Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात, महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार
आगामी काळात महापालिकासह पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ही विधान भवनात होणार आहे. त्या बैठकीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच रंगली होती. अखेर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आ. आदित्य ठाकरे हे एकाच वेळी (Legislative Assembly) विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान, (MVA) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला ते हजर राहिले आहेत. उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरवात केली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता.
आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने खलबते
आगामी काळात महापालिकासह पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ही विधान भवनात होणार आहे. त्या बैठकीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नेमकी काय रणनिती ठरते हे पहावे लागणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे विधान भवनात आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहिले. pic.twitter.com/vw0auMOBmJ
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 23, 2022
राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात
शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे सत्तांतर झाले आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता आमदारकीचाही राजीनामा देणार अशी चर्चा होती, पण त्यांनी आपल्या निर्णयात बदल केला. त्यानुसार आज महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले आहे. ते विधान भवनाच्या आवारात येताच सर्वांनी त्यांना गराडा घातला होता. तर अनेकांनी घोषणाही दिल्या होत्या.
विविध विषयांवर होणार चर्चा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या या बैठकीत आगामी निवडणुकांबरोबर सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आता घटनापीठ हेच सुनावणी घेणार आहे. त्यामुळे याबाबतीतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.