Gopichand Padalkar | पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक
गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. Gopichand Padalkar grand welcome
पंढरपूर/सांगली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची एण्ट्री झाली. (Gopichand Padalkar grand welcome)
धनगर समाजाकडून आ. पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी पडळकर समर्थकांनी नमूद केलं. पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक https://t.co/zGZNqdUNfA pic.twitter.com/BOTT1GoEC1
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2020
100 गाड्यांच्या ताफ्यातून एण्ट्री
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये धडाकेबाज एण्ट्री केली. जतमध्ये 100 गाड्यांच्या ताफ्यासोबत गोपीचंद पडळकर यांची एण्ट्री झाली. जतमध्ये पडळकर यांचा सत्कार झाला. गाड्यांच्या ताफ्यासहित शेकडो कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत पाहायला मिळाले.
जंगी स्वागत
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी, पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच छंद गोपीचंद… अशी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे.
आटपाडी तालुक्यातील करगणी, नागसफाटा आणि कवठेमहांकाळ परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं. कालच आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या झरे गावातील फार्महाऊसवर महाराष्ट्र जनसंवाद व्हर्च्युअल रॅलीत सहभाग घेतला होता. यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऑफ द रेकॉर्ड दिलेली माहितीनुसार आजही गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्याप्रकरणी केलेल्या विधानावर ठाम आहेत. त्यामुळे माफी किंवा दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगण्यात येत आहे.
(Gopichand Padalkar grand welcome)