हर्षवर्धन जाधव म्हणतात, अ ब्युटीफुल लाईफ !

मैत्रीण इशा झा (Isha Jha) यांच्यासोबत 'अ ब्युटीफुल लाईफ !' असं लिहिलेला फोटो शेअर करुन हर्षवर्धन जाधवांनी सर्वांना चकित केलं. (Harshavardhan Jadhav Photo Isha Jha)

हर्षवर्धन जाधव म्हणतात, अ ब्युटीफुल लाईफ !
हर्षवर्धन जाधव, मातोश्री तेजस्विनी जाधव आणि मैत्रीण इशा झा
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 3:16 PM

औरंगाबाद : माझ्या जोडीदार आता इशा आहेत, असं वक्तव्य करत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याची कूपी उलगडून दाखवली आहे. आपल्या पहिल्या पत्नीला आता संजना हर्षवर्धन जाधव (Sanjana Jadhav) म्हणून फिरता येणार नाही, असं सांगत हर्षवर्धन जाधवांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यातच मैत्रीण इशा झा (Isha Jha) यांच्यासोबत ‘अ ब्युटीफुल लाईफ !’ असं लिहिलेला फोटो शेअर करुन हर्षवर्धन जाधवांनी सर्वांना चकित केलं. (Former MLA Harshavardhan Jadhav Shares Photo with Friend Isha Jha captions Beautiful Life)

Posted by Harshwardhan Jadhav on Thursday, 11 March 2021

‘त्यांनी संजना दानवे म्हणून फिरावं’

मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अशावेळी त्या आपण संजना हर्षवर्धन जाधव असल्याचं सांगत असतील तर हा निर्लज्जपणा आपण लक्षात घ्यावा. मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि इशाला माझ्या मातोश्रींनी आशीर्वाद दिले आहेत. अशा स्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावं, असं हर्षवर्धन जाधव यांनी नुकतंच म्हटलं.

हर्षवर्धन जाधवांच्या मातोश्रींकडून स्वीकार

हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या आशीर्वादाने ईशा झा यांनी एका मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली होती. ईशा झा यांची ही एकप्रकारे राजकीय एन्ट्री मानली गेली. ईशा झा यांचे कौतुक करताना तेजस्विनी जाधवांनी त्यांना ईश्वराचा अवतार असे संबोधले होते. तसेच रायभान जाधव, आपल्याला, पुत्र हर्षवर्धन आणि नातू आदित्य यांना जसे कन्नडच्या जनतेने प्रेम दिले, तसेच प्रेम ईशालाही द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. राजकारणासोबतच ईशा झा या जाधव कुटुंबाचा भाग झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

कोण आहेत इशा झा? (Who is Isha Jha Read Profile)

इशा झा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे. इशा झा यांना हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी आणि मैत्रीण म्हणून पाहिले जात होते. मात्र हर्षवर्धन जाधवांनी त्यांचा उल्लेख आपला जोडीदार असा करुन देत नातं स्पष्ट केलं.

(Former MLA Harshavardhan Jadhav Shares Photo with Friend Isha Jha captions Beautiful Life)

दुचाकीस्वार मारहाण प्रकरणी चर्चेत

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.

“हर्षवर्धन जाधवांच्या ज्ञानाने अधिकारी गपगार”

“मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा झा हर्षवर्धन जाधवांचं कौतुक करत होत्या.

संबंधित बातम्या :

ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा

संजना नाही तर ईशा आता माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

(Former MLA Harshavardhan Jadhav Shares Photo with Friend Isha Jha captions Beautiful Life)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.