Ganesh Naik : गणेश नाईक यांना आज दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर अंतिम सुनावणी उद्या

भाजप आमदार गणेश नाईक यांना आज दिलासा मिळालेला नाही. गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. गणेश नाईक यांच्यावर एक महिलेने गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Ganesh Naik : गणेश नाईक यांना आज दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर अंतिम सुनावणी उद्या
गणेश नाईक यांना आज दिलासा नाहीचImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:24 PM

ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना आज दिलासा मिळालेला नाही. गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Bail) उद्या सुनावणी होणार आहे. गणेश नाईक यांच्यावर एक महिलेने गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गणेश नाईक यांच्या वकीलांच्या आरोपानुसार नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) या प्रकरणा भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप करण्यात आलाय. तसेच राजकीय फायद्यासाठी नाईक यांच्याविरोधात खोटे आरोप आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप गणेश नाईकांचे वकीलगुप्ते यांच्याकडून करण्यात आलाय. 2 वर्षापूर्वी पक्ष बदलल्यामुळे नाईक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नाईक यांच्या वकिलांनी केलाय. या महिलेने गणेश नाईकांवर अत्याचाराचे आरोप केल्यानंतर या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तपास वेगाने करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

आज कोर्टात काय झालं

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. त्यात न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्या न्यायालयात सुनवाणी होणार होती, मात्र गुप्ता यांच्या ऐवजी एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात सुनवणी पार पडली. तसेच गणेश नाईक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढे वर्षे प्रेम संबंध असताना आता असे आरोप करणे म्हणजे राजकीय दबाव व फायद्यासाठी केले जात आहेत. तसेच 376 कलम हे लावले हे योग्य नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून युक्तीवाद न्यायाधीश यांनी ऐकला आणि याबाबत अंतिम निर्णयायासाठी उद्याची तारीख दिली गेली. उद्या काय निकाल न्यायाधीश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गणेश नाईकांना जामीन मिळाल्यास मला धोका

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलंय. नाईक यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं तसेच माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे माझ्या जीवालाही धोका होऊ शकतो. मला लोकांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे, अशी याचना यावेळी आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.