Ganesh Naik : गणेश नाईक यांना ठाणे कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
भाजप आमदार गणेश नाईक यांना ठाणे कोर्टाने दणाका दिला आहे. कारण गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फाटाळून लावण्यात आला आहे. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. याच प्रकरणात गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाणे कोर्टाने दणाका दिला आहे. कारण गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (bail application) फाटाळून लावण्यात आला आहे. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान (Deepa Chauhan) या महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. याच प्रकरणात गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गणेश नाईक गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. गणेश नाईक यांना अटपूर्व जामीन देऊ नये अशी मागणी नेरूळ पोलिसांनी केली होती. तर दीपा चव्हाण यांनीही नाईकांना जामीन मिळाल्यास माझ्या जीवाला धोका आहे. नाईक आधीही मला धमकावत होते, असा आरोप केला, तसेच नाईकांना जामीन न देण्याची मागणी केली. तर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि नाईकांच्या चाचण्या करण्यासाठी जामीन मंजूर करू नये अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे.
आरोप राजकीय हेतूने
गणेश नाईक यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय हेतून करण्यात आले आहेत. असे आरोप करून याचा राजकीय फायदा उतलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संमतीने प्रेमसंबंध होते, याला अत्याचार म्हणता येणार नाही. त्यामुळे नाईकांना जामीन मंजूर करावा तसेच पोलिसांनी चुकीची कलमं लावली आहे, असा युक्तीवाद नाईक यांच्या वकीलांकडून करण्यात आला. मात्र तो सर्व निष्फळ ठरला आहे.
दीपा चौहान यांचे आरोप काय?
भाजप आमदार गणेश नाईक यांनी यांनी मला धमकावून माझ्यावर वारंवार अत्याचार केला. माझ्याशी बळजबरीने अनेकदा संबंध ठेवले तसेच मला अनेकदा धमक्या दिल्या. माझा गणेश नाईक यांच्याकडून छळ झाला आहे. त्यामुळ त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांना आता जामीन मिळाल्यास माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना जामीन मजूर करू नये. अशी मागणी दीपा चौहान यांच्याकडून करण्यात आली होती.
दीपा चोहान राष्ट्रवादीत जाण्यास उत्सुक
दीपा चौहान या सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्चा बोलून दाखवली आहे. तर त्यांनी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी यांच्याबाबत काय निर्णय घेतेय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आलं आहे. तसेच आता गणेश नाईक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.