Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना यांना मंत्री करण्यासाठी रक्ताने लिहिलं पत्र, कॅबिनटमध्ये वर्णी लागणार?

आता पुन्हा नवं कॅबिनेट बनणार आहे. या कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यात पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांचेही कार्यकर्ते आहेत. आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तर यासाठी एक आगळा वेगळा प्रकार केलाय. 

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना यांना मंत्री करण्यासाठी रक्ताने लिहिलं पत्र, कॅबिनटमध्ये वर्णी लागणार?
आ. गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:46 PM

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याकडे भाजपमधील धडाडणारी तोफ आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) अत्यंत जवळचे सहकारी म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे बारामतीत निवडणूक हरल्यानंतरही त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. आपल्या विविध आंदोलनामुळेही ते अनेकदा चर्चेत असता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, एसटी कर्मचारी आंदोलन, तसेच बैलगाडा शर्यत, सतत पवारांवर चढवलेला हल्लाबोल यामुळेच ते सतत चर्चेत राहिले. आता मध्येच ठाकरे सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप युतीचे सरकार आलं. त्यामुळे आता पुन्हा नवं कॅबिनेट बनणार आहे. या कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यात पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांचेही कार्यकर्ते आहेत. आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तर यासाठी एक आगळा वेगळा प्रकार केलाय.

लिहिलं रक्ताने पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे, अशी मागणी आता गोपीचंद पडळकर यांचे कार्येकर्ते करत आहेत, यासाठी सांगली जिल्ह्यातील जत येथील युवा नेते अनिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पिरु कोळी यांनी चक्क रत्काने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाची सध्या जास्त चर्चा आहे. आपल्या लाडक्या नेत्यांना किंवा नेत्यांसाठी अशा प्रकारची पत्रं लिहिण्याचे प्रकार आधीही समोर आलेच आहे. आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी असे पत्र लिहिल्याने आता तरी पडळकरांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का? असा सवाल विचरण्यात येत आहे.

पडळकरांची चर्चा का?

गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये सतत चर्चेत असणारे नाव आहे. पडळकरांनी अनेक आंदोलनात सरकारविरोधात जोरदार लढा दिला आहे. तसेच धनगर मतांचं बरच राजकारणही पडळकरांवर अवलंबून आहे. सध्या ओबीसी आरक्षाचा तिढा पाहता, ओबीसींची नारीज दूर करण्याचं मोठं आव्हान हे भाजप आणि शिंदे यांच्यापुढे असणार आहे. शिवाय पडळकर हे विविध प्रश्नांवरून सतत रस्त्यावर उतरत असतात. त्याचा फायदा भाजपला अनेक आंदोलनामुळे झाला आहे. शिवाय पवारांच्या विरोधात असणार एक नेता म्हणून पडळकरांना ओळखलं जातं. त्यामुळे भजापकडून त्यांची ताकद वाढण्याचा आणखी प्रयत्न होऊ शकतो. आता या कॅबिनटमध्ये त्यांना जागा मिळणार की नाही, हे येणारे काही दिवस हे सांगतीलच.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.