Graduate Constituency Elections LIVE | पदवीधर आणि शिक्षक निवडणूक, कुठे-किती टक्के मतदान?
पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. Graduate Constituency Elections Voting
पुणे : मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Graduate Constituency Elections Voting) आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती.
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते.चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के मतदान झाले.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 पर्यंत 43 टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचं आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झालं आहे. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.
शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक
पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 सायंकाळी पाचपर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात सायंकाळी 4 पर्यंत 67 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसनगावकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. 2014 ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे.
धुळे नंदूरबारमध्ये 99.31 टक्के मतदान
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 437 पैकी 434 (99.31 %) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ.अभिजीत पाटील यांचं आव्हान आहे. भाजप विरोधात महाविकासआघाडीनं एकत्रितपणे निवडणूक लढवल्यामुळे अमरीश पटेल जागा राखणार का हे पाहावं लागणार आहे. (Graduate Constituency Elections Voting).
LIVE UPDATE
[svt-event title=”सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क” date=”01/12/2020,3:33PM” class=”svt-cd-green” ] बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क.. बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये केलं मतदान.. सुनेत्रा पवार या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या [/svt-event]
[svt-event title=” पुणे विभाग मतदान, दु. 12 पर्यंतची आकडेवारी ” date=”01/12/2020,1:33PM” class=”svt-cd-green” ] पुणे विभाग मतदान, दु. 12 पर्यंतची आकडेवारी पदवीधर – 19.44% शिक्षक- 26.25% [/svt-event]
[svt-event title=”प्रितम मुंडेंनी बजावला मतदानाचा अधिकार” date=”01/12/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ] बीड: खा प्रीतम मुंडेंनी बजावला मतदानाचा अधिकार, पिंपळगाव येथे केलं मतदान, प्रकृती खराब झाल्याने पंकजा मुंडे गैरहजर, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, मतदारांचा प्रतिसाद पाहता कौल आमच्याच बाजूने, विजय आमचाच होईल, खा. प्रितम मुंडेंना विश्वास [/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्यात 12 वाजेपर्यंत 20.48 टक्के मतदान” date=”01/12/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात 12 वाजेपर्यंत 20.48 टक्के झालं मतदान [/svt-event]
[svt-event title=”विजयाची हॅटट्रिक करणार – सतीश चव्हाण” date=”01/12/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद – महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क, विभागीय कृषी कार्यालयातील मतदान केंद्रात बजावला हक्क, दोन टर्म मी चांगलं काम केल्यामुळे मतदार मलाच निवडून देणार, यावेळी विजयाची हॅटट्रिक करणार – सतीश चव्हाण [/svt-event]
[svt-event title=”सकाळी 10 पर्यंत मतदानाची टक्केवारी ” date=”01/12/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ]
शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, सकाळी 10 पर्यंत मतदानाची टक्केवारी
कोल्हापूर – पदवीधर -11.75% शिक्षक – 18.22 %
पुणे – पदवीधर -10% शिक्षक –
अमरावती – शिक्षक – 10.11%
चंद्रपूर : पदवीधर – 7.77 % https://t.co/nAHss2KfQb
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=” 2 दिवसांपूर्वी अपघात, तरीही पदवीधरसाठी मतदान” date=”01/12/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]
शिक्षक आणि पदवीधर निवडणूक LIVE – #नागपूर – अंजली रंगारी यांनी 2 दिवसांपूर्वी अपघात होऊनही आज मतदानाचा हक्क बजावला https://t.co/nAHss2KfQb @gajananumate pic.twitter.com/nJzcgsMxbf
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात सकाळी 10 पर्यंत 10 टक्के मतदान” date=”01/12/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सकाळी 10 पर्यंत 10 टक्के मतदान [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दहापर्यंत 11.75 टक्के मतदान” date=”01/12/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] #कोल्हापूर – पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 11.75 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 18.22 टक्के मतदान, 10439 पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क, तर 12237 शिक्षकांनीही आतापर्यंत मतदान केलं [/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी राहुल कुल यांचं सपत्निक मतदान” date=”01/12/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] दौंड : आमदार राहुल कुल आणि कांचन कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क, दौंड तालुक्यातील राहू येथील कैलास विद्या मंदिर येथे जाऊन केलं मतदान, पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी राहुल कुल यांचं सपत्निक मतदान [/svt-event]
[svt-event title=”ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही मतदानाचा हक्क बजावला, बेझनबाग परिसरातील नागसेन विद्यालयात मतदान, नागपूर पदवीधर मतदार संघात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, भाजपचं वर्चस्व असलेला मतदार संघ आम्ही नक्कीच जिंकू, आम्हाला यात मोठं यश मिळेल, असंही ते म्हणाले [/svt-event]
