AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1200 जणांवर गुन्हे दाखल

विठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या 1200 कार्यकर्त्यांवर पंढरपुरात गुन्हे दाखल झाले आहेत (FIR against Prakash Ambedkar for Pandharpur Strike).

विठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1200 जणांवर गुन्हे दाखल
| Updated on: Sep 01, 2020 | 3:25 PM
Share

सोलापूर : विठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या 1200 कार्यकर्त्यांवर पंढरपुरात गुन्हे दाखल झाले आहेत (FIR against Prakash Ambedkar for Pandharpur Strike). पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमनातील तरतुदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हे नोंद झालेल्यांमध्ये प्रकाश आंबेडकर, आनंद चंदनशिवे, धनराज वंजारी, अरुण महाराज बुरघाटे, अशोक सोनोने ,रेखा ठाकुर, गणेश महाराज शेटे, माऊली हळणवार यांच्यासह 1200 जणांचा समावेश आहे. तक्रारीत म्हटलं आहे, ” प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये जवळपास 1100 ते 1200 नागरिकांचा जमाव जमवून, मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलन केलं. तसेच एकत्र जमा होऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.”

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी सोमवारी (31 ऑगस्ट) पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं (Prakash Ambedkar strike in Pandharpur). या आंदोलनाला जवळपास 1200 लोक उपस्थित होते. यानंतर आंबेडकर यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं होतं.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “आम्ही ज्यांना गुरु मानतो अशा महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म नाकारलेला नाही. त्यांनी धर्म हा अविभाज्य भाग आहे असंच म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही या तीन महापुरुषांच्या विचारसरणीवर चालत आहोत. कुणी कुणाला मानायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणीही कुणावर लादता कामा नये, जबरदस्ती करता कामा नये. त्यामुळे येथे भाविकाला दर्शनाला यायचं होतं. लॉकडाऊनमुळे त्याला दर्शनाला येता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. आता कोरोना संपत आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवायला काहीच हरकत नाही, अशीच आमची मागणी होती.”

“माझ्या आजोबाच्यावेळी मंदिराची चावी पुजाऱ्याकडे, आता मुख्यमंत्र्यांकडे”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या आजोबांने काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तेव्हा त्या मंदिराची चावी पुजाऱ्याकडे होती. आता मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो आहे, तर दुर्दैवाने पुजाऱ्याकडे चावी नाही, मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ती चावी द्यायची की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मुख्यमंत्र्यांच्या आजोबांनी देखील मंदिर प्रवेशाची चळवळ केली आहे. याचीही मी त्यांना आठवण करुन दिली,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

Prakash Ambedkar | पंढरपूर मंदिर प्रवेशानंतर प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण

Photos | प्रकाश आंबेडकर मंदिर प्रवेशावर ठाम, पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

FIR against Prakash Ambedkar for Pandharpur Strike

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.