गंगाखेड शुगर जानकर, रासपला मविआत नेणार? काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पण मागे पुढे रासपने भाजपची साथ सोडत मविआचा हात धरला तर त्याच्या मुळाशी गंगाखेड शुगर असेल असही राजकीय विश्लेषकांना वाटतं.

गंगाखेड शुगर जानकर, रासपला मविआत नेणार? काय आहे संपूर्ण प्रकरण ?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 10:08 AM

परभणी: जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये उद्योगपती आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर कारखाना आहे. रत्नाकर गुट्टे राज्यातले रासपचे एकमेव आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या मधुसूदन केंद्रे, अभ्यूदय बँकेचे संस्थापक सीताराम घनदाट अशा मातब्बर आणि पैशानं भरपूर असलेल्या उमेदवारांचा पराभव करून गुट्टे आमदार झाले तेही जेलमध्ये असताना. पण गंगाखेड तसच शेजारच्या परळीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी गंगाखेड शुगर कारखाना आणि खुद्द रत्नाकर गुट्टे राहीलेत. त्याच कारखान्यावरून महादेव जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांना थेट शरद पवारांची भेट घ्यावी. त्याच भेटीवरून राज्यात नव्या राजकीय समिकरणांची चर्चाही सुरु झाली. (Gangakhed Sugar Factory Is The Center Of Politics Dhananjay Munde And Ratnakar Gutte Dispute)

जानकर, गुट्टे, शरद पवार भेटीची पार्श्वभूमी काय?

गंगाखेड शुगर हा रत्नाकर गुट्टे यांचा कारखाना आहे. पण सध्या त्यावर प्रशासक बसवण्यात आलेला आहे. गुट्टेंना जामिन मिळाला आणि आता कारखाना सुरु होणार ह्या आशेवर गंगथडी आणि डोंगरभागातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उस लावला. पण उस ऐन काढणीला आला असतानाच कारखान्याला क्रशिंगची परवानगी नाकारण्यात आली. चांगल्या पाऊसकाळामुळे पिकही जोमदार आलंय. पण कारखानाचा बंद असल्यामुळे उस शेतात तसाच उभा राहीला. परिसरात दुसरा मोठा साखर कारखाना म्हणजे बालाघाट. पण तिथं उसाला चार चार दिवस वेटींग लागलं. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. क्रशिंगची मंजुरी नाकारल्याच्याविरोधात गुट्टेंनी अगोदर गंगाखेडमध्ये धरणे धरले, मोर्चे काढले. धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ललकारलं. शेतकऱ्यांना गोळा केलं. नंतर हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टानं क्रशिंगचा परवानगी दिली. कारखाना सुरु झाला.

शरद पवारांना का भेटले जानकर, गुट्टे?

कोर्टानं क्रशिंगला परवानगी दिली तरी कारखान्याला ज्या अटी, शर्थी लावल्या होत्या, त्या जाचक असल्याचा दावा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला. अशाच अटी जर इतर कारखान्यांना लावल्या तर राज्यातला एकही साखर कारखाना चालणार नाही असही गुट्टे म्हणाले. ह्या अटी साखर आयुक्तांनी लावलेल्या आहेत. त्या काढाव्यात अशी विनंती करण्यासाठी गुट्टेंनी अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अर्थातच सोबत महादेव जानकरही होते. अजित पवारांच्या भेटीवरच जानकर गुट्टे थांबले नाहीत तर ते लगेचच शरद पवारांच्याही भेटीला गेले. तिथंही त्यांनी गंगाखेड शुगरवर लादलेल्या जाचक अटींची तक्रार केल्याचं सांगितलं. पण याच भेटीत जानकर, गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचीही तक्रार केल्याची चर्चा गंगाखेडमध्ये स्थानिक पातळीवर आहे.

धनंजय मुंडेंचा गंगाखेड शुगरशी काय संबंध आहे ?

परळीचा शेजारचा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड. खुद्द गुट्टे हे मुळचे परळीचे. पण वर्षानुवर्ष गंगाखेड हा राखीव मतदारसंघ होता. तो उठताच रत्नाकर गुट्टेंनी गंगाखेडमध्ये आधी गंगाखेड शुगरची स्थापना केली आणि त्यातून राजकारणाचं बस्तान बसवलं. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे हे निवडूण आले. धनंजय मुंडे यांचे मेहुणे म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या विधानसभेला मात्र घोटाळ्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असतानाही रत्नाकर गुट्टे दणदणीत मतं मिळवत विजयी झाले. त्यांनी मधुसूदन केंद्रेंचा पराभव केला. परळी आणि गंगाखेडचं राजकारण म्हणून धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात वाद झाला. तो वाद गंगाखेड शुगरच्या मुळावर आल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडेंनीच गंगाखेड शुगरचं क्रशिंग सुरु होऊ दिलं नसल्याचा आरोप खुद्द गुट्टे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये पसरवला. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं समर्थन मिळवण्यात गुट्टे राजकीयदृष्ट्या यशस्वीही झाले. धनंजय मुंडेंची राजकीय तक्रार गुट्टे-जानकरांनी पवारांकडे केल्याची चर्चा आहे.

गुट्टे जेलमध्ये असताना निवडूण कसे आले ?

गंगाखेड शुगर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर 328 कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतल्याचे खंडपीठात सांगण्यात आले. यूको, आंध्रा, सिंडिकेट अशा नागपूर, नांदेड, परभणी येथील शाखेतून कर्ज घेतले होते. 2017 साली गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना मार्च 2019 साली अटक झाली, त्यादरम्यान निवडणूक लागल्या होत्या, जेलमध्ये राहून गुट्टे यांनी रासपकडून अर्ज भरला आणि जेलमधून निवडून येत आमदार झाले. गुट्टेंच्या कारखान्यामुळे गंगाखेडचं अर्थकारण बदलेल या आशेवर लोकांनी त्यांना निवडूण दिलं. तोच बंद झाला तर त्याला बंद करणाऱ्याविरोधात भावना तीव्र होत असल्याचंही गेल्या काही काळात दिसून आलंय.

आम्ही भाजपसोबतच…

दरम्यान, गाळपाअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा राहिला, तर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल आणि असे होऊ नये, या भावनेतूनच गंगाखेड शुगर सुरू व्हावा, यासाठी मी थेट त्यांचे सर्वोच्च नेते आणि ज्यांना शेतकरी, ऊस उत्पादकांचे कष्ट, दु:ख कळते त्या शरद पवार आणि अजित पवार साहेबांची भेट घेतली, असं रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं आहे. ह्या भेटीनंतर जानकर मविआच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली पण रासपचे प्रदेशाध्यक्षही असलेल्या गुट्टेंनीही ती नाकारली आणि जानकरांनीही. पण मागे पुढे रासपने भाजपची साथ सोडत मविआचा हात धरला तर त्याच्या मुळाशी गंगाखेड शुगर असेल असही राजकीय विश्लेषकांना वाटतं. (Gangakhed Sugar Factory Is The Center Of Politics Dhananjay Munde And Ratnakar Gutte Dispute)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.