Nitin Gadkari : सरकार अधिकाऱ्यांच्या धोरणानुसार चालणार नाही; त्यांनी सरकारच्या धोरणानुसार चालावे – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी देशातील नोकरदार वर्गावर (bureaucracy) जोरदार हल्लाबोल केला. सरकार हे नोकरदाराच्या सल्ल्याने काम करणार नाही तर नोकरदारांना मंत्र्यांनुसार काम करावे लागेल असं गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

Nitin Gadkari : सरकार अधिकाऱ्यांच्या धोरणानुसार चालणार नाही; त्यांनी सरकारच्या धोरणानुसार चालावे - गडकरी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 10:20 AM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी देशातील नोकरदार वर्गावर (bureaucracy) जोरदार हल्लाबोल केला. सरकार हे नोकरदाराच्या सल्ल्याने काम करणार नाही तर नोकरदारांना मंत्र्यांनुसार काम करावे लागेल असं गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. नितीन गडकरी हे नागपुरात (Nagpur) आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की मी नेहमी सरकारी अधिकाऱ्यांना सांगत असतो की, सरकार तुमच्यासाठी नाही तर तुम्ही सरकारसाठी आहात. तुम्हाला फक्त मंत्र्यांच्या आदेशाची आंमलबजावणी करायची आहे. सरकार तुम्ही नाही तर आम्ही मंत्री चालवू, तु्म्ही फक्त आदेशांचे पालन करा. दरम्यान त्यांनी यावेळी महात्मा गांधी यांचे एक उदाहरण देखील दिले. त्यांनी म्हटले की, गरीबांची कामं करताना कोणताही कायदा आडवा येत नाही असे गांधी म्हणत असत. जर कायदा आडवा आला तर तो मोडीत काढताना देखील फार विचार करण्याची आवश्यकता नसते.

गडकरींकडून नव्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन

दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी महाराष्ट्रातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देतो. तुमचा अनुभव हा राज्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर ते नागपूरमध्ये आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी नोकरशाहीवर जोरदार टीका केली.

हे सुद्धा वाचा

काय म्हटलं गडकरींनी?

आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. नोकरदार वर्गाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, सरकार तुमच्या धोरणानुसार चालणार नाही तर तुम्हाला सरकारच्या धोरणानुसार चालायचे आहे. सरकारमध्ये अंतिम निर्णय त्या- त्या विभागाच्या मंत्र्यांचा असेल. त्या निर्णयाची उत्तमप्रकरे अंमलबजावणी करण्याचे काम हे सरकारी अधिकाऱ्यांनी करावे असे गडकरी यांनी म्हटले आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.