Nagpur Election | नागपूर मनपात प्रभागाचं अंतीम प्रारूप जाहीर, 52 प्रभागांत एकूण 156 नगरसेवक निवडून येणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुंबई आणि कोकण वगळता इतर भागातल्या निवडणुका (Election) लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनाकडून निवडणूक तयारीची लगबग सुरु झालीय. नागपूर महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीसाठी आज प्रभागाचं प्रारुप जाहीर करण्यात आलंय.

Nagpur Election | नागपूर मनपात प्रभागाचं अंतीम प्रारूप जाहीर, 52 प्रभागांत एकूण 156 नगरसेवक निवडून येणार
नागपूर मनपाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:04 PM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुंबई आणि कोकण वगळता इतर भागातल्या निवडणुका लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनाकडून निवडणूक (NMC elections) तयारीची लगबग सुरु झालीय. नागपूर महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीसाठी आज प्रभागाचं प्रारुप जाहीर करण्यात आलंय. नव्या प्रारूपानुसार नागपूर शहरात 52 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात तीन या प्रमाणे एकूण 156 नगरसेवक असतील. हरकती आणि आक्षेप नंतर तीन प्रभागांच्या प्रारूपमध्ये बदल करण्यात आलाय. कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळं महापालिका प्रशासन पूर्णपणे तयार आहे. तिकडे राजकीय पक्षांनी (political parties) सुद्धा जोरात तयारी सुरू केलीय. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय.

उभेच्छुकांची तिकिटासाठी लॉबिंग सुरू

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत जाहीर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, निवडणुकीसाठी मनपाची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यामुळं उमेदवार आता खऱ्या अर्थानं तयारीला लागले आहेत. उभेच्छुकांनी मध्यंतरी पक्षांकडं तिकीट मिळावी, यासाठी अर्ज केला होता. आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार स्वतःचं लॉबिंग करण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या वेळी भाजपची सत्ता होती. त्यामुळं भाजपची तिकीट मिळावी, यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना कल आहे. पण, सर्व कार्यकर्त्यांना तिकीट मिळणं शक्य नाही. अशावेळी तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या कोणत्या पक्षाची तिकीट मिळू शकते, याची चाचपणी उभेच्छुक कार्यकर्ते करत आहेत.

शिवसेना, आप शहरात जोमात

नव्या प्रारूपानुसार नागपूर शहरात 52 प्रभाग राहणार आहेत. प्रत्येक प्रभागात तीन या प्रमाणे एकूण 156 नगरसेवक असतील. नागपूर मनपात सध्या प्रशासक बसले आहेत. मनपा आयुक्त हे प्रशासक आहेत. नागपूर मनपात नगरसेवकांची संख्या 151 होती. त्यापैकी भाजपचे 108 नगरसेवक गेल्या वेळी निवडून आले. गेली तीन टर्म भाजपची मनपात सत्ता आहे. काँग्रेसकडे 29, तर बसपाकडं 10 नगरसेवक होते. अपक्ष 4 नगरसेवक होते. यावेळी शिवसेना जोमानं कामाला लागली आहे. आपचे अरविंद केजरीवालही नागपुरात येऊन गेले. आपच्या कार्यकर्त्यांचे बोर्डही गल्लीबोळात दिसतात. बसपानं उमेदवारीसाठी मध्यंतरी दहा हजार रुपये प्रत्येक उमेदवाराकडून घेतले होते. काँग्रेसनंही उभेच्छुकांकडून अर्ज मागविले होते. या सर्वांच्या कामाला आता वेग येणार आहे.

हे सुद्धा वाचा

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.