कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीला तारण्याची जबाबदारी माजी आमदाराकडे, जयंत पाटलांचा मोठा निर्णय
जगन्नाथ शिंदे हे पक्षाला उभारी देण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कल्याण-डोंबिवली : महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीही (NCP) यासाठी रिंगणात उतरली आहे. कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivali) राष्ट्रवादीला तारण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदी (district president) माजी आमदार जगन्नाथ शिंदे (Jagannath Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ही जबाबदारी शिंदे यांच्या खाद्यावर दिली आहे. (Former MLA Jagannath Shinde appointed as district president to save the NCP in Kalyan Dombivali)
खरंतर, 2005 मध्ये केडीएमसी महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाचा महापौर बसला होता. त्यानंतर पक्षाची वाताहत झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. यानंतर 2015 साली महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अवघे 2 नगरसेवक निवडून आले. आता होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणूका पाहता शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जगन्नाथ शिंदे हे पक्षाला उभारी देण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी महापालिकेतील विजयासाठी तयारी करत असताना दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. तोच पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असल्याची ठाम भूमिका शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पालिकेसाठी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
भाजपाचे तडफदार नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास भातखळकर यांनी बोलून दाखवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. (Former MLA Jagannath Shinde appointed as district president to save the NCP in Kalyan Dombivali)
यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही भातखळकर यांनी दिली. मुंबईकरांना आम्ही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सत्ताधाऱ्यापासून मुक्ती देऊ आणि पूर्ण बहुमताने भाजपाचा महापौर निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात
दरम्यान, मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुका या चुरशीच्या असणार आहेत.
इतर बातम्या –
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती
Video | kalyan | कल्याण येथील पत्रीपुलासाठी गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेचा पॉवर आणि मेगाब्लॉक@SandeshShirke8 pic.twitter.com/Q6K0QGceMV
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2020
(Former MLA Jagannath Shinde appointed as district president to save the NCP in Kalyan Dombivali)