भाजपमध्ये गेलो असलो तरी शरद पवारांसोबत काम केलंय, पडळकरांच्या टीकेनंतर ज्येष्ठ नेता आक्रमक

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेला एक ज्येष्ठ नेता पवारांच्या बाजूने मैदानात उतरला आहे. (Madhukar Pichad stands with Sharad Pawar)

भाजपमध्ये गेलो असलो तरी शरद पवारांसोबत काम केलंय, पडळकरांच्या टीकेनंतर ज्येष्ठ नेता आक्रमक
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 11:43 AM

शिर्डी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर ढवळून निघालेलं राजकीय वातावरण अद्यापही कायम आहे. पडळकरांच्या विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक आहे, तर भाजप नेते बॅकफूटवर गेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेला एक ज्येष्ठ नेता पवारांच्या बाजूने मैदानात उतरला आहे. (Madhukar Pichad stands with Sharad Pawar)

सध्या भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. “मी भाजपात असलो तरी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं आहे. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे” असा हल्लाबोल मधुकर पिचड यांनी केला. पिचड यांनी पत्रक काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला.

वाचा :  आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, जनतेसाठी भाजपात जातोय : वैभव पिचड

मधुकर पिचड, वैभव पिचडांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचाही यामध्ये समावेश होता.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपद मिळालं.

विरोधी पक्षनेते म्हणूनही मधुकर पिचड यांनी काम पाहिलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून ते आमदार झाले. अकोले तालुक्यावर पिचड यांची मजबूत पकड होती. पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेले वैभव पिचड यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पराभव करुन, पिचड पिता पुत्रांना धक्का दिला होता.

“पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही”

दरम्यान, वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अकोलेत मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केली होती. भाजपमध्ये प्रवेश करतोय, पण शरद पवार यांचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली होती. आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे, असं म्हणत पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

(Madhukar Pichad stands with Sharad Pawar)

संबंधित बातम्या 

शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?   

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!   

पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा अहवाल लवकरच, त्यानंतर पुढील कारवाई करु : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.