50 हजारांनी निवडून येताय, लिहून घ्या, गिरीश बापटांना मुक्ता टिळकांच्या विजयाची खात्री

कसबा पेठ मतदारसंघातून मुक्ता टिळक 50 हजार मतांनी निवडून येणार असा दावा खुद्द खासदार गिरीश बापट यांनीच केला आहे.

50 हजारांनी निवडून येताय, लिहून घ्या, गिरीश बापटांना मुक्ता टिळकांच्या विजयाची खात्री
Follow us
| Updated on: Oct 22, 2019 | 9:54 AM

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांचं मतदान होत नाही, तोच विजयाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात आपल्या उमेदवाराचे विजयी फलक झळकवले असतानाच खासदार गिरीश बापट यांनाही पुण्याच्या महापौरांच्या विजयाची खात्री वाटते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असं बापटांनी कार्यालयातील फलकावर (Girish Bapat assures Mukta Tilak Victory) लिहून ठेवलं आहे.

विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडताच अंदाज आणि चर्चांना जोर आला आहे. पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक नशीब आजमावत आहेत. खासदारपदी निवड झाल्यानंतर गिरीश बापट यांच्या जागी मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं आवाहन आहे. परंतु भाजपला मुक्ता टिळक यांच्या विजयाची शाश्वती आहे.

मुक्ता टिळक 50 हजार मतांनी निवडून येणार असा दावा खुद्द खासदार गिरीश बापट यांनीच केला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बापटांनी फलकावर हे मताधिक्य लिहून (Girish Bapat assures Mukta Tilak Victory) ठेवलं. कसबा पेठ या आपल्या मतदारसंघाविषयी माहिती असल्यामुळेच गिरीश बापट यांनी खात्रीपूर्वक मुक्ता टिळक यांना निश्चिंत राहण्यास सांगितलं आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, निकालाआधीच उमेदवाराचे विजयी बॅनर

याआधी, खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयी फलक निकालाआधीच झळकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर सचिन शिवाजीराव दोडके निवडणुकीला उभे आहेत. निकाल जाहीर होण्यास तीन दिवसांचा अवधी असतानाच दोडके यांच्या विजयाचे बॅनर खडकवासल्यात झळकले आहेत.

‘राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव दोडके यांची आमदार पदी प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’ असं सचिन दोडके यांच्या विजयी बॅनरवर लिहिलं आहे. बॅनरवर सचिन दोडके यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो दिसत आहे. शुभेच्छुक म्हणून खडकवासला विधानसभा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये काल मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. एकूण 3 हजार 237 उमेदवार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात आहेत.

राज्यभरात अंदाजे 66.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी मतदान झालेल्या पाच मतदारसंघांमध्ये पुणे कँटोन्मेंटचा समावेश आहे. इथे 42.68 टक्के मतदान झालं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.