PM Narendra Modi : ‘महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 700 कोटींची वसुली’, पीएम मोदींचा गंभीर आरोप

PM Narendra Modi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अकोले येथे सभा झाली. या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी काँग्रेसवर एक गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसने 700 कोटींची वसुली केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

PM Narendra Modi : 'महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 700 कोटींची वसुली', पीएम मोदींचा गंभीर आरोप
PM Modi
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 1:44 PM

“महायुती सरकारची पुढची पाच वर्ष कशी असतील, याची एक झलक महायुतीच्या वचननाम्यात दिसतेय. महिला सुरक्षा, महिलांना संधी, माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार. युवा वर्गासाठी लाखो रोजगार. विकासाच्या योजना. महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाला डबल स्पीडने पुढे नेईल. युवा शिक्षा, रोजगार महायुतीच सरकार करील स्वप्न साकार” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोले येथील प्रचार सभेत बोलले.

“महायुतीच्या या घोषणापत्रादरम्यान महाआघाडीच घोटाळापत्र आलय. देशाला माहितीय महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे, महाआघाडी म्हणजे पैसा काढणं, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. महाआघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

‘ते राज्य शाही कुटुंबाच ATM बनतं’

“महाघाडीच घटक काँग्रेसच एक उदहारण देतो. काँग्रेसच जिथे सरकार येतं, ते राज्य शाही कुटुंबाच ATM बनतं. सध्या हिमाचल, तेलंगण आणि कर्नाटक ही राज्य काँग्रेसच्या शाही कुटुंबाच ATM बनली आहेत. लोक सांगतायत सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावावर कर्नाटकमध्ये वसुली डबल झालीय. निवडणूक महाराष्ट्रात वसुली डबल झाली कर्नाटक, तेलंगणमध्ये” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

‘आपल्याला महाराष्ट्रात सावधान रहायचं आहे’

“कर्नाटकात या लोकांनी मद्य दुकानदारांकडून 700 कोटी रुपयांची वसुली केलीय. तुम्ही कल्पना करु शकत नाही, काँग्रेस पार्टी घोटाळे करुन निवडणूक लढत आहे. ते निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करतील? आपल्याला महाराष्ट्रात सावधान रहायचं आहे. महाराष्ट्राला महाआघाडीच्या महाघोटाळ्याच ATM बनू देऊ नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.