केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

मराठवाड्यातील भाजप नेते जयसिंगराव गायकवाडांनी पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी मागे घेत भाजपलाही सोडचिठ्ठी दिली

केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता 'घड्याळ' बांधण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 2:51 PM

बीड : भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे मराठवाड्यात राष्ट्रवादीचे हात आणखी बळकट होण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या माजी आमदारांचा आकडा वाढतच आहे. (Former Union Minister of State BJP leader Jaisingrao Gaikwad Patil leaves party likely to join NCP)

औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती

जयसिंगराव हे जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपच्या सोबत असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केंद्रात दोन वेळा राज्यमंत्रिपद भूषवले आहे. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून दोनदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. दीर्घकाळ भाजपसोबत असल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांचे मराठवाड्यातील पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या जाण्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते.

जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द

माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री माजी सहकार राज्यमंत्री माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा) माजी खासदार – बीड (तीन वेळा)

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. (Former Union Minister of State BJP leader Jaisingrao Gaikwad Patil leaves party likely to join NCP)

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार

सदाशिव पाटील – काँग्रेस – (खानापूर आटपाडी, सांगली) उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार) सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी) रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस – (चिपळूण, रत्नागिरी) एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव) राजीव आवळे – जनसुराज्य – (हातकणंगले, कोल्हापूर)

संबंधित बातम्या:

Marathwada Update | मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक, भाजपचे जयसिंग गायकवाड नाराज

राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ

(Former Union Minister of State BJP leader Jaisingrao Gaikwad Patil leaves party likely to join NCP)

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....