ठाकरे सरकारकडून भ्रष्टाचाराची चौकशी तरीही महाजनांची सरशी! का?
जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आपला दबदबा कायम राखलाय.
जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक गावपातळीवर झाली असली तरी राज्याच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच या सर्वच दिग्गज नेत्यांनी गावस्तरावर प्रचाराचा धुराळा उडवला आणि आपआपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अशीच एक लढत जळगावमध्येही झाली. जळगावच्या राजकारणाला सध्या कलाटणी मिळालेली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपची ताकद कमी होणार अशी चर्चा होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आपला दबदबा कायम राखलाय (Girish Mahajan record victory in many Gram Panchayat Elections in Jalgaon after Corruption investigation).
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांचीच सरशी झालीय. तालुक्यातील 68 पैकी तब्बल 45 ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावला आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यात पुन्हा आमदार गिरीश महाजन यांचेच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण 73 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता.
उर्वरीत 68 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष होतं. या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र, त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले. तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल 45 जागांवर विजय मिळवला. उर्वरीत जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने विजय मिळवला.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Girish Mahajan record victory in many Gram Panchayat Elections in Jalgaon after Corruption investigation