दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटला आग, 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : दक्षिण मुंबईच्या अब्दुल रहमान रोडवरील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीमागे शॉर्ट सर्किटचे कारण असल्याचेही बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग […]
मुंबई : दक्षिण मुंबईच्या अब्दुल रहमान रोडवरील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत.
आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीमागे शॉर्ट सर्किटचे कारण असल्याचेही बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली.
दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड मार्केटमध्ये मुख्यतः कपडे आणि भांड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीचा असतो. या गर्दीमुळे आग नियंत्रित करण्यालाही अडचणी आल्या. आग लागल्याने आसपासच्या इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत कुणीही जखमी झाल्याची अथवा आगीत अडकल्याची कोणतीही माहिती नाही.