राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, मनसेचा आरोप, राजीनाम्याची मागणी
खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली आहे. (Gajanan Kale demands Rajesh Topes resignation)
नवी मुंबई : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आकडे फुगवून सांगितले असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकरणी जनतेची माफी मागावी, अशी मागणी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेला 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचा दावा खोटा आहे, असं गजानन काळे यांनी म्हटलंय. खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली आहे. (Gajanan Kale demands Rajesh Topes resignation)
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 1 लाख 20 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केलेत या विधानाला मनसेने आक्षेप घेतला आहे. “मुळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते. रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात 1 लाख 64 हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना 1 लाख 20 हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल” असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रिपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.
(Gajanan Kale demands Rajesh Topes resignation)
संबंधित बातम्या
खाजगी हाॅस्पिटलने भरमसाठ बिलासाठी दादागिरी केल्यास धडा शिकवू, नवी मुंबई मनसेचा इशारा