Congress : सुनील जाखड यांचा काँग्रेसला अलविदा! पक्ष सोडताना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप, काय म्हणाले?
Punjab Sunil Jakhar resign congress : अंबिका सोनी यांनी सुनील जाखर यांना अडकवून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मार्गात अडथळा आणला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी जाखर यांच्या पदावरून हटवण्यात आले होते.
पंजाब : पंजाब (Punjab Congress) काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी शनिवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती त्यांनी जाहीर केली आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षावर सुध्दा निशाणा साधला आहे. राजस्थानमधील (Rajasthan)उदयपूरमध्ये पक्ष चिंतन शिबिरात व्यस्त असताना काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाचा निरोप घेतल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. सुनील जाखड हे अनेक दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असल्याचं त्यांनी फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं आहे. कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केल्यापासून ते नाराज होते. तसेच कॉंग्रेसला विचार करायला सांगितलं आहे.
अंबिका सोनी यांनी सुनील जाखडांना विरोध केला
अंबिका सोनी यांनी सुनील जाखड यांना अडकवून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मार्गात अडथळा आणला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी जाखड यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सुनील जाखड यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू झाली होती. पण अंबिका सोनी यांनी ‘शीख राज्य शीख मुख्यमंत्री’ असा युक्तिवाद करून जाखर यांच्या उमेदवारीला विरोध केला. पंजाबमध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच हिंदू-शीखांवर चर्चा केल्याने ते नाराज आहेत.
या नेत्यांवरती केली टीका
दिल्लीत बसलेल्या काँग्रेस नेत्यांनी पंजाबमध्ये पक्षाची नासधूस केल्याचे जाखड़ यांनी फेसबुक पेजवर त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. जाखड यांनी हरीश चौधरी, माजी राज्य प्रभारी हरीश रावत आणि तारिक अन्वर यांच्यावर सुध्दा टीका केली आहे. राहुल गांधींचे कौतुक करताना जाखर म्हणाले की, ते एक चांगले व्यक्ती आहेत. शेवटी बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच काँग्रेसला अलविदा असं सुध्दा म्हटलं आहे.
पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस
पक्षाच्या विरोधात गेल्याने सुनील जाखड आणि केव्ही थॉमस या दोन नेत्यांवरती कॉंग्रेसने कारवाई केली होती. कॉंग्रेसने दिलेल्या सर्व पदावरून दोन नेत्यांना हटवले होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी दोघांबाबत नम्रता दाखवत कमिटीच्या शिफारशीनंतर त्यांच्यावरती कारवाई केली नव्हती.
11 एप्रिल रोजी काँग्रेस नेते केव्ही थॉमस आणि सुनील जाखड यांना पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.