Ganesh Naik Live In Case: आमदार गणेश नाईकांची अडचण, महिलेचा लिव्ह इनचा आरोप, मुलगा असल्याचाही दावा, महिला आयोगाचे चौकशीचे आदेश
गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष देत, तसंच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिलीय.
नवी मुंबई : राज्यात माजी मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा (Sexual harassment) गंभीर आरोप करण्यात आलाय. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष देत, तसंच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) आपल्या ट्विटर हँडलवरुन दिलीय. त्यामुळे नबी मुंबईतील भाजपचे सर्वात मोठे नेते गणेश नाईक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
राज्य महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नवी मुंबईतील एका महिलेनं ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला प्राप्त झालाय. त्यात पीडित महिलेनं अशी तक्रार केली आहे की, गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेनं त्यांचे वैवाहिक अधिकार तसंच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली’.
राज्य महिला आयोगाचे ट्वीट
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत सदर संबंधातून त्यांना १५ वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता श्री गणेश नाईक यांनी या महिलेस व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे या महिलेच्या(2/3)
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) April 13, 2022
48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश
या धमकीमुळे महिलेच्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झालाय. या महिलेनं दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. यावर योग्य कारवाई तात्काळ करुन त्याचा अहवाल 48 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, असंही राज्य महिला आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
योग्य कारवाईचे आदेश
व त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या महिलेने दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली असून यावर योग्य कारवाई तात्काळ करून त्याचा अहवाल ४८ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.(3/3)@Navimumpolice
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) April 13, 2022
पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी?
दरम्यान, गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांनीही पीडित महिलेला त्यांच्यासोबत असलेले संबंध संपवून अन्यत्र निघून जाण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असा आरोप करण्यात आलाय. नेरूळ पोलिसांकडे याबाबत तक्रार करुनही कारवाई होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंद व्हावा आणि पोलीस संरक्षण मिळावं या मागणीसाठी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे अर्ज केलाय.
इतर बातम्या :