काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपला मागे टाकलं, तीन राज्य हिसकावून घेतली!

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, […]

काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपला मागे टाकलं, तीन राज्य हिसकावून घेतली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालंय.

अंतिम निकाल (राज्यनिहाय आकडेवारी)

राजस्थान (199) :

  • काँग्रेस –  99
  • भाजप – 73
  • इतर – 27

मध्य प्रदेश (230) :

  • काँग्रेस – 114
  • भाजप -109
  • इतर – 07

छत्तीसगड (90) :

  • काँग्रेस – 68
  • भाजप – 15
  • इतर – 07

तेलंगणा (119) :

  • टीआरएस – 88
  • काँग्रेस-टीडीपी – 19
  • भाजप – 01
  • इतर – 11

मिझोराम (40) :

  • एमएनएफ – 26
  • काँग्रेस – 05
  • भाजप – 01
  • इतर – 08

LIVE UPDATE

  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा, कमलनाथ यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितला
  • जे नको ते मतदारांनी नाकारले, मतदारांचे अभिनंदन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
  • मध्य प्रदेशात काँटे की टक्कर, काँग्रेसला 117 तर भाजपला 102 जागांवर आघाडी
  • तेलंगणा -(119) कल – टीआरएस 87, भाजप 2, काँग्रेस+टीडीपी 23, इतर 07
  • राजस्थान (199) कल – भाजप 74, काँग्रेस 99, इतर 26
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 110, काँग्रेस 110 , इतर 10
  • मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढाई, भाजप 110 तर काँग्रेस 109 जागांवर आघाडीवर
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 105, काँग्रेस 114 , इतर 11
  • राजस्थान – जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजने आहे, अपक्षांनीही काँग्रेसच्या बाजूने यावं – काँग्रेस नेते अशोक गेहलोत
  • राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे, अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला भरघोस प्रतिसाद आहे. अंतिम निकालापर्यंत वाट पाहू : राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट लाईव्ह
  • राजस्थानमधील विद्यमान सरकारला जनतेने धडा शिकवला, 5 वर्षात भाजप सरकारने विशेष काहीच केलं नाही, हा जनतेचा विजय आहे: राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट
  • निवडणुकांच्या कलावर पंतप्रधानांनी बोलणं टाळलं

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह, सर्व प्रकारची चर्चा व्हावी, वाद-विवाद व्हावे पण संसदेचं सभागृह चालावं- पंतप्रधान

  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 99, काँग्रेस 118 , इतर 13 छत्तीसगड (90) कल – भाजप 25, काँग्रेस 60, इतर 05
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 104, काँग्रेस 112 , इतर 008
  • छत्तीसगड (90) कल – भाजप 22, काँग्रेस 60, इतर 08
  • राजस्थान (199) कल – भाजप 82, काँग्रेस 110, इतर 06
  • राजस्थान (199) – काँग्रेसकडून बहुमताचा 100 आकडा पार, 110 जागांवर आघाडी छत्तीसगड (90)- काँग्रेसकडून बहुमताचा 46 आकडा पार, 59 जागांवर आघाडी मध्य प्रदेश(230)-काँग्रेस बहुमताचा 116 आकडा पार करण्याच्या दिशेने वाटचाल, 108 जागी आघाडी
  • राजस्थान (199) कल – भाजप 80, काँग्रेस 110, इतर 08 मध्य प्रदेश (230) कल – भाजप 87 , काँग्रेस 105 , इतर 01
  • राजस्थानमध्ये काँग्रेसकडून बहुमताचा आकडा पार, तब्बल 101 जागांवर आघाडी, मध्य प्रदेशातही शतकाच्या दिशेने आगेकूच
  • छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री रमण सिंग पिछाडीवर
  • राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताचे दिशेने
  • राजस्थान (199) कल – भाजप 62 , काँग्रेस 90, इतर 00
  • छत्तीसगड (90) कल – भाजप 30, काँग्रेस 40, इतर 04
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 76 , काँग्रेस 83 , इतर 01
  • एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरण्याची शक्यता, तेलंगणात काँग्रेस 35 आणि टीआरएसमध्ये 36 चुरस
  • छत्तीसगड (90) कल – भाजप 28, काँग्रेस 35, इतर 04
  • मध्य प्रदेशात आम्हीच सरकार स्थापन करु, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसच्या बाजूनेच कल, दुपारी 12 नंतर अधिक बोलणे योग्य ठरेल – काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह
  • मिझोराम (40) कल – MNF 1 , काँग्रेस 1, इतर 01
  • छत्तीसगड (90) कल – भाजप 20, काँग्रेस 24, इतर 03
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 42 , काँग्रेस 47 , इतर 00
  • राजस्थान (199) कल – भाजप 35 , काँग्रेस 53, इतर 00
  • राजस्थानात काँग्रेसची अर्धशतकी आघाडी, तब्बल 53 जागांवर पुढे, भाजपची गाडी 31 वर
  • राजस्थानात भाजपची घोडदौड, तब्बल 42 जागांवर आघाडीवर, तर भाजप 22 जागांवर पुढे
  • राजस्थानमध्ये भाजप 12, काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 10 , काँग्रेस 12 , इतर 00
  • छत्तीसगड (90) कल – भाजप 15, काँग्रेस 14, इतर 00
  • राजस्थान (199) कल – भाजप 5 , काँग्रेस 10, इतर 00
  • तेलंगणा -(119) कल – टीआरएस 04, भाजप 0, काँग्रेस+टीडीपी 1, इतर 00
  • छत्तीसगड: बस्तरमधून काँग्रेसचे लखेश्वर बघेल आघाडीवर जगदलपूरमधून काँग्रेसचे रेख चंद जैन आघाडीवर चित्रकूटमधून भाजपाचे लच्छू राम आघाडीवर अंतागढ़मधून भाजपाचे विक्रम उसेंडी आघाडीवर कोडागांव मधून भाजपाचे लता उसेंडी आघाडीवर केशकालमधून काँग्रेशचे संतराम नेताम आघाडीवर
  • राजस्थान (199) कल – भाजप 5 , काँग्रेस 9, इतर 00

#छत्तीसगड – “भाजपकडून घोडेबाजाराची शक्यता आहे, त्यामुळे काॅंग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र घेऊन थेट काॅंग्रेस कार्यालयात येण्याचे आदेश दिले आहेत, कर्नाटकचं नाटक आम्ही बघितलं आहे” : रायपूर ग्रामीणचे काॅंग्रेस उमेदवार सत्यनारायण शर्मा

  • भाजप आघाडीवर – राजस्थान – 5 मध्य प्रदेश – 4 छत्तीसगड – 7 तेलंगणा – 0 मिझोराम – 0
  • मध्य प्रदेशात काँग्रेस 5, भाजप 3 जागांवर आघाडीवर
  • काँग्रेस आघाडीवर – राजस्थान – 6,मध्य प्रदेश – 4,छत्तीसगड – 5, तेलंगणा – 1,मिझोराम – 0
  • राजस्थानमध्ये 5 जागांवर काँग्रेस आघाडीवर, भाजपला तीन जागांवर आघाडी
  • तेलंगणातील तीन जागांवर टीआरएस आघाडीवर
  • राजस्थानात पहिले कल भाजपच्या बाजूने, मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर
  • मध्य प्रदेश (230) कल – भाजप 2 , काँग्रेस 1 , इतर 00
  • तेलंगणातील पहिला कल टीआरएसच्या बाजूने
  • पाच राज्यांचे पहिले कल, पोस्टल मतमोजणीला सुरुवात
  • अखिलेश प्रतापसिंग, काँग्रेस नेते –  “पाच राज्यात आमची सत्ता येणार. भाजपच्या नेत्यांना आपली झोळी घेऊन प्रवासाला निघावे लागणार आहे. निकालाच्या कलांच्या आधारावर नाही तर आम्ही अभ्यासाच्या आधारावर दावा करतो की काँग्रेसचे सरकार येणार आहे”
  • निकालाच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यात कडेकोट बंदोबस्त
  • निकालाचं काऊंटडाऊन सुरु, काही क्षणात पहिले कल हाती येणार

पाच राज्यांतील सध्याचे मुख्यमंत्री, जागा आणि बहुमताचा आकडा

मध्य प्रदेश 230 – 116 विद्यमान मुख्यमंत्री – शिवराजसिंह चौहान (भाजप) राजस्थान 199 – 100 – विद्यमान मुख्यमंत्री – वसुंधराराजे (भाजप) छत्तीसगड 90 – 46 – विद्यमान मुख्यमंत्री – रमणसिंग (भाजप) तेलंगणा – 119 – 60 – विद्यमान मुख्यमंत्री – के चंद्रशेखर राव (टीआरएस) मिझोराम – 40 – 21 – विद्यमान मुख्यमंत्री – लल थनहवला (काँग्रेस)

पाच राज्यांमधील सध्याचं चित्र

राजस्थान

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

तेलंगणा

2014 साली नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने सत्ता मिळवली होती. पण काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत 119 सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90, काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या पंधरा वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चार आमदार होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान होतं. पण यावेळी काँग्रेसने बाजी मारली.

छत्तीसगड

मध्य प्रदेशमधून वेगळं झालेलं छत्तीसगड हे राज्यही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होतं. 90 विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या निवडणुकीत 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य टक्कर होती.

मिझोराम

40 सदस्यसंख्या असलेल्या मिझोराममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराम हे काँग्रेसच्या हातात असलेलं ईशान्येकडील एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.