Anagha Manohar Joshi | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन
अनघा जोशी यांनी आज पहाटे (सोमवार 3 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या.
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच अनघा मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली. (Former Chief Minister of Maharashtra Manohar Joshi’s wife Anagha Manohar Joshi Dies)
अनघा जोशी यांनी आज पहाटे (सोमवार 3 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
अनघा मनोहर जोशी या माहेरच्या मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी अनघा यांचा विवाह झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.
नोकरी सोडून मनोहर जोशी यांनी नुकतेच कोहिनूर क्लास सुरु केले होते, व्यवसायातले चढउतार, जोशी सरांच्या आणि राजकीय व सामाजिक जीवनातले यश यात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली.
हेही वाचा : राजेश टोपेंच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या पार्थिवावर जालन्यात अंत्यसंस्कार
मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरु झाली. 1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते.
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 2 ऑगस्टhttps://t.co/S42ybmH8r6
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2020
(Former Chief Minister of Maharashtra Manohar Joshi’s wife Anagha Manohar Joshi Dies)