मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्हं
मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठीधोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे. त्यापूर्वी टीव्ही 9मराठी एक्झिट पोलच्या माध्यमातून सत्तेची चावी कुणाकडे […]
मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठीधोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे. त्यापूर्वी टीव्ही 9मराठी एक्झिट पोलच्या माध्यमातून सत्तेची चावी कुणाकडे याचं सखोल विश्लेषण करणारआहे.
एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार मध्य प्रदेशात सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपात कडवी झुंज पाहायला मिळत आहे. आज तक आणि एक्सिस मायच्या पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला 104 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 102-120 जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या पोलनुसार, 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्याचं दिसत आहे. भाजपला 126, काँग्रेस 89, बसपा 06 आणि इतरांना 09 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया टुडेच्या पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला 102-120 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशात बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि भाजपात यामुळे काँटे की टक्कर होणार आहे.
जन की बातच्या एक्झिट पोलनुसार,भाजपला मध्य प्रदेशात 108 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस 95 ते 115च्या आसपास राहू शकते. म्हणजेच काँग्रेसही बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे.
मध्य प्रदेशातील 2013 सालचं चित्र
मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या पंधरा वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चार आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे.