यांपैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख 94 हजार रुपये जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात 61084 लाभार्थी शेतकऱ्यां यापैकी 57 हजार 733 शेतकऱ्यांचे आधार अपडेट आहे. तर 11 हजार 143 शेतकऱ्यांची यादी अद्यापही बाकी आहे.
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी
ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 24 फेब्रुवारीला कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली होती.
“आत्तापर्यंत सरकारकडे 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झालं आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली होती. (Farmer Loan waiver First list)
संबंधित बातम्या
68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर