Goa Assembly Election 2022 : गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना दंड थोपटणार? संजय राऊतांचा मोठा दावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा (आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

Goa Assembly Election 2022 : गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना दंड थोपटणार? संजय राऊतांचा मोठा दावा
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 5:26 PM

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (5 State Assembly Election) कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uattar Pradesh) शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

‘गोवा, उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु’

गोवा आणि अन्य राज्यात शिवसेना निवडणूक लढणार का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ‘नक्कीच आमचा गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. गोवा, उत्तर प्रदेश पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसं काही शिवसेनेचं दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरु, पण…

त्याचबरोबर शिवसेना स्वबळावर लढणार का किंवा अन्य राज्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग होईल? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गोव्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. निदान गोव्यात तरी असा एखादा प्रयोग व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसनं आमच्यासोबत राहावं यासाठी मी स्वत: गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. पण जागा वाटपाबाबत काही अडचणी आहेत. काँग्रेसला अजूनही वाटतं की ते स्वबळावर सत्तेत येतील. त्यांना वाटतं की त्यांच्या 22 जागा येतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा. आम्हाला असं वाटतं की भाजपला रोखण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्यांनी सत्तेत यावं. त्यांना वाटतं की गोव्यात, उत्तर प्रदेशात ते स्वबळावर सत्तेत येतील तर त्यांनी यावं. पण आम्ही अजून काही दिवस प्रयत्न चालू ठेवू. आम्ही सर्व जागांवर लढू असं कधीच म्हटलं नाही. पण गोवा आणि उत्तर प्रदेशात आम्ही काही जागांवर नक्की लढू’, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊतांचा भाजपला टोला

तर ‘निवडणूक आयोगाने काही बंधन घातली आहेत. ती सगळ्यांसाठी असावीत. आम्ही पश्चिम बंगालमध्ये पाहिलं की दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाही त्या लाटेवर आरुढ होऊन कसा प्रचार केला. विशेषता पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मोठ्या नेत्यांनी मोठ्या सभा, रॅली घ्यायला नको. पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमांचं पालन केलं पाहिजे. पंजाबमधील घटनेनंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. तर कोरोनामुळे लोकांची चिंता वाटते’, असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला लगावला आहे.

इतर बातम्या :

Punjab Uttarakhand Election Result and Voting Date : पंजाब आणि उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा धुरळा कधी उडणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Assembly Election 2022 Full Schedule : 5 राज्य, 7 टप्पे, कधी मतदान? कधी निकाल? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.