एकही मोठं पद नाही, नगरसेविका ते थेट महापौर, किशोरी पेडणेकरांचा प्रवास
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले (Kishori Pednekar Information) आहे.
मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले (Kishori Pednekar Information) आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा (Kishori Pednekar Information) केली. किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) शिवसेनेकडून महापौरपदासाठी मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला (Kishori Pednekar Information) आहे.
“महापौरपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत कामाची जबाबदारीही आता वाढली आहे. तसेच, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या समस्या सोडवणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजून काम करेन,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना (Kishori Pednekar Information) दिली.
किशोरी पेडणेकर यांची माहिती (Kishori Pednekar Information)
किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत शिकल्या आहेत.
किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. कायम विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा (Kishori Pednekar Information) आहे.
किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या सध्या स्थायी समितीच्या सदस्या आहेत. त्याशिवाय त्या रायगड, शिर्डी जिल्हा महिला संघटकही आहेत. मात्र, या व्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत एकही मोठं पद भूषवलेले नाही. किशोरी पेडणेकर यांनी 2013 मध्ये एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले (Kishori Pednekar Information) आहे.
त्यांना पालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांची नगरसेवक पदाची तिसरी टर्म सुरु आहे. यापूर्वी 2 वेळा जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्षपद भूषवले आहे. यापूर्वी 2006 मध्ये त्या महिला-बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
त्यांनी शिवसेनेच्या ‘प्रथम ती’ या महिलासबलीकरणाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील कामामुळे त्यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.