भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. | Girish Mahajan

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 9:23 PM

जळगाव: आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. (Girish Mahajan take a dig at Eknath Khadse)

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. जळगावमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात याचाच प्रत्यय आला. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

तसेच गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारला लक्ष्य केले. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण दिले, केंद्राकडे जा, असे म्हटले नाही. मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तीन पक्षाचे सरकार असून महाविकास आघाडीच्या अर्ध्या मंत्र्याना वाटते की मराठा आरक्षण देऊ नये. हे सरकार आरक्षणाविषयी गंभीर नाही, दिल्लीत जात नाही, कमिटी करत नाही, कोर्टात तारीख आली की लक्ष ठेवत नाही. मात्र, राज्यातील जवळपास 90 टक्के मराठा समाज उपेक्षित असल्याने त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भावना गिरीश महाजन यांनी बोलून दाखविली.

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही. जळगावात आमच्याकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरून काढणारे नेते आहेत, ही भाजप नेत्यांची वक्तव्ये कागदावरच खरी ठरताना दिसू लागली आहेत. कारण, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पक्षबांधणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे नेते आणि कार्यकर्त्यांना पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला होता.

गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजी मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली.

संबंधित बातम्या:

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

(Girish Mahajan take a dig at Eknath Khadse)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.