जळगावात भाजपला मजबूत करायचंय, मतभेद विसरा, गिरीश महाजनांच्या सूचना

गिरीश महाजनांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली (Girish Mahajan BJP Meeting)

जळगावात भाजपला मजबूत करायचंय, मतभेद विसरा, गिरीश महाजनांच्या सूचना
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:01 PM

जळगाव : आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, जळगाव जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही संधी आहे, असं म्हणत भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलं. महाजनांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांची रात्री तातडीची बैठक पार पडली. (Girish Mahajan BJP Meeting in Jalgaon)

जळगाव जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही संधी आहे. यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या ग्रामपंचायत आढावा बैठकीत केले. यावेळी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजूमामा भोळे अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

देश आणि महाराष्ट्राच्या, मोठ्या बातम्यांचं बुलेटीन, पाहा देश महाराष्ट्र , दररोज संध्या. 7 वाजता 

“आपापसात काही मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवून कामाला लागा. पुढे जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे भविष्यात असलेल्या निवडणुकांची रंगीत तालीम करण्याची नामी संधी आपल्याला आली आहे. यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी” असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी केले.

गिरीश महाजनांची उत्तर महाराष्ट्रात पक्षबांधणी

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन जोरदार कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधणीचे काम वेगात सुरु आहे. “राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील” असा टोला गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता. (Girish Mahajan BJP Meeting in Jalgaon)

भाजपला ताकद दाखवतो : खडसे

“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल” अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. “जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील; गिरीश महाजनांचा टोला

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार

(Girish Mahajan BJP Meeting in Jalgaon)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.