अखेर मनसेनं खातं उघडलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं (First Victory of MNS in Assembly Election 2019) आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं (First Victory of MNS in Assembly Election 2019) आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय (First Victory of MNS in Assembly Election 2019) मिळवला आहे. त्यांना 86233 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80665 मते मिळाली आहेत.
मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना दुपारपर्यंत खातंही खोलता आलं नव्हतं. अखेर कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांनी मनसेचं खातं उघडलं.
मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. मात्र, किती उमेदवार लढणार याची आकडेवारी सांगितली नाही. दररोज चार-पाच उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी 110 उमेदवारांची नावं जाहीर केली.
राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासून राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला.
मनसेची विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यादी
- प्रमोद (राजू) पाटील – कल्याण ग्रामीण
- प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
- अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
- संदीप देशपांडे – माहिम
- वसंत मोरे – हडपसर
- किशोर शिंदे – कोथरुड
- नितीन भोसले – नाशिक मध्य
- राजू उंबरकर – वणी
- अविनाश जाधव – ठाणे
- नयन कदम – मागाठाणे
- अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
- नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
- दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
- योगेश शेवेरे- इगतपुरी
- कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
- संजय तुर्डे – कलिना
- सुहास निम्हण – शिवाजीनगर
- गजानन काळे – बेलापूर
- अतुल बंदिले – हिंगणघाट
- प्रशांत नवगिरे – तुळजापूर
- राजेश वेरुणकर – दहीसर
- अरुण सुर्वे – दिंडोशी
- हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
- वीरेंद्र जाधव – गोरेगाव
- संदेश देसाई – वर्सोवा
- गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
- अखिल चित्रे- वांद्रे पूर्व
- मंदार हळवे – डोंबिवली
- प्राची कुलकर्णी – धुळे
- जमील देशपांडे – जळगाव (शहर)
- मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
- अकलेश पाटील – अमळनेर
- विजयानंद कुलकर्णी – जामनेर
- रविंद्र फाटे – अकोट
- विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
- सुभाष राठोड – कारंजा
- अभय गेडाम – पुसद
- गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
- सचिन पाटील – परभणी
- विठ्ठल जवादे – गंगाखेड
- प्रकाश सोळंखी – परतूर
- संतोष जाधव – वैजापूर
- नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
- मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
- महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
- निलेश बाणखेले – ऐरोली
- किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
- सुनिल भारसकर (चांदीवली)
- सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
- विजय रावराणे – अणुशक्तीनगर
- केशव मुळे – मुंबादेवी
- संजय गायकवाड – श्रीवर्धन
- देवेंद्र गायकवाड – महाड
- प्रकाश रेडकर – सावंतवाडी
- भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर
- वैभव काकडे – बीड
- शिवकुमार नगराळे – औसा
- हनुमंत भोसले – मोहोळ
- मधुकर जाधव – अक्कलकोट
- मनिषा करचे – माळशिरस
- गणेश कदम – गुहाघर
- मनोज बाव्वनगडे – उंबरेड
- महालिंग कंठाडे – राजुरा
- युवराज यडुरे – राधानगरी
- सुमेत भंवर – अंबरनाथ
- सुनिल निभाड – डहाणू
- दिनकर वाढान – बोईसर
- संतोष नलावडे – शिवडी
- जुईली शेंडे – विलेपार्ले
- विनोद राठोड – किनवट
- डॉ. अरुण देशमुख – फुलंब्री
- अॅड. रामराव वानखेडे – उमरखेड
- संदीप जळगावकर, भांडुप पश्चिम
- विनोद शिंदे, विक्रोळी
- हर्षदा राजेश चव्हाण, मुलुंड
- आनंद प्रभू, वडाळा
- अतुल भगत, उरण
- के. के. कांबळे, पिंपरी
- हरीष सुतार, मिरा भाईंदर
- नागेश चव्हाण, बार्शी
- जयवंत बगाडे, सांगोला
- समता भिसे, कर्जत-जामखेड
- अविनाश सौंदाळकर, राजापूर
- नितीन देशमुख, मुरबाड
- राजेंद्र भोसले, बदनापूर
- वैशाली जाधव, विक्रमगड
- उमेश गोवारी, पालघर
- संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
- जालिंदर कोकणे, उमरगा
- मनिषा सरोदे, पुणे कॅन्टोनमेंट
- मनोज खराबी, खेड-आळंदी
- वैभव बाणखेले, आंबेगाव
- कैलास नरके, शिरुर
- सचिन कुलथे, दौंड
- पुरंदर, उमेश जगताप
- अनिल मातेरे, भोर
- राकेश जाधव, चाळीसगाव
- प्रफुल्ल ठाकूर, वसई
- सिद्धांत मंडाले, देवळाली
- अर्जुन वाघमारे, लातूर ग्रामीण
- पूजा ठवकर, भंडारा
- रमेश राजूरकर, वरोरा
- निलेश सुरळकर, भुसावळ