संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?

राठोड हे आज मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवरच राठोड हे सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत.

संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 2:24 PM

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आता संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राठोड हे आज मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवरच राठोड हे सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यावेळी राठोड यांच्यासोबत त्यांचे मेहुणे आणि खासगी स्वीय सहाय्यकही असल्याची माहिती मिळतेय. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही मंत्रिमंडळाची बैठक संजय राठोड यांच्यासाठी वनमंत्री म्हणून अखेरची असल्याचं बोललं जात आहे.(Forest Minister Sanjay Rathod meets Chief Minister Uddhav Thackeray)

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह त्यांचे काही सहकारी उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वी राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली होती. ही भेट अवघ्या काही मिनिटांची होती. त्या भेटीत मला तुझ्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं कळतंय. मात्र, भाजपचा वाढता दबाव आणि शरद पवार यांची नाराजी या पार्श्वभूमीवर राठोड यांच्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

भाजपची आक्रमक भूमिका

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा तयार केला जात आहे. पण राज्यातील मंत्रीच जर महिलांच्या अत्याचारात सहभागी असतील तर हा कायदा काय कामाचा?, असा सवाल करतानाच राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का? असा सवाल करतानाच राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारचा फार्स आहे. मंत्र्यांचा राजीनामाच होत असेल तर या समितीत उपस्थित राहून काय फायदा? असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

राठोडांनी राजीनामा दिला नाही तर ‘शक्ती’ कायद्याच्या समितीतून भाजपचे सदस्य राजीनामा देणार; फडणवीसांचा इशारा

…तोपर्यंत मागे हटणार नाही, तक्रारीमध्ये संजय राठोड यांचेही नाव; पूजा चव्हाणची आजी आक्रमक

Forest Minister Sanjay Rathod meets Chief Minister Uddhav Thackeray

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.