[svt-event title=”पुणे शिक्षक मतदारसंघातील मनसेचे उमेदवार विद्यानंद मानकर यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातील मनसेचे उमेदवार विद्यानंद मानकर यांनी मतदानाचा हक्क बजावला, भोसरीतील राजमाता जिजाऊ विद्यालयात सहकुटुंब मतदान, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा विद्यानंद मानकर यांचे आवाहन [/svt-event]
[svt-event title=”धुळे-नंदूरबार विधानपरिषदच्या मतदानाला सुरुवात, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ] धुळे : धुळे-नंदूरबार विधानपरिषदच्या मतदानाला सुरुवात, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदान प्रकिया सुरळीत चालू, 437 मतदार ठरवणार विधान परिषदेचे आमदार, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दहा मतदान केंद्र, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना, भाजपकडून माजी आमदार अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात [/svt-event]
[svt-event title=”नितीन गडकरींनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”01/12/2020,8:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला, नागपुरात भाजपकडून संदीप जोशी तर महाविकास आघाडीकडून अभिजीत वंजारींमध्ये चुरस [/svt-event]
[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारींनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”01/12/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी केलं मतदान, पत्नीसह पोहोचले मतदान करण्यासाठी, विजय निश्चित असल्याचं केलं वक्तव्य [/svt-event]
[svt-event title=”भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पदवीधर निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,8:36AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पदवीधर निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला, औरंगाबाद शहरातील आयटीआय इमारतीतील मतदान केंद्रात शिरीष बोराळकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, यावेळी शिरीष बोराळकर यांनी मला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून विजय आपलाच असल्याचा दावा केला [/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात” date=”01/12/2020,8:35AM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात, थर्मल चेकिंग करुनच दिला जातोय मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश, मतदार मतदान केंद्रावर यायला सुरुवात [/svt-event]
[svt-event title=”शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,8:31AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनी बजावला मतदानाचा हक्क, नागपुरातील साखरे शाळा मतदान केंद्रात केलं मतदान, प्रत्येक मतदारांनी मतदान करण्याचं केलं आवाहन [/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक, खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”01/12/2020,8:28AM” class=”svt-cd-green” ] बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला, पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी केलं मतदान, बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क
आज पुणे पदवीधर मतदार संघासाठी बारामती येथे मतदान केले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण देखील आज आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे! सोशल डिस्टनसिंग पाळा, आरोग्याची काळजी घ्या! pic.twitter.com/SFQawhmyBl
— Supriya Sule (@supriya_sule) December 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापुरातील मतदान केंद्र सज्ज, जिल्ह्यात 281 मतदान केंद्र” date=”01/12/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापुरातील मतदान केंद्रावर थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात, मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात 281 मतदान केंद्र, जिल्ह्यात पदवीधरांसाठी 79 हजार मतदार, भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत असल्यानं यावेळी होणार चुरशीन मतदान, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज” date=”01/12/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रात निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, नागपूर मतदारसंघात 322 मतदान केंद्रात मतदान, नागपूर मतदारसंघात 2 लाख 6 हजार 454 मतदार [/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर निवडणूक मतदान, भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला” date=”01/12/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] बारामती : पुणे पदवीधर निवडणूक मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार, बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे 8 वाजता मतदान करणार, पुणे पदवीधर मतदारसंघात 4 लाख 24 हजार 983 मतदार, निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, मागील निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान [/svt-event]
[svt-event title=”पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक मतदान, यंत्रणा सज्ज” date=”01/12/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] सांगली : पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक मतदान थोड्याच वेळात सुरु होणार, मतदान यंत्रणा सज्ज, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 9 वाजता मतदान करतील, मतदार संघात 3.65 हजार पदवीधर मतदान असून 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, हा मतदार संघ कायम भाजपाकडे राहिला असून प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांनी येथुन प्रतिनिधित्व केले आहे, या निवडणुकीत भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड अशी सरळ लढत आहे [/svt-event]
Graduate Constituency Elections Voting
संबंधित बातम्या :
विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, 3 डिसेंबरला निकाल