Gopinath Munde | गोपीनाथ मुंडेंची जयंती, नेमकं कोण काय म्हणतंय?
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. (Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)
मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती…. या निमित्ताने दरवर्षी गोपीनाथ गडावर खास भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. (Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)
असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !, असे ट्वीट भाजपने केले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2 मिनिटांची एक व्हिडीओ पोस्ट करत अभिवादन केले आहे. याशिवाय अनेक दिग्गज नेत्यांनीही गोपीनाथ मुंडे यांनी अभिवादन केले.
गोपीनाथ मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांचे अभिवादन
रात्री दिव्याच्या झोतात माझा -तुमचा ^गोपीनाथ गड ” pic.twitter.com/Tga1dehXwU
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 12, 2020
अप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते.त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा,त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/BJHwSAIelF
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2020
असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/C6rmWIh9cV
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 12, 2020
स्व. गोपीनाथजी मुंडे : हिंमत-आत्मविश्वास जागविणारे आणि आम्हाला संघर्षाचा मूलमंत्र देणारे नेते! pic.twitter.com/VDSqJgdo6Q
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2020
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ! pic.twitter.com/p1WC0E1In6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2020
कुशल संघटक, उत्कृष्ट वक्ते, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, तडफदार प्रशासक, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री भाजपचे महाराष्ट्रातील लाडके लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ???? pic.twitter.com/b5j5xRQ1uc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 12, 2020
लोकनेते मा.स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! प्रेरणादायी लोकनेते ज्यांची आजही लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ही त्यांनी तळागाळातील समस्यांवर आणि कार्यकर्त्यांबरोबर केलेले कठोर परिश्रम, समर्पण व अफाट समाजकार्याची साक्ष आहे.@Pankajamunde @DrPritamMunde pic.twitter.com/qbVhxwcAtY
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 12, 2020
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/cgHccsWAls
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 12, 2020
भारतीय राजकारणातील एक महत्वाचे नाव म्हणजे #गोपिनाथ_मुंडे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करून तळागाळातील नेता म्हणुन आपली ओळख निर्माण केली. ते खऱ्या अर्थाने जनतेचे नाथ होते. अशा या भारदस्त व्यक्तित्वास जन्मदिनी विनम्र अभिवादन.! ?@Pankajamunde pic.twitter.com/UJYz8ecKUU
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) December 12, 2020
महाराष्ट्राचे लोकनेते, संघर्षयात्री, कुशल संघटक, आमचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथ मुंडे यांना जयंती निमित्त वंदन. pic.twitter.com/BuTSGVsOyb
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 12, 2020
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथजी मुंडेसाहेब यांची आज जयंती.भावपूर्ण अभिवादन….? @Pankajamunde @DrPritamMunde pic.twitter.com/FrSNykc7XK
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 12, 2020
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!? pic.twitter.com/cuCPNw3E9d
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 12, 2020
(Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)
संबंधित बातम्या :
आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी