गुजरातमध्ये भाजपला हायकोर्टाचा दणका, कायदेमंत्री भूपेंद्र सिंह चुडासामांची आमदारकी रद्द

मतमोजणीत फेरफार करून भूपेंद्रसिंग चुडासामा ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्याचा ठपका गुजरात हायकोर्टाने ठेवला आहे (Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)

गुजरातमध्ये भाजपला हायकोर्टाचा दणका, कायदेमंत्री भूपेंद्र सिंह चुडासामांची आमदारकी रद्द
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 3:22 PM

गांधीनगर : गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते, कायदा आणि शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा यांना हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवैध असल्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. 2017 मध्ये भूपेंद्रसिंग चुडासमा विजयी झाले होते. (Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)

भूपेंद्रसिंग चुडासामा 2017 च्या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून अवघ्या 327 मतांच्या फरकाने निवडून आले होते. या निकालाला कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अश्विन राठोड यांनी आव्हान दिले होते. मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोप राठोड यांनी केला होता.

429 बॅलेट मतांकडे दुर्लक्ष करुन फेरफार केल्याचा दावा कॉंग्रेस उमेदवार अश्विन राठोड यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ढोलकाचे अधिकारी धवल जानी यांची कोर्टाच्या आदेशाने बदली झाली होती.

भूपेंद्रसिंग चुडासामा यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस नेते भरत सोलंकी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)

(Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